बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्यूटी माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आजही स्क्रीनवर आली की तिच्या केसांची एक बट करोडो चाहत्यांना भुरळ पाडते. माधुरीचं अस्सल सौंदर्य पाहून आपल्यापैकी अनेकींना देखील असचं वाटतं की आपण देखील माधुरी प्रमाणेच सुंदर दिसावं. वय वाढलं तरी माधुरीचे केस आजही तितकेच घनदाट, चमकदार आणि रेशमी आहेत. वाढतं वय असूनही तिचे केस आजही तितकेच हेल्दी आणि शायनी दिसतात, यामागचं सिक्रेट काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. माधुरी आजही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी 'जुन ते सोन' या म्हणीप्रमाणे घरगुती उपायांनाच पसंती देते. विशेष म्हणजे, केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना केमिकलपासून वाचवण्यासाठी ती स्वतः घरी बनवलेला नॅचरल शाम्पू वापरते(Madhuri Dixit homemade hair shampoo).
बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणजे खूप महागड्या आणि परदेशी ब्रँडेड वस्तू वापरत असतील असा आपला समज असतो. पण माधुरी दीक्षितने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. माधुरीने नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिच्या सुंदर केसांचे एक खास सिक्रेट शेअर केलं आहे. माधुरी केसांच्या स्वच्छतेसाठी कोणताही फॅन्सी ब्रँड नाही, तर चक्क घरच्याघरीच तयार केलेला एक 'देसी' शाम्पू वापरते. केसांमधला कोंडा असो वा रुक्षपणा, या शाम्पूमुळे तिचे केस आजही वयाच्या पन्नाशीतही तरुणींना लाजवतील (Madhuri Dixit's homemade shampoo for hair growth ) असे दिसतात. माधुरी केसांसाठी खास वापरते तसा घरगुती शाम्पू कसा करायचा आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत ते पाहूयात.
माधुरीने सांगितले ती केसांसाठी वापरत असलेल्या शाम्पूचे सिक्रेट...
माधुरी केसांसाठी घरच्याघरीच तयार करते एक खास शाम्पू जो तिच्या केसांना पोषण आणि सुंदर लूक देतो. हा शाम्पू तयार करण्यासाठी आपल्याला २ ते ३ मोठे बाऊल गुलाबाच्या पाकळ्या, रोझमेरीची पाने, वाटीभर ग्लिसरीन आणि तुमचा आवडता किंवा नेहमीच्या वापरातील शाम्पू इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
केसांसाठीचा हा घरगुती शाम्पू कसा तयार करायचा ?
केसांसाठीचा घरगुती शाम्पू तयार करण्यासाठी आपल्याला सर्वातआधी गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून त्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. त्यानंतर एका स्वच्छ सुती कापडात ही मिक्सरमधील तयार गुलाबाची पेस्ट घालून पाकळ्यांचा रस एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. मग एक रिकामी, स्वच्छ काचेची बाटली घेऊन त्यात सर्वातआधी गुलाबांच्या पाकळ्यांचा रस, ग्लिसरीन, रोझमेरीची पाने आणि आपला नेहमीच्या वापरातील शाम्पू असे सगळे जिन्नस एकत्रित घालून घरगुती शाम्पू तयार करून घ्यावा.
हा शाम्पू वापरण्याचे फायदे...
१. गुलाबाच्या पाकळ्या :- गुलाबाच्या पाकळ्या केवळ सुगंधासाठी नाहीत, तर त्या केसांसाठी नैसर्गिक 'कंडिशनर' म्हणून काम करतात. गुलाबातील पोषक तत्त्वे टाळूला थंडावा देतात आणि केसांचा पीएच (pH) स्तर संतुलित राखण्यास मदत करतात. यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो आणि केस गुलाबासारखेच मऊ आणि टवटवीत दिसतात.
२. रोझमेरीची पाने :- रोझमेरी हे केसांच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या पानांच्या वापरामुळे टाळूचे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस गळणे कमी होऊन नवीन केस येण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, रोझमेरीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे कोंडा दूर ठेवण्यास आणि केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतात.
३. ग्लिसरीन :- केसांचा कोरडेपणा किंवा रुक्षपणा घालवण्यासाठी ग्लिसरीन अत्यंत फायदेशीर आहे. हे हवेतील ओलावा शोषून घेते आणि केसांना हायड्रेटेड ठेवते. जर तुमचे केस खूप जास्त गुंता होत असतील किंवा निर्जीव दिसत असतील, तर ग्लिसरीन त्यांना रेशमी, मऊ आणि चमकदार बनवण्याचे काम करते.
Web Summary : Madhuri Dixit reveals her secret to healthy, shiny hair: a homemade shampoo. She uses rose petals, rosemary leaves, and glycerin to nourish her hair, maintain its natural moisture, and protect it from chemicals. This DIY shampoo keeps her hair youthful and lustrous, even at her age.
Web Summary : माधुरी दीक्षित ने स्वस्थ, चमकदार बालों का रहस्य बताया: एक घरेलू शैम्पू। वह अपने बालों को पोषण देने, प्राकृतिक नमी बनाए रखने और रसायनों से बचाने के लिए गुलाब की पंखुड़ियों, मेंहदी की पत्तियों और ग्लिसरीन का उपयोग करती हैं। यह DIY शैम्पू उनकी उम्र में भी उनके बालों को युवा और चमकदार बनाए रखता है।