lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > उन्हामुळे चेहरा काळवंडला? चमक हरवली? बटाट्याच्या रसात मिसळा ३ पैकी १ गोष्ट; चेहरा चमकेल..

उन्हामुळे चेहरा काळवंडला? चमक हरवली? बटाट्याच्या रसात मिसळा ३ पैकी १ गोष्ट; चेहरा चमकेल..

Potato Face Pack for Skin Whitening : चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावण्याचे फायदे किती? यामुळे टॅनिंग दूर होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 02:42 PM2024-04-26T14:42:05+5:302024-04-26T14:43:43+5:30

Potato Face Pack for Skin Whitening : चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावण्याचे फायदे किती? यामुळे टॅनिंग दूर होते?

Potato Face Pack for Skin Whitening | उन्हामुळे चेहरा काळवंडला? चमक हरवली? बटाट्याच्या रसात मिसळा ३ पैकी १ गोष्ट; चेहरा चमकेल..

उन्हामुळे चेहरा काळवंडला? चमक हरवली? बटाट्याच्या रसात मिसळा ३ पैकी १ गोष्ट; चेहरा चमकेल..

उन्हाळा सुरु होताच जीवाची जीवाची लाही-लाही होते (Skin Care Tips). शरीर आतून डिहायड्रेट तर होतेच, शिवाय स्किन काळवंडते. टॅनिंग घालवण्यासाठी आपण ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतो. पण ब्यूटी पार्लरमध्ये केमिकल्स उत्पादनांचा वापर होतो. ज्यामुळे स्किन खराब होण्याची शक्यता जास्त असते (Potato for Skin). शिवाय खर्चही जास्त होतो. यावर पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरातच बटाट्याच्या रसाचा वापर करून टॅनिंग घालवू शकता. पण बटाट्याच्या रसाचा वापर टॅनिंग घालवण्यासाठी कशा पद्धतीने करावे? याच्या वापराने चेहऱ्यावरील टॅन, सनबर्न आणि मुरुमांचे डाग निघतील का?(Potato Face Pack for Skin Whitening).

टॅनिंग घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर कसा करावा?

सर्वप्रथम, एक बटाटा घ्या, किसणीने किसून त्याचा रस काढा. त्यानंतर कापसाचा गोळा घ्या. बटाट्याच्या रसात बुडवून चेहरा आणि स्किनवर लावा. १० ते १५ मिनिटांसाठी तसच ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. आपण आठवड्यातून दोनदा या रसाचा वापर चेहऱ्यावर करू शकता.

दिवसभर नाही तर, झोपण्यापूर्वी घ्या केसांची 'अशी' काळजी; केस गळती थांबेल; वाढतील इतके की..

बटाट्याचा रस आणि मध

टॅनिंग आणि डाग दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसात मध घालून चेहऱ्याला लावा. एका वाटीत ३ चमचा बटाट्याचा रस घ्या. त्यात २ चमचा मध घालून मिक्स करा. तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटानंतर पाण्याने चेहरा आणि मान स्वच्छ धुवून घ्या. यामुळे टॅनिंग दूर होईल. 

बटाट्याचा रस आणि मुलतानी माती

टॅनिंग घालवण्यासाठी आपण बटाट्याचा फेसपॅक तयार करू शकता. यासाठी एका वाटीत २ चमचे मुलतानी माती घ्या. त्यात बटाट्याचा रस घालून पेस्ट तयार करा. तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा. पेस्ट कोरडी झाल्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या. टॅनिंग घालवण्यासाठी आपण या फेसपॅकचा वापर आठवड्यातून दोन वेळा करू शकता.

ना रस - ना पेस्ट; ५ रुपयांच्या काकडीने करा फेशिअल; चेहरा करेल ग्लो - टॅनिंग होईल गायब

बटाट्याचा रस आणि दूध

दूध चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते. त्यात लॅक्टिक अ‍ॅसिड आणि प्रोटीन असते. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार दिसते. यासाठी एका बाऊलमध्ये समप्रमाणात दूध आणि बटाट्याचा रस घेऊन मिक्स करा. कापसाच्या मदतीने संपूर्ण मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही वेळासाठी घासा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसात त्वचा उजळेल.

स्किनसाठी बटाट्याच्या रसाचे फायदे

बटाट्यामध्ये राइबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी पोषक घटक आढळते. जे चेहऱ्यावरचे डाग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. शिवाय त्यात जीवनसत्व क असते. ज्यामुळे चेहऱ्याला फायदेच फायदे मिळतात. 

Web Title: Potato Face Pack for Skin Whitening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.