Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त २ रुपयांच्या शाम्पूने करा घरच्याघरीच पेडीक्युअर! नको महागडे उपाय - काळेपणा होईल कमी, पाय दिसतील सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2026 19:05 IST

pedicure at home with shampoo : homemade pedicure with shampoo : २ रुपयांचा शाम्पू पाऊच आणि पार्लरसारखे पेडीक्युअर घरच्याघरीच, पाहा नेमके कसे करायचे ?

सुंदर, देखणा चेहरा कोणाला आवडत नाही? पण चेहऱ्याची काळजी घेताना आपण अनेकदा पायांकडे दुर्लक्षच करतो. फाटलेल्या टाचा आणि काळवंडलेले पाय यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व खराब दिसू शकतं. दिवसभर धावपळ केल्यामुळे आपल्या पायांवर धूळ, माती आणि टॅनिंग जमा होतं. पाय स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी अनेकजणी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. पायांची योग्य ती काळजी घेण्यासाठी अनेकजणी पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करून घेतात, पण त्यासाठी वेळ आणि पैसे दोन्ही खर्च करावे लागतात. परंतु, घरच्याघरीच अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चातही पायांची चांगली निगा राखता येऊ शकते. त्यासाठी महागड्या प्रॉडक्ट्सची गरज नसते, तर अगदी २ रुपयांच्या शाम्पूच्या छोट्या पाऊचचा वापर करूनही पायांचे छान घरच्याघरीच पेडिक्युअर करता येते(homemade pedicure with shampoo).

भेगा पडलेल्या टाचा आणि काळवंडलेले पाय यामुळे अनेकदा आपण चारचौघात पाय लपवतो. पण आता पायांचे पेडिक्युअर करण्यासाठी महागड्या उपायांची गरजच नाही. २ रुपयांचा शाम्पू आणि घरगुती नेहमीच्या वापरातील पदार्थांपासून आपण घरच्याघरीच एक फायदेशीर असे 'फूट स्पा' तयार करू शकता. ही पद्धत केवळ पाय स्वच्छ करत नाही, तर पायांना (pedicure at home with shampoo) खोलवर ओलावा देऊन त्यांना फ्रेश ठेवते. फक्त १५ मिनिटांत पायांवरील साचलेली घाण, टॅनिंग आणि डेड स्किन काढून टाका. ही स्वस्त आणि मस्त ट्रिक वापरून तुमचे पाय गुलाबाच्या पाकळ्यांसारखे मऊ होतील, कसे ते पाहा... 

शाम्पू वापरुन घरच्याघरीच पायांचे पेडिक्युअर नेमकं कस करायचं ? 

१. शाम्पू पाऊच - १ किंवा २२. कोमट पाणी - १ ते २ बादल्या ३. लिंबू आणि लिंबाचा रस - ३ ते ४ टेबलस्पून (दोन भागात कापलेले)४. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून५. पाय घासण्यासाठी ब्रश किंवा प्युमिस स्टोन (Pumice Stone)६. मॉइश्चरायझर / खोबरेल तेल - २ ते ३ टेबलस्पून७. साखर - १ टेबलस्पून ८. हळद - १ टेबलस्पून 

पेडिक्युअर करण्याची योग्य पद्धत :- 

१. नेलपेंट काढा आणि नखे कापा :- सर्वात आधी जुनी नेलपेंट रिमूव्हरने स्वच्छ पुसून घ्या. तुमची नखे वाढली असतील तर ती व्यवस्थित आकारात कापून घ्या.

२. शाम्पूच्या पाण्यात पाय भिजवा :- एका टबमध्ये पाय सोसू शकतील इतपत कोमट पाणी घ्या. त्यात १ पूर्ण शाम्पू पाऊच टाका आणि फेस तयार करा. या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून शांत बसा. यामुळे पायांवरील साचलेली घाण मऊ होते आणि थकवाही दूर होतो.

बॉलिवूड अभिनेत्रींचे ८ पेस्टल साडी लुक्स ठेवतील तुम्हांला 'कुल'! नकोसा वाटणारा उन्हाळाही होईल सुसह्य, दिसाल सुंदर...

३. लिंबू आणि सोड्याचा वापर :- आता लिंबाच्या अर्ध्या फोडीवर थोडा बेकिंग सोडा, साखर, हळद आणि शाम्पू घ्या. हे लिंबू तुमच्या पायांच्या बोटांवर, टाचांवर आणि जिथे काळेपणा जास्त आहे तिथे ५ मिनिटे हलक्या हाताने घासा. लिंबामधील सायट्रिक ॲसिड नैसर्गिक ब्लिचिंगचे काम करते, ज्यामुळे पाय लगेच उजळतात.

४. डेड स्किन काढून टाका :- एका जुन्या टूथब्रशने किंवा फूट स्क्रबरने नखांच्या कडा आणि टाचा व्यवस्थित घासा. यामुळे पायांवरील मृत त्वचा निघून जाईल आणि पाय मऊ होतील.

पोट साफ नाही, तासंतास वॉशरुममध्ये बसता? वाटीभर दही आणि गुळाचा हा उपाय एकदम असरदार...

५. पाय स्वच्छ धुवा :- पाय घासून झाल्यावर साध्या स्वच्छ पाण्याने पाय धुवा आणि मऊ टॉवेलने कोरडे करा.

६. मॉइश्चरायझिंग :- पेडिक्युअर झाल्यावर पाय कोरडे पडू नयेत म्हणून चांगल्या मॉइश्चरायझरने किंवा खोबरेल तेलाने ५ मिनिटे मसाज करा. यामुळे पायांना ओलावा मिळतो आणि टाचांना भेगा पडत नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : DIY Pedicure: Get beautiful feet at home with shampoo for ₹2!

Web Summary : Skip expensive parlors! This simple DIY pedicure using shampoo, lemon, baking soda, and sugar cleanses, exfoliates, and moisturizes feet, removing tan and dead skin for soft, beautiful results at minimal cost.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी