आपलं एक सुंदर हसू हजारो शब्द बोलून जातात, असं म्हटलं जातं. पण जर हसताना आपले दात पिवळे दिसत असतील तर सगळ्यात आधी आपला आत्मविश्वास डळमळीत होतो.(How to whiten yellow teeth fast) आजच्या काळात चहा-कॉफीचे अतिसेवन, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन किंवा दातांची नीट स्वच्छता न राखल्यामुळे दातांवर पिवळट थर (Plaque) जमा होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेकदा आपण लोकांमध्ये वावरताना, फोटो काढताना किंवा मोकळेपणाने हसताना लाजतो, कारण आपले दात पांढरे शुभ्र नसतात. (Teeth whitening home remedies)
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण महागड्या ट्रिटमेंट्सही घेतो. पण यामुळे दातांच्या इनॅमलला हानी होते. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही नैसर्गिक गोष्टी आहेत, ज्यांचा योग्य वापर केल्यास दातांवरील हट्टी पिवळेपणा सहज दूर होऊ शकतो.(Get rid of yellow teeth at Home) महागड्या टूथपेस्टच्या जाहिरातींना बळी पडण्यापेक्षा, घरगुती उपायांनी आपले दात पुन्हा चमकदार बनवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, दात पांढरे शुभ्र करण्यासाठी काही उपाय.
रोज सायंकाळी 'हे ' प्यायल्याशिवाय मला काही सुचत नाही! करीना कपूर सांगते तिच्या व्यसनाची डेंजर गोष्ट
1. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस हा जुना पण सगळ्यात प्रभावी उपाय मानला जातो. बेकिंग सोडामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. तर लिंबात असणारे सायट्रिक अॅसिड दातांवरील डाग काढून टाकण्यास मदत करते. एका छोट्या वाटीत अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. तयार झालेली पेस्ट बोटाने किंवा ब्रशने दातांवर हलक्या हाताने घासून १ मिनिट ठेवा आणि नंतर चूळ भरा. आठवड्यातून फक्त एकदा हा प्रयोग केल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होईल.
2. मोहरीचे तेल आणि मीठ हा उपाय आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून चालत आलेला पारंपरिक उपाय आहे. मिठातील सोडियम आणि मोहरीच्या तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म दातांचा पिवळेपणा तर दूर करतातच, शिवाय हिरड्यांनाही मजबुती देतात.
3. केळीच्या सालीमध्ये त्यात पोटॅशियम, मँग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, जे दातांना पांढरे करण्यास मदत करतात. केळीच्या सालीचा आतील पांढरा भाग दातांवर रोज १-२ मिनिटे घासा. त्यानंतर साध्या पाण्याने तोंड धुवा. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्याने याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
4. डॉक्टर म्हणतात दिवसातून दोन वेळा ब्रश करणं पुरेसं नाही. तर योग्यरित्या ब्रश करणे ददेखील महत्त्वाच आहे. नेहमी मऊ ब्रिस्टल्स असलेला ब्रश निवडा. ब्रशला ४५ अंशाच्या कोनात ठेवा. गोलाकार हालचालींमध्ये हळूवारपणे ब्रश करा. कमीत कमी २ मिनिटे ब्रश करा. ज्यामुळे दात व्यवस्थित स्वच्छ होण्यास मदत होईल.
