Lokmat Sakhi >Beauty > पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क लावा, चेहऱ्यावर येईल सोनसळी सौंदर्य -ओपन पाेर्स कायमचे जातील...

पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क लावा, चेहऱ्यावर येईल सोनसळी सौंदर्य -ओपन पाेर्स कायमचे जातील...

Papaya Leaves FaceMask For Open Pors : papaya leaves for open pores : natural open pores treatment : papaya leaves skincare : homemade face mask for pores : papaya leaves benefits for skin : ओपन पोर्स स्वच्छ करून ते बंद करण्यासाठी फायदेशीर आहे पपईच्या पानांचा घरगुती फेसमास्क...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 14:29 IST2025-08-12T14:11:43+5:302025-08-12T14:29:06+5:30

Papaya Leaves FaceMask For Open Pors : papaya leaves for open pores : natural open pores treatment : papaya leaves skincare : homemade face mask for pores : papaya leaves benefits for skin : ओपन पोर्स स्वच्छ करून ते बंद करण्यासाठी फायदेशीर आहे पपईच्या पानांचा घरगुती फेसमास्क...

Papaya Leaves FaceMask For Open Pors papaya leaves for open pores natural open pores treatment papaya leaves skincare papaya leaves benefits for skin | पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क लावा, चेहऱ्यावर येईल सोनसळी सौंदर्य -ओपन पाेर्स कायमचे जातील...

पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क लावा, चेहऱ्यावर येईल सोनसळी सौंदर्य -ओपन पाेर्स कायमचे जातील...

त्वचेवरील ओपन पोर्सची समस्या फारच कॉमन आणि अगदी सगळ्यांचजणींना ठराविक वय झाल्यावर जाणवते. ओपन पोर्स ही त्वचेच्या समस्यांपैकी एक समस्या असली तरी वेळीच योग्य लक्ष न दिल्यास त्वचेच्या अनेक समस्या वाढू लागतात. ओपन पोर्स म्हणजे त्वचेवरील बारीक छिद्र उघडतात, या उघड्या छिद्रांमध्ये (Papaya Leaves FaceMask For Open Pors) वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि अतिरिक्त तेल जमा होते, ज्यामुळे मुरुम, ब्लॅकहेड्स आणि चेहऱ्याला (papaya leaves for open pores) निस्तेजपणा येऊ शकतो. त्वचेवरील ओपन पोर्समुळे चेहरा निस्तेज (natural open pores treatment) आणि असमान दिसतो. या छिद्रांमधील साचून राहिलेली घाण वेळीच स्वच्छ करणे गरजेचे असते(papaya leaves benefits for skin).

अनेक महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा  वापर करूनही जर तुम्हाला हवा तसा परिणाम मिळत नसेल, तर काळजी करू नका. या समस्येवर एक सोपा आणि नैसर्गिक उपाय करू शकतो तो म्हणजे  पपईची पाने! पपईच्या पानांतील नैसर्गिक एन्झाइम्स त्वचेतील घाण खोलवरून साफ करुन, पोर्स बंद करतात आणि त्वचेला एक नवीन लुक देतात. यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो आणि ती अधिकच सुंदर दिसते. महागड्या उपचारांवर पैसे खर्च करण्याऐवजी पपईच्या पानांचा घरगुती फेसमास्क कसा तयार करायचा आणि ओपन पोर्सची स्वच्छता कशी ठेवायची ते पाहा... 

ओपन पोर्स स्वच्छ करण्यासाठीचा पपईच्या पानांचा खास उपाय... 

ओपन पोर्स आतून स्वच्छ करण्यासोबतच ते नैसर्गिकरित्या बंद करण्यासाठी पपईची पाने अतिशय फायदेशीर ठरतात. ओपन पोर्सवर असरदार असा पपईच्या पानांचा घरगुती फेसमास्क तयार करण्यासाठी आपल्याला २ ते ३ पपईची पाने, १ टेबलस्पून मध, १ टेबलस्पून बेसन इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

कियारा अडवाणीचा आवडता फेसमास्क, तिच्या चेहऱ्यावर दिसतं तसं तेज आपल्यालाही मिळेल अगदी सहज...

ओपन पोर्सवर पपईची पाने आहेत खास... 

सर्वातआधी पपईची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पपईची बारीक केलेली पाने, प्रत्येकी १ टेबलस्पून बेसन व मध घालावे. त्यानंतर हे सगळे घटक मिक्सरमध्ये एकत्रित फिरवून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आपण हा पपईच्या पानांचा तयार फेसमास्क रोज चेहऱ्यावर लावू शकतो. हा फेसमास्क चेहऱ्यावर लावून हलकेच बोटांच्या मदतीने मसाज करून घ्यावा, जेणेकरून ओपन पोर्समधील घाण, साचलेली धूळ, माती निघून जाईल. १५ ते २० मिनिटे हा फेसमास्क चेहऱ्यावर तसाच लावून ठेवून मग चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

आंघोळीसाठी थंड पाणी वापरावे की गरम? तज्ज्ञ सांगतात, कोणते पाणी जास्त फायद्याचे... 

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

ओपन पोर्स स्वच्छ करण्यासाठी हा फेसमास्क कसा फायदेशीर... 

१. पपईची पाने :- ओपन पोर्समधील मळ व तेल काढून पोर्स खोलवर स्वच्छ आणि घट्ट करतात.

२. मध :- मध त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवत जंतुसंसर्ग रोखतो आणि पोर्स हळूहळू घट्ट करण्यासोबतच आतून स्वच्छ करतो. 

३. बेसन :- बेसन ओपन पोर्स मधील अतिरिक्त तेल शोषून घेत पोर्स टाईट व त्वचा मऊसर करतो.


Web Title: Papaya Leaves FaceMask For Open Pors papaya leaves for open pores natural open pores treatment papaya leaves skincare papaya leaves benefits for skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.