Join us  

१ चमचा कॉफीचा ‘हा’ खास फेसपॅक, घरीच फेशियल करा टॅनिंग गायब-५ मिनिटांत चेहरा चमकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 2:14 PM

Parlour Like Bridal Glow Fecial At Home : ) चेहऱ्याचं टॅनिंग निघून जाण्यासाठी नेहमी नेहमी पार्लरमध्ये पैसे घालवण्याची काहीच  गरज नाही घरच्याघरी सोप्या पद्धतीने तुम्ही चेहऱ्यावरचं टॅनिंग काढून टाकू शकता.

उन्हाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यांवर  टॅनिंग येणं खूपच कॉमन आहे. चेहऱ्यावरचे टॅनिंग निघून जाण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिटमेंट्स घेतात तर काहीजण चेहऱ्याला सतत फेसपॅक लावतात, फेशियल करतात. (How to Do Fecial At Home) चेहऱ्याचं टॅनिंग निघून जाण्यासाठी नेहमी नेहमी पार्लरमध्ये पैसे घालवण्याची काहीच  गरज नाही घरच्याघरी सोप्या पद्धतीने तुम्ही चेहऱ्यावरचं टॅनिंग काढून टाकू शकता. यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहूया. (Easy Ways To Fecial At Home) 

घरच्याघरी फेशियल करण्याची सोपी पद्धत कोणती?

१) सगळ्यात आधी एका वाटीत चमचाभर कॉफी घ्या,  त्यात चमचाभर मध घाला, चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण  एकजीव करून चेहऱ्याला लावा आणि हाताने व्यवस्थित स्क्रब करा. 

२) स्क्रबिंगमुळे चेहऱ्याचा काळेपणा निघून जाण्यास मदत होईल आणि चेहऱ्यावरच्या मृतपेशी निघून जातील. स्क्रबिंगसाठी तुम्हाला कॉफी पावडर आणि मधाची आवश्यकता असेल.

३)  दुसऱ्या स्टेपमध्ये कॉफी पावडर, चण्याचं पीठ, हळद आणि दही घ्या, तिसऱ्या स्टेपमध्ये फेस क्रिम घ्या कॉफी पावडर, एलोवेरा जेल, व्हिटामीन ई घ्या. सगळ्यात आधी स्किन क्लिअर करण्यासाठी २ टेबलस्पून कच्च्या दूधात १ चमचा कॉफी पावडर घालून व्यवस्थित मिसळा. नंतर हे मिश्रण एका कॉटन बॉलमध्ये बुडवून  हळू हळू चेहऱ्यावर अप्लाय करा.  त्यानंतर ३ मिनिटं सर्क्युलर मोशनमध्ये रब करा. त्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. 

१ टेबलस्पून कॉफी पावडर घेऊन त्यात १ टेबलस्पून तांदूळाचे बारीक  पीठ आणि हळद मिसळा. या मिश्रणात थोडं पाणी घाला त्यानंतर सर्क्युलर मोशनमध्ये  आपल्या त्वचेवर लावून स्क्रब करा. दुसरी पद्धत अशी की, अर्धा टेबल स्पून कॉफीमध्ये अर्धा टेबलस्पून चंदन पावडर मिसळा. याव्यतिरिक्त १ टेबलस्पून बेसन आणि पाणी घालून एक घट्ट पेस्ट बनवून घ्या. नंतर हा फेस पॅक चेहऱ्याला आणि मानेच्या त्वचेला लावा. 

२० मिनिटं तसंच सोडून द्या. त्यानंतर फ्रेश पाण्याने चेहरा धुवून घ्या. कॉफी फेस मास्क वेडींग सिजनसाठी उत्तम ठरतो याशिवाय त्वचेवरही चांगला ग्लो येतो. अर्धा टेबलस्पून कॉफी पावडर आणि अर्धा टेबल्सपून मध व्यवस्थित मिसळा. नंतर डोळ्यांना चारही बाजूंनी लावा त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी