Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > गळक्या-निस्तेज-पांढऱ्या केसांसाठी कांदा म्हणजे अमृत, ‘या’ २ पद्धतीने करा कांद्याचा उत्तम उपयोग

गळक्या-निस्तेज-पांढऱ्या केसांसाठी कांदा म्हणजे अमृत, ‘या’ २ पद्धतीने करा कांद्याचा उत्तम उपयोग

Onion Juice Benefits For Hair : केसगळतीकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या जेवणात रोज वापरला जाणारा कांदा खूप फायदेशीर मानला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:06 IST2026-02-05T10:53:49+5:302026-02-05T18:06:42+5:30

Onion Juice Benefits For Hair : केसगळतीकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या जेवणात रोज वापरला जाणारा कांदा खूप फायदेशीर मानला जातो.

Onion is more beneficial for hair, first know how to use onion oil and onion juice for long thick hair | गळक्या-निस्तेज-पांढऱ्या केसांसाठी कांदा म्हणजे अमृत, ‘या’ २ पद्धतीने करा कांद्याचा उत्तम उपयोग

गळक्या-निस्तेज-पांढऱ्या केसांसाठी कांदा म्हणजे अमृत, ‘या’ २ पद्धतीने करा कांद्याचा उत्तम उपयोग

Onion Juice Benefits For Hair : केस जर लांब, दाट आणि चमकदार असले तर ते आपल्या सौंदर्यात दुप्पट भर घालतात. पण आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे सुंदर केसांची इच्छा अपुरीच राहते. अनेकांना केस गळणे, पांढरे होणे, तुटणे अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. केस जर जास्त काळ तुटत राहिले किंवा गळत राहिले तर टक्कल पडण्याचाही धोका असतोच. त्यामुळे केसगळतीकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या जेवणात रोज वापरला जाणारा कांदा खूप फायदेशीर मानला जातो.

कांद्याचा रस किंवा तेल केसांवर असा काही चांगला परिणाम करतो की, केसांच्या समस्या झटक्यात दूर होतील. इतकंच नाही तर आपण महागडे प्रॉडक्ट्स देखील विसराल. कांद्याचा रसाचा नेहमी वापर केल्याने केस दाट, मजबूत, चमकदार होतात. अशात कांद्याच्या रसाचा वापर कसा करावा हे आधी जाणून घेऊन.

कांद्याच्या रसाचे फायदे

कच्च्या कांद्याचा रस केस काळे होण्यास मदत करतो. केस तुटणे व गळणे कमी होते. कांद्यातील सल्फर कोलेजन वाढवतो, त्यामुळे केस मजबूत होतात. हेअर फॉलिकल्स मजबूत होतात व टक्कल पडण्याचा धोका कमी होतो. तसेच नवीन केस उगवण्यास मदत होते. यातील अँटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे स्काल्पवरील संसर्ग कमी होतो. डोक्यातील कोंडा कमी होतो. स्काल्पमध्ये रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांची वाढ होते. आठवड्यातून ३–४ वेळा वापर केल्यास चांगला परिणाम दिसतो.

कांद्याचं तेल लावण्याचे फायदे

कांद्याचं तेल केस वाढीसाठी उपयुक्त एन्झाइम्स असतात. या तेलाने केस जाड, दाट आणि मजबूत होतात. पांढरे केस हळूहळू काळे होण्यास मदत. स्काल्पवरील बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होतं. स्काल्पचा pH बॅलन्स राखतो. तेल नैसर्गिक कंडिशनरसारखं काम करून केस मऊ होतात.

घरीच बनवा कांद्याचं तेल

कांद्याचं तेल तयार करण्यासाठी २०० ग्रॅम खोबऱ्याचं तेल घ्या. त्यात १ मोठा बारीक चिरलेला कांदा आणि १ कप कढीपत्ता घाला. तेल उकळल्यानंतर कांदा घालून ५–१० मिनिटे मंद आचेवर ठेवा. तेल थंड झाल्यावर गाळून बाटलीत साठवा. हे तेल केसांसाठी रोज किंवा शाम्पूच्या आधी वापरा; किमान १ तास तेल लावून ठेवा.

कांद्याचा रस कसा काढावा

कांदा मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करा. सूती कापड किंवा चाळणीतून रस गाळा. बोटांनी केसांच्या मुळांवर चांगला लावा. नियमित वापराने केस गळणे कमी होते.

Web Title : प्याज का रस: बालों के विकास और मजबूती का प्राकृतिक उपाय

Web Summary : प्याज का रस बालों को मजबूत करता है, बालों का झड़ना कम करता है और विकास को बढ़ावा देता है। सल्फर से भरपूर, यह कोलेजन को बढ़ाता है, खोपड़ी के स्वास्थ्य में सुधार करता है, और सफ़ेद बालों को उलट सकता है। सर्वोत्तम परिणामों के लिए प्याज के रस या घर के बने प्याज के तेल का नियमित रूप से उपयोग करें। स्वस्थ खोपड़ी और बालों के लिए जड़ों पर लगाएं।

Web Title : Onion Juice: Your Natural Remedy for Hair Growth and Strength

Web Summary : Onion juice strengthens hair, reduces hair fall, and promotes growth. Rich in sulfur, it boosts collagen, improves scalp health, and may reverse graying. Use onion juice or homemade onion oil regularly for best results. Apply to roots for a healthier scalp and hair.