Lokmat Sakhi >Beauty > ५ रुपयांत करा पार्लसारखं पेडिक्युअर घरच्याघरी, टाचा होतील मऊ मुलायम- टॅनिंगही गायब

५ रुपयांत करा पार्लसारखं पेडिक्युअर घरच्याघरी, टाचा होतील मऊ मुलायम- टॅनिंगही गायब

Parlour style pedicure at home: pedicure at home in 5 rupees: Budget-friendly foot spa tips: ५ रुपयांत आपण पायांवरचे टॅनिंग आणि काळपटपणा घालवू शकतो. तसेच रखरखीत झालेल्या टाचा पुन्हा भरुन काढू शकतो. पाहूया कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 13:42 IST2025-06-06T13:37:45+5:302025-06-06T13:42:24+5:30

Parlour style pedicure at home: pedicure at home in 5 rupees: Budget-friendly foot spa tips: ५ रुपयांत आपण पायांवरचे टॅनिंग आणि काळपटपणा घालवू शकतो. तसेच रखरखीत झालेल्या टाचा पुन्हा भरुन काढू शकतो. पाहूया कसे

Parlour type pedicure in home just 5 rupees foot care tips beauty hacks tanning and soft crack heels skin care tips | ५ रुपयांत करा पार्लसारखं पेडिक्युअर घरच्याघरी, टाचा होतील मऊ मुलायम- टॅनिंगही गायब

५ रुपयांत करा पार्लसारखं पेडिक्युअर घरच्याघरी, टाचा होतील मऊ मुलायम- टॅनिंगही गायब

चेहऱ्याची काळजी जितकी महत्त्वाची आहे तितकीच आपल्या पायांची देखील काळजी घ्यायला हवी.(Parlour style pedicure at home) बऱ्याचदा आपण पायांकडे दुर्लक्ष करतो. सतत पाण्यात किंवा धुळीत राहिल्याने पाय खराब होतात. उन्हामुळे पायांवर टॅनिंग होते.(Home pedicure for soft feet) चप्पल किंवा सँडलमुळे पायांना जखमा होतात. अनेकदा पायांना त्या नवीन चपला चावतात. त्यामुळे पाय काळे, खडबडीत आणि निर्जीव होतात. (Easy pedicure at home step by step)
आपण पाय सुंदर आणि चांगले दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे पेडिक्युअर करतो.(Soft feet tips at home) यासाठी आपल्याला अधिक पैसै खर्च करावे लागतात. (Foot care routine at home)परंतु ५ रुपयांत आपण पायांवरचे टॅनिंग आणि काळपटपणा घालवू शकतो. तसेच रखरखीत झालेल्या टाचा पुन्हा भरुन काढू शकतो. पाहूया कसे (Natural cure for dry and cracked heels)

लांबसडक केसांसाठी घरगुती उपाय! मेथी दाण्याच्या पाण्यात मिसळा २ पदार्थ, मुळापासून होईल केसांची वाढ- फाटेही फुटणार नाही

पायांवरील डाग काढण्यासाठी आणि त्यांना गोरे करण्यासाठी आपल्याला महागड्या क्रीम किंवा उपचारांची आवश्यकता नाही. परंतु आपल्या स्वयंपाकघरात आढळणारी एक गोष्ट आपले पाय मऊ, स्वच्छ आणि चमकदार करतील. त्यासाठी जास्त पैसे देखील खर्च करण्याची गरज नाही. बेकिंग सोडा हा पदार्थातच नाही तर आपल्या सौंदर्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत होते. तसेच त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत करते. याचा वापर कसा करायचा पाहूया. 

सगळ्यात आधी पाण्यात टब किंवा बादलीमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात आपले पाय घाला. या पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा, अर्ध्या लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि शाम्पू घालून चांगले मिसळा. या मिश्रणात आपले पाय सुमारे १५ मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे त्वचेवरील घाण आणि मृत त्वचा काढण्यास मदत होईल. तसेच पाय आपण ब्रशच्या मदतीने देखील घासू शकतो. 

कोरडी त्वचा, केसांचं वाटोळं झालं? रोज सकाळी प्या खास ड्रिंक, केसांसह चेहऱ्याच्या सौंदर्यात होईल वाढ

पायांसाठी स्क्रब तयार करण्यासाठी आपण चमचाभर कॉफी पावडर, तांदळाचे पीठ, मध आणि लिंबाचा रस एकत्र करुन याचे मिश्रण पायांना लावा. व्यवस्थितपणे पायाला स्क्रबिंग करुन टॅनिंग काढून टाकण्यास आणि त्वचा मऊ होण्यास मदत होईल. स्क्रबिंग केल्यानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चराझर करा. ज्यामुळे त्वचा हायड्रेट आणि गुळगुळीत राहिल. 

Web Title: Parlour type pedicure in home just 5 rupees foot care tips beauty hacks tanning and soft crack heels skin care tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.