lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?

श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?

Organza silk saree : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीवल्ली रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने नेसलेली ऑर्गेंझा सिल्क साडी सध्या चांगलीच भाव खात असून तिच्या साडीचे लूक्स सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 06:03 PM2022-01-24T18:03:29+5:302022-01-25T13:11:23+5:30

Organza silk saree : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीवल्ली रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने नेसलेली ऑर्गेंझा सिल्क साडी सध्या चांगलीच भाव खात असून तिच्या साडीचे लूक्स सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत..

Organza silk saree of actress Rashmika Mandanna, worth Rs 31k, what is the speciality of Organza silk? | श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?

श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?

Highlights या साडीचा फिलच इतका छान असतो की ती साडी नेसणाऱ्याला आणि बघणाऱ्यालाही तिचा रिचनेस लगेच जाणवतो.

कपड्यांची फॅशन कितीही बदलली तरी साडीची क्रेझ काही कमी होत नाही.. म्हणूनच तर एरवी स्टायलिश कपड्यांमध्ये वावरणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रीही काही विशेष क्षणांसाठी खास साडी नेसणेच पसंत करतात..  आता हेच बघा ना.. अभिनेत्री रश्मिका मंदानाही या गोष्टीला अपवाद नाही. तिने पुष्पा (movie Pushpa) या तिच्या सध्या गाजत असलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनप्रसंगी ऑफ व्हाईट रंगाची ऑर्गेंझा साडी नेसली होती. या साडीतले रश्मिकाचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले असून महिलांना तर तिची ही साडी खूपच आवडते आहे..

 

या साडीविषयी मिळालेली माहिती अशी की साडी फॅशन डिझायनर अंकिता जैन यांनी डिझाईन केली असून या साडीची किंमत तब्बल ३१, ५०० रूपये एवढी सांगितली जात आहे. रश्मिकाच्या या साडीला रॉ सिल्क बॉर्डर असून साडीच्या काठांवर हॅण्ड एम्ब्रॉयडरी केलेली आहे. या साडीच्या पदरावर पुर्णपणे फुलांचे डिझाईन असून तिने या साडीवर पर्ल व्हाईट रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज घातले आहे. रश्मिकाने ही साडी अतिशय सोबर आणि ट्रॅडिशनल पद्धतीने नेसली असून साडीतले तिचे फोटो खरोखरंच खूपच आकर्षक आहेत...

 

काही दिवसांपुर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Organza silk saree  of actress Ankita Lokhande) हिचाही ऑर्गेंझा साडीतला लूक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तिचा वाढदिवस होता. म्हणूनच लग्नानंतरच्या या पहिल्या वाढदिवसासाठी तिने ऑर्गेंझा साडीतला स्पेशल लूक केला होता. अंकिताची ही साडी JJ Valaya organza silk या ब्रॅण्डची होती आणि साडीची किंमत तब्बल ८० हजार रूपये होती.  

 

कसे असते ऑर्गेंजा सिल्क?
What is Organza silk?

नायलॉन आणि पॉलिस्टर धाग्यांचा वापर करून ऑर्गेंजा सिल्क बनविण्यात येते. हे कापड खूपच मऊ, मुलायम (fabric of Organza silk) आणि वजनाने खूपच (light weight saree) कमी असते ही त्याची खरी खासियत. जेवढे मऊ आणि वजनाला हलके कापड असते, तेवढी त्याची किंमत जास्त असते. पार्टी वेअर कपडे किंवा ब्रायडल कपड्यांसाठी खास करून ऑर्गेंजा सिल्क वापरण्यात येते. ऑर्गेंजा सिल्क साड्यांची तर चांगलीच क्रेझ आहे, पण त्यासोबतच पार्टी गाऊन, लेहेंगा, दुपट्टा, ब्रायडल आऊटफिट्स यामध्येही आता ऑर्गेंजा सिल्कचा वापर केलेला दिसून येतो आणि तो देखील खूपच लोकप्रिय होत आहे. फ्लोरल प्रिंट, बुटी प्रिंट याप्रमाणेच आता जॅकर्ड पॅटर्नही ऑर्गेंजा सिल्कमध्ये दिसत आहे. या साडीचा फिलच इतका छान असतो की ती साडी नेसणाऱ्याला आणि बघणाऱ्यालाही तिचा रिचनेस लगेच जाणवतो. स्पेशली स्टायलिश लूक मिळविण्यासाठी साडी ही साडी नेसली जाते.


 

Web Title: Organza silk saree of actress Rashmika Mandanna, worth Rs 31k, what is the speciality of Organza silk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.