'आई होणे' हा प्रत्येकीच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण असतो, परंतु प्रसूतीनंतर अनेक महिलांना काही नकोशा शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. हार्मोनल बदलांमुळे झपाट्याने होणारी केसगळती आणि चेहऱ्यावर उमटणारे पिगमेंटेशन यामुळे अनेकजणी चिंतेत असतात. या बदलांचा परिणाम थेट केस आणि त्वचेवर दिसून येतो. बाळाच्या जन्मानंतर अनेक महिलांना केस गळण्याची समस्या जाणवते, तर काहींना चेहऱ्यावर पिगमेंटेशन, काळे डाग किंवा त्वचेचा निस्तेजपणा वाढलेला दिसतो. अशा परिस्थितीत, महागडे उपचार करण्याऐवजी आहारातूनच योग्य पोषण मिळाले तर या समस्या हळूहळू नैसर्गिक पद्धतीने कमी होऊ शकतात. प्रसूतीनंतरच्या काळात केस गळणे आणि पिगमेंटेशन अशा समस्यां फारच कॉमन असल्या तरी, या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून 'भोपळ्याच्या बिया' (Pumpkin Seeds) एक वरदान ठरू शकतात(how pumpkin seeds help postpartum hair loss & skin problem).
लोह, झिंक आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सचा खजिना असलेल्या या बिया फक्त केसांची मुळे मजबूत करत नाहीत, तर त्वचेचा नैसर्गिक ग्लो परत मिळवून देण्यासही मदत करतात. प्रसूतीनंतरच्या काळात शरीराला आवश्यक असलेले पोषण पुरवण्यासाठी आणि त्वचा तसेच केसांच्या समस्या मुळापासून संपवण्यासाठी भोपळ्याच्या बिया कशा (post pregnancy hair fall & skin problem) फायदेशीर ठरताता आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत ते पाहूयात(pumpkin seeds benefits for hair & skin).
प्रसूतीनंतर होणारी केसगळती आणि पिगमेंटेशनवर गुणकारी...
एका संकेतस्थळा दिलेल्या मुलाखतीनुसार, आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सुगंधा शर्मा यांच्या मते, प्रसूतीनंतर होणारी केसगळती ही प्रामुख्याने पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आणि हार्मोनल बदलांमुळे होते. बाजारात उपलब्ध असलेली महागडी हेअर केअर ब्यूटी प्रॉडक्ट्स अनेकदा तात्पुरती असतात किंवा त्यांचा हवा तसा परिणाम मिळत नाही, अशावेळी शरीराला आतून पोषण देणे महत्त्वाचे असते. जर प्रसूतीनंतर केसगळती आणि पिगमेंटेशनचा प्रचंड त्रास होत असेल, तर भोपळ्याच्या बिया आपल्या डेली आहारात समाविष्ट करणे हा एक उत्तम उपाय आहे.
या बियांमध्ये आयर्न, कॉपर, झिंक, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामध्ये व्हिटॅमिन B1, B2, B9, B6 आणि व्हिटॅमिन E सारखे महत्त्वाचे मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात. हे घटक केवळ केसगळती थांबवत नाहीत, तर नवीन केसांच्या वाढीसाठीही मदत करतात. या बिया त्वचा निरोगी ठेवण्यासाठीही गुणकारी आहेत.
भोपळ्याच्या बियांमध्ये असणारे नैसर्गिक घटक केवळ केसगळती थांबवत नाहीत तर नवीन केसांच्या वाढीसाठीही मदत करतात. प्रसूतीनंतर चेहऱ्यावर येणारे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बिया खाणे खूप फायदेशीर ठरते. डॉ. सुगंधा शर्मा यांच्या मते, रोज एक चमचा भोपळ्याच्या बिया रात्री पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि सकाळी नाश्त्यामध्ये चावून खाव्यात.
