सुनील शेट्टीची लाडकी लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी कायमच तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी चर्चेत असते. बॉलिवूडमधील अभिनेत्री त्यांच्या फिटनेस आणि सौंदर्याची नेहमीच (Onion hair oil using by Athiya Shetty for soft & shiny hair) विशेष काळजी घेतात. बॉलिवूड अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी नेमके काय उपाय करत असतील आणि ते जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्याचजणींना असते. विशेषतः केस आणि त्वचेसाठी बॉलिवूड अभिनेत्री (Athiya Shetty's Hair Oil Remedy Follow) जे उपाय करतात ते फॉलो करण्याचा ट्रेंडच आला आहे. आपल्यापैकी अनेकजणी बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी (Long hair growth remedy by Athiya Shetty) सांगितलेले खास घरगुती उपाय हमखास फॉलो करतात. काही बॉलिवूड अभिनेत्री या केसांसाठी महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्स व ट्रिटमेंट्स सोबतच काही घरगुती पारंपरिक उपाय देखील फॉलो करताना दिसतात. अथिया देखील त्यापैकीच एक, केसांसाठी ती विशेषता घरगुती उपाय करण्यावरच अधिक भर देते(Athiya Shetty Use Homemade Onion Hair Oil For Hair).
चमकदार, घनदाट आणि मजबूत केसांसाठी ती कायम घरच्याघरीच तयार केलेलं घरगुती नैसर्गिक तेल वापरते. वेगवेगळ्या मुलाखतींमधून, अथियाने आपल्याला केमिकलयुक्त महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी चक्क घरगुती नैसर्गिक उपाय करायलाच आवडतात हे सांगितले. केसगळती थांबवण्यासाठी, स्काल्पला पोषण देण्यासाठी आणि नवीन केसांची वाढ होण्यासाठी तिचं हे घरगुती तेल उपयुक्त असल्याचं ती नेहमी सांगते. त्यामुळे तिचं हे घरगुती आयुर्वेदिक तेल हे अथिया शेट्टीच्या सुंदर केसांचं खास सिक्रेट आहे. चमकदार, मजबूत आणि घनदाट केसांसाठी अथिया तेलाचा मसाज, योग्य आहार आणि हेअर केअर रुटीन फॉलो करणे या गोष्टी अगदी बारकाईने पाळतेच. अथिया केसांसाठी वापरते ते तेल घरच्याघरीच कसे तयार करायचे ते पाहा.
अथिया शेट्टी केसांना कोणते घरगुती तेल लावते ?
अथिया शेट्टी तिच्या हेअर केअर रुटीनमध्ये घरगुती कांद्याचे तेल यापरते वापरते, या तेलाची सिक्रेट रेसिपी fitnessbestie1412 या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला ३ ते ४ कांदे आणि शुद्ध खोबरेल तेल इतक्या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे.
डिंपल कपाडियाचे केस साठीतही दिसतात अत्यंत सुंदर, पाहा तिनं सांगितलेले घरगुती सोपे उपाय...
सगळ्यात आधी कांद्याची सालं काढून कांदा मध्यम आकारात चिरुन घ्यावा. त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यात चिरलेला कांदा घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आता ही कांद्याची तयार पेस्ट एका पॅनमध्ये घेऊन, मध्यम आचेवर थोडी शिजवून घ्यावी. त्यानंतर कांदा शिजत आल्यावर त्यात खोबरेल तेल घालावे. आता हळुहळु चमच्याने हलवत राहावे. हे मिश्रण आटवून त्याचा रंग जोपर्यंत हलकासा चॉकलेटी ब्राऊन होत नाही तोपर्यंत ते मंद आचेवर गरम करावे. मिश्रणाचा रंग बदलला की, गॅस बंद करून तेल थोडे थंड होऊ द्यावे. असे थंड तेल एका काचेच्या बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवावे.
अंडरआर्म्स खूप काळेकुट्ट झालेत? स्वयंपाक घरातील ४ पदार्थ लावा, काळपटपणा होईल कमी...
केसांसाठी कांद्याचे तेल लावण्याचे फायदे...
कांद्याच्या तेलातील सल्फर हे केसांच्या मुळांना बळकटी देते आणि त्यामुळे केसगळती थांबते. याचबरोबर, कांद्याचं तेल अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी युक्त असल्याने डोक्यातील कोंडा आणि इतर संसर्ग दूर ठेवते. स्काल्पचे रक्ताभिसरण वाढवून कांद्याचं तेल नवीन केस उगवण्यास फायदेशीर ठरते. यासोबतच, केस अधिक मऊ, चमकदार आणि रेशमी दिसतात.