Join us

स्वयंपाकघरातील ‘हे’ खास इटुकले दाणे चेहऱ्यावर करतात जादू! मुरुम-पिग्मेंटेशनचे डाग काहीच दिवसात गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2025 16:05 IST

Natural glow with khaskhas: Clear skin home remedy: Anti-acne home remedy: स्वयंपाकघरात आढळणारे इटुकले दाणे त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकतात. ज्यामुळे मुरुम- पिग्मेंटेशनचा त्रास कमी होईल, जाणून घेऊया त्याबद्दल.

वाढत्या वयात सुंदर दिसण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण महागड्या पार्लरमध्ये जातात. (Skin care tips) बोटॉक्स, फेशियल, बीचसारख्या महागड्या ट्रिटमेंट चेहऱ्यासाठी करतात.(Natural glow with khaskhas) परंतु, यामुळे त्वचा उजळण्याऐवजी ती अधिक खराब दिसू लागते. चेहऱ्याला तजेलदार आणि चमकदार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या युक्त्या वापरतो.(Skin glowing tips) परंतु, स्वयंपाकघरातील असे काही पदार्थ आहेत. जे आपली त्वचा उजळण्यास मदत करतात.(Clear skin home remedy)महागड्या क्रीम्स आणि उत्पादनाचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होतो. इतकेच नाही तर त्वचेचा पोत देखील खराब होतो. आपल्यापैकी अनेकजण त्वचेसाठी आयुर्वेदिक घटकांचा वापर करतात.(Anti-acne home remedy) पण स्वयंपाकघरात आढळणारे इटुकले दाणे त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकतात. ज्यामुळे मुरुम- पिग्मेंटेशनचा त्रास कमी होईल, जाणून घेऊया त्याबद्दल. 

रात्री तुरटीमध्ये मिसळून लावा 'हे' २ पदार्थ, सकाळी उठताच त्वचेवर येईल ग्लो-पिंपल्सही जातील

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी स्वयंपाकघरात आढळणारे खास इटुकले दाणे चेहऱ्यावर जादू करतात. ज्यामुळे पिग्मेंटेशन आणि डाग कमी होण्यास मदत होईल. खसखस आपल्या त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. यात चेहऱ्यावरील तेल नैसर्गिकरित्या कमी करता येते. तसेच कोरड्या, रुक्ष त्वचेला मऊ आणि हायड्रेट करता येते. खसखसमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील मृत पेशी कमी करुन चेहऱ्याला चमक आणण्यास मदत करतात. तसेच त्वचा लालसर किंवा पुरळ येत असतील तर यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. 

चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणण्यासाठी आपल्याला ३ चमचे खसखस घ्यावी लागेल. रात्रभर गुलाब पाण्यात भिजवून सकाळी मिक्सरमध्ये बारीक करा. यात मॅश केलेले केळे, कोरफड जेल आणि मध मिसळून त्वचेला लावा. ज्यामुळे त्वचा चमकदार होते. तसेच मुरुम कमी होण्यास आणि त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. सुरकुत्या देखील कमी होतात. आठवड्यातून ३ वेळा हा खास उपाय केल्यास डार्क सर्कल, मुरुमे कमी होतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी