आजकाल फार कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना त्रास देताना दिसते. लहान वयातच डोक्यावर पांढरे केस दिसू लागले की अगदी चारचौघात आपल्याला लाजिरवाणे वाटते. पांढरे केस काळे करण्यासाठी आपण सगळ्यात आधी पार्लर कडे धाव घेतो, इतकंच नाही तर कधी वेगवेगळे हेअर डाय, केमिकल युक्त रंग असे अनेक उपाय करून पाहतो. पांढरे केस काळे करण्यासाठी आपण करत असलेल्या आर्टिफिशियल उपायाने केस काही फारसे काळे होत नाहीत परंतु केसांच्या मुळांना इजा होऊन ते कमकुवत होतात. पांढरे केस लपवण्यासाठी केलेले हे अनेक उपाय तात्पुरता रंग तर देतात, पण केसांचे कायमचे नुकसान करतात, अशावेळी घरगुती उपाय करणं कधीही उत्तमच... पांढरे केस काळे करण्यासाठी स्वयंपाकघरातील कचरा म्हणून फेकून दिलेल्या कांद्या - लसणाच्या साली केसांसाठी वरदान ठरु शकतात(onion - garlic peel hair dye at home).
कांदा आणि लसणाच्या सालींपासूनच (homemade hair dye with onion - garlic peel) घरी बनवलेला 'नॅचरल हेअर डाय' पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकतो. हा उपाय थोडासा विचित्र वाटेल पण केसांच्या आरोग्यासाठी कमालीचा फायदेशीर ठरतो. कोणत्याही केमिकलशिवाय आणि शून्य खर्चात घरी कांद्या - लसणाच्या सालींचा (how to make hair dye using onion and garlic peels) नॅचरल हेअर डाय कसा तयार करायचा, ते पाहूयात.
कांदा - लसणाच्या सालींपासून घरीच करा नॅचरल हेअर डाय...
पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी नॅचरल हेअर डाय तयार करताना प्रत्येकी १ वाटी कडीपत्त्याची पाने, लसणाच्या साली, कांद्याच्या साली, १ ते २ टेबलस्पून एरंडेल तेल किंवा खोबरेल तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
लहान ब्रेस्ट साईजसाठी १० ग्लॅमरस ब्लाऊज नेकपॅटर्न्स! लूकच जाईल बदलून - साडीत दिसाल स्टायलिश...
केसांसाठी नॅचरल हेअर डाय कसा करायचा ?
घरच्याघरीच केसांसाठी नॅचरल हेअर डाय तयार करताना सगळ्यात आधी एका मोठ्या कढईमध्ये कडीपत्त्याची ताजी पाने, लसणाच्या साली, कांद्याच्या साली असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन ते मंद आचेवर त्यांच्या पूर्णपणे रंग बदलून जोपर्यंत पूर्ण काळा रंग येत नाही तोपर्यंत कोरडे भाजून घ्यावेत. हे मिश्रण पूर्णपणे भाजून काळे झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मिश्रण ओतून त्याची बारीक पूड तयार करुन घ्यावी. ही तयार पूड एका बाऊलमध्ये काढून त्यात आपल्या आवडीनुसार एरंडेल तेल किंवा खोबरेल तेल घालून मिश्रण कालवून घ्यावे.
हा हेअर डाय केसांवर कसा लावावा ?
कांदा आणि लसणाच्या सालींचा तयार हेअर डाय ब्रशच्या मदतीने पांढऱ्या केसांवर लावावा. तासभर केसांवर हा नॅचरल हेअर डाय लावून मग केस पाण्याचे स्वच्छ धुवून घ्यावेत. आपण कोणत्याही सौम्य नॅचरल शाम्पूने केस स्वच्छ धुवू शकता.
कांदा - लसणाच्या सालींचा हेअर डाय केसांसाठी कसा फायदेशीर...
१. कडीपत्ता :- कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक केसांच्या मुळांना पोषण देऊन मेलॅनिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात. कडीपत्त्यामुळे केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकून राहतो आणि केस गळतीही कमी होते.
२. कांद्याच्या साली :- कांद्याच्या सालीत सल्फरचे प्रमाण जास्त असते. हे सल्फर केसांच्या वाढीसाठी आणि पांढऱ्या केसांना पुन्हा नैसर्गिक गडद रंग देण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तसेच, यामुळे स्काल्पवरील संसर्ग दूर होण्यास मदत होते.
३. लसणाच्या साली :- लसणाच्या सालींमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. जेव्हा आपण या साली जाळून त्याची पावडर करतो, तेव्हा त्यातील कार्बन आणि पोषक तत्वे हेअर फॉलिकल्सला अधिक मजबूत करतात, ज्यामुळे केस मुळापासून मजबूत आणि काळे होतात.
४. खोबरेल तेल :- खोबरेल तेल हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. हे तेल तयार केलेल्या डायमधील पोषक तत्वे केसांच्या आतपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. यामुळे केस कोरडे पडत नाहीत आणि त्यांना एक नैसर्गिक चमक मिळते .
Web Summary : Combat gray hair naturally with a homemade dye using onion and garlic peels. This zero-cost solution combines these peels with curry leaves and coconut or castor oil. The mixture strengthens hair follicles, promoting natural color and reducing hair fall.
Web Summary : प्याज और लहसुन के छिलकों का उपयोग करके घर पर बनी डाई से प्राकृतिक रूप से सफेद बालों से लड़ें। यह शून्य-लागत समाधान इन छिलकों को करी पत्ते और नारियल या अरंडी के तेल के साथ मिलाता है। मिश्रण बालों के रोम को मजबूत करता है, प्राकृतिक रंग को बढ़ावा देता है और बालों का झड़ना कम करता है।