Join us

October heat : उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल सुंदर, करा हे घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2025 10:26 IST

October heat: Skin darkened by the sun will become beautiful, try these home remedies : त्वचा राहील सुंदर करा हे उपाय. सन टॅनिंगपासून मिळेल आराम.

उन्हात दीर्घकाळ फिरल्यावर किंवा काम केल्याने त्वचा काळवंडते. निस्तेज दिसते आणि नैसर्गिक उजळपणा हरवतो. विशेषतः चेहरा, मान आणि हात यांवरचा भाग सर्वात आधी काळा पडतो. सनस्क्रीन वापरुनही काही वेळा टॅनिंग होतेच. (October heat: Skin darkened by the sun will become beautiful, try these home remedies)पण काळजी करण्यासारखे काही नाही. घरात असलेले काही सोपे घटक वापरुन काही दिवसांतच त्वचेचा रंग पुन्हा उजळ आणि तजेलदार करता येतो. हे उपाय पूर्णतः नैसर्गिक आहेत आणि कोणताही दुष्परिणाम नाही.

सर्वप्रथम लक्षात घ्यावे की टॅनिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सूर्यकिरणांतील अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचण्यासाठी त्वचा मेलॅनिन तयार करते आणि त्यामुळे त्वचा काळसर होते. पण ही काळवंडलेली त्वचा नियमित काळजी घेतल्यास हळूहळू पुन्हा उजळते.

काळेपणा कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे लिंबू आणि मधाचा पॅक. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आहेत, तर मध त्वचेला ओलावा आणि मृदुता देते. एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन चेहऱ्यावर, मानेला किंवा हातावर लावा. दहा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून घ्या. रोज एकदा हा उपाय केल्यास काही दिवसांतच त्वचेवरील टॅन कमी होतो आणि रंग उजळतो. मात्र त्वचेवर जखम किंवा फोड असतील तर लिंबू वापरु नये.

टोमॅटो आणि बेसन पॅकही उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेसाठी अत्यंत उपयोगी ठरतो. टोमॅटोमधील लायकोपीन त्वचेवरील टॅन कमी करतो आणि बेसन त्वचेला स्वच्छ करते. एक चमचा बेसनात अर्ध्या टोमॅटोचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा, मान आणि हातावर लावून पंधरा मिनिटांनी सुकल्यावर धुवून टाका. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केल्यास त्वचा स्वच्छ, मऊ आणि उजळ दिसते.

दही आणि हळदीचा लेपही पारंपरिक उपायांपैकी एक आहे. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचा उजळवते, तर हळद त्वचेतील जळजळ कमी करते आणि नैसर्गिक तेज आणते. एक चमचा दही आणि चिमूटभर हळद मिसळून हा लेप तयार करा. चेहऱ्यावर आणि मानेला लावून २० मिनिटांनी धुवून टाका. हा उपाय दररोज केल्यास त्वचा हळूहळू तजेलदार होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sun-darkened skin rescue: Home remedies for a radiant glow.

Web Summary : Combat summer tan with simple home remedies! Lemon-honey, tomato-besan, and curd-turmeric packs effectively lighten and brighten sun-darkened skin, restoring its natural radiance without side effects.
टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्समहिलाहोम रेमेडी