आजकाल प्रत्येकजण केसांच्या कोणत्या ना कोणत्या समस्येने हैराण आहे. बदललेली जीवनशैली, प्रदूषण, ताणतणाव आणि चुकीचे ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरण्यामुळे केसगळती, कोंडा, कोरडेपणा, वाढ खुंटणे अशा अनेक समस्या (Potli Hair Massage Oil) सतावतात. या सगळ्या समस्यांवर (How to make potli for hair growth) एकच असरदार आणि नैसर्गिक उपाय म्हणजे घरगुती औषधी तेल. आपल्याच स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून तयार केलेलं हे तेल केमिकल फ्री, सुरक्षित आणि केसांसाठी पोषक असतं(Homemade Hair Oil).
केसांसाठी अनेक घरगुती उपाय करताना आपण खास आयुर्वेदातील विशेष असा पोटली तेलाचा प्रकार घरच्याघरीच करु शकतो. 'पोटली तेल' ही एक पारंपरिक आणि आयुर्वेदिक पद्धत आहे, ज्यात विविध औषधी घटक एका कापडी पोटलीत बांधून तेलात उकळवले जातात. हा असरदार, आयुर्वेदिक पारंपरिक उपाय मुळांपासून केसांच्या (Hair Care Tips) टोकांपर्यंत पोषण देणारा असल्याने केसांचे आरोग्य व सौंदर्य जपता येते. आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक केसांसाठी फायदेशीर असे घरगुती पोटली तेल तयार करण्याची सोपी पद्धत पाहूयात.
साहित्य :-
१. एलोवेराच्या पानांचे छोटे तुकडे - १ कप
२. कांदा - १ (छोटा कांदा ४ तुकडे केलेला)
३. मेथी दाणे - २ टेबलस्पून
४. पांढरे तीळ - २ टेबलस्पून
५. खोबरेल तेल - २ ते ३ कप
नेमका उपाय काय आहे ?
सगळ्यात आधी कोरफडीचे एक पान घेऊन ते आधी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर सालीसकटच कोरफडीच्या पानांचे छोटे तुकडे करून घ्यावेत. आता एका मिक्सरच्या भांड्यात सालीसकट कापून घेतलेले कोरफडीचे छोटे तुकडे, कांद्याचे मध्यम आकाराचे तुकडे, मेथी दाणे, पांढरे तीळ असे सगळे जिन्नस एकत्रित करून घालावेत. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून या सगळ्या साहित्याची पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट एका स्वच्छ सुती कापडात बांधून त्याची छोटी पोटली तयार करून घ्यावी. एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन ते हलकं गरम करावं. या गरम तेलात तयार पोटली सोडावी. १० ते १५ मिनिटे तेल मंद आचेवर हलकेच गरम करून घ्यावे. या पोटली मधील सर्व पदार्थांचा अर्क त्या खोबरेल तेलात उतरला पाहिजे. त्यानंतर हे तेल थोडे थंड होऊ द्यावे, थंड झाल्यावर तेल बाटलीत भरून स्टोअर करावे. यासोबतच आपण ही पोटली देखील एका हवाबंद डब्यांत भरून ठेवू शकता.
चेहऱ्यावर तेज-केस काळेभोर, क्या है राज? फक्त १ बटाटा, हा घरगुती उपाय शंभर टक्के असरदार...
खोबरेल तेल-दही आणि १ केळं, त्वचेवर काचेसारखी चमक आणणारा इन्स्टंट उपाय...
या तेलाचा वापर कसा करावा ?
हे तेल आपण आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांवर लावू शकता. हे तेल केसांवर लावण्याची एक वेगळी पद्धत आहे. आपण तयार केलेल्या पोटलीवर थोडे तेल ओतून मग ही पोटलीच थेट स्काल्पवर चोळून तेल लावून घ्यावे. तसेच ही पोटली स्काल्पवर चोळून केसांच्या मुळांना मसाज करून घ्यावा.
केसांत कोंडा, उपाय ओवा! म्हणाल, इतके दिवस इतका सोपा उपाय का नाही समजला...
हे तेल वापरण्याचे फायदे...
१. एलोवेरा :- एलोवेरा केसांच्या मुळांना थंडावा देतो आणि खूप गाळणं कमी करतो.
२. कांदा :- कांदा केसांच्या वाढीस मदत करून टक्कल पडण्याची शक्यता कमी करतो.
३. मेथी दाणे :- मेथी दाणे केसांना मजबूती देतात आणि कोंडा दूर करतात.
४. पांढरे तीळ :- पांढरे तीळ केसांना नैसर्गिक चमक देतं आणि कोरडेपणा कमी करतं.
५. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांना पोषण देतं, मऊमुलायम करते.