केस पांढरे (Grey Hairs) होण्याच्या समस्येनं बरेचजण त्रासलेले असतात. कमी वयात लोकांना केस गळणं, केस कमकुवत होणं अशा समस्या उद्भवतात. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी बाजारात बरेच हेअर कलर्स उपलब्ध आहेत. या केमिकल्सयुक्त हेअर डायच्या वापरामुळे ठराविक वेळेनंतर केस सतत पांढरे होतात.
केसांना नैसर्गिकरित्या पांढरे बनवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. केसांना नैसर्गिक काळा रंग देण्यासाठी तुम्ही नॅच्युरल हेअर कलरचा वापर केला तर केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. याशिवाय केसांची गुणवत्ताही चांगली राहील.तसंच केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. ( Pinch Of Black Turmeric Can Turn White Hairs)
केसांना काळे करण्यासाठी चमचाभर हळदीचा वापर
पांढऱ्या केसांना काळे बनवण्यासाठी तुम्हाला २ चमचे हळद लागेल. एका कढईत किंवा तव्यावर १ चमचा हळद घालून भाजून घ्या. हळद एकदम मंद आचेवर भाजून घ्या अन्यथा ती जळू शकते. हळद काळी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. यात कोणत्याही प्रकारचं तेल मिसळू नका. हळदीची पावडर कढईत घालून सुकीच भाजून घ्या. हळद काळी झाल्यावर गॅस बंद करा.
न लाटता, न पीठ मळता करा १ वाटी गव्हाच्या पीठाचा पोळा; ५ मिनिटांत बनेल कुरकुरीत पोळा
नंतर त्यात १ चमचा चहा पावडर घाला. कढईत १ कप पाणी उकळू द्या. कमीत कमी ४ ते ५ मिनिटं उकळल्यानंतर जेव्हा पाणी अर्ध राहील तेव्हा गॅस बंद करा. नंतर चहा पावडर उकळल्यानंतर त्यात पाण्यात १ चमचा काळी हळद मिसळा यात थोडं एलोवेरा जेल घाला. एक व्हिटामीन ई कॅप्सूलचं तेल काढून त्यात घाला. नंतर जवळपास २ चमचे मेहेंदी मिसळा. मेहेंदी एकदम फ्रेश आणि हिरवी असायला हवी. ज्यामुळे केसांना चांगला रंग येईल.
हे पदार्थ एकजीव करून केसांना लावून ठेवा जवळपास २ तास तसंच लावून ठेवा. केसांना शॉवर कॅपनं कव्हर करा नंतर साध्या पाण्यानं केस स्वच्छ धुवा. हळद, चहा पावडर, मेहेंदी, एलोवेरा जेल हे तयार पदार्थ आठवड्यातून एकदा केसांना लावा ज्यामुळे केस नॅच्युरली काळेभोर होण्यास मदत होईल.
Web Summary : Combat grey hair naturally with a homemade turmeric dye. This simple remedy uses turmeric, tea powder, and other natural ingredients for healthier, darker hair without harsh chemicals. Regular use promotes natural black hair.
Web Summary : घर पर हल्दी की डाई से सफेद बालों से स्वाभाविक रूप से लड़ें। यह सरल उपाय हल्दी, चाय पाउडर और अन्य प्राकृतिक सामग्री का उपयोग करता है, जो कठोर रसायनों के बिना स्वस्थ, काले बालों के लिए है। नियमित उपयोग से प्राकृतिक काले बालों को बढ़ावा मिलता है।