Lokmat Sakhi >Beauty > केसांचा झाडू झाला-वाढच नाही? या तेलाने २ मिनिटं मालिश करा, केस भराभर वाढतील -दाट होतील

केसांचा झाडू झाला-वाढच नाही? या तेलाने २ मिनिटं मालिश करा, केस भराभर वाढतील -दाट होतील

Oil Blend For Hair Growth And Volume : तीन तेल मिक्स करून केसांची मसाज केली तर केसांची मसाज करा, हेल्थ कोच मनप्रती यांनी याबाबत अधिक माहिती दिली याहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:50 AM2024-05-22T11:50:54+5:302024-05-22T15:00:59+5:30

Oil Blend For Hair Growth And Volume : तीन तेल मिक्स करून केसांची मसाज केली तर केसांची मसाज करा, हेल्थ कोच मनप्रती यांनी याबाबत अधिक माहिती दिली याहे.

Oil Blend For Hair Growth And Volume : Which Oil Is Best For Hair Growth Best Hair Growth Oil | केसांचा झाडू झाला-वाढच नाही? या तेलाने २ मिनिटं मालिश करा, केस भराभर वाढतील -दाट होतील

केसांचा झाडू झाला-वाढच नाही? या तेलाने २ मिनिटं मालिश करा, केस भराभर वाढतील -दाट होतील

केस गळणं (Hair Fall) आणि केस वेळेआधीच पांढरे होणं (Hair Care Solution) महिलांसाठी एक सामान्य समस्या आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात. केस गळणं कमी करण्यासाठी आहाराकडे योग्य लक्ष देणं गरजेचं असतं. केसांची काळजी घेण्यासाठी हेअर ग्रोथसाठी ऑयलिंग (Hair Oiling) फार महत्वाचे असते. (How To Grow Hairs Faster) केसांच्या मुळांमध्ये मसाज केल्याने रक्ताभिसारण (Blood Circulation) चांगले असते.  केसांना लांब करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. तीन तेल मिक्स करून केसांची मसाज केली तर केसांची मसाज करा. हेल्थ कोच मनप्रीत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Which Oil Is Best For Hair Growth Best Hair Growth Oil)

केसांना लांब, दाट बनवण्यासाठी ३ तेलांचे मिश्रण (Hair Growth Tips)

डॉ. रिंकी कपूर सांगतात की, कॅस्टर ऑईल, जोजोबा ऑईल, ऑलिव्ह ऑईल फायदेशीर ठरते. 
हेअर ग्रोथ वाढवण्यासाठी कॅस्टर ऑईल, कोकोनट ऑईल आणि रोजमेरी ऑईल केसांच्या मुळांना लावा. नारळाचे तेल एंटी फंगल गुणांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होत नाही. नारळाचे तेल हेअर फॉलिकल्ससाठी उत्तम ठरते ज्यामुळे केस हेल्दी राहतात. यात एंटी बॅक्टेरियल गुण असतात हेअर ग्रोथमध्ये परिणाम होतो आणि बॅक्टेरिया कमी होतात. हे एका नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे  काम करते आणि केस मुलायम राहण्यास मदत होते.

चालणं होतं तरी पोट कमी होत नाही? फक्त १० मिनिटं ‘असा’ करा 'पॉवर वॉक'; कमी होईल पाेट

कॅस्टर ऑईल किंवा एंरडेल तेलात व्हिटामीन ई, फॅटी एसिड्स भरपूर प्रमाणात असते. हेअर ग्रोथ वाढते आणि केस लांब, दाट होण्यास मदत होते. रोजमेरी तेलात एंटी ऑक्सिडेंट्स असतात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात.  जे स्काल्पला लावल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते. केस मजबूत राहतात आणि नवीन केसांच्या वाढीस मदत होते.

केसांसाठी हेअर ग्रोथ ऑईल कसं तयार करायचं? (How To Grow Hairs Naturally)

कॅस्टर ऑईलचे  ७ ते ८ थेंब घ्या, नारळाचे तेल २ टेबलस्पून घ्या, रोजमेरी तेल १ टेबलस्पून घ्या. हे तिन्ही तेल मिक्स करून स्काल्पवर व्यवस्थित मसाज करा. हे तेल केसांना लावून अर्ध्या तासासाठी तसंच सोडून द्या. नंतर केस सल्फेट फ्री शॅम्पूने व्यवस्थित धुवून घ्या. केसांना लांब, दाट बनवण्यासाठी हेअर एक्सपर्ट्स या ३ तेलांना केसांच्या मुळांना लावण्याचा सल्ला देतात. 

Web Title: Oil Blend For Hair Growth And Volume : Which Oil Is Best For Hair Growth Best Hair Growth Oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.