Join us
Daily Top 2Weekly Top 5

टॅनिंगमुळे चेहरा काळा पडला? घ्या जायफळाचा सोपा उपाय- १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2025 12:45 IST

Nutmeg, Coffee Face Pack For Removing Tanning: चेहऱ्यावरचं टॅनिंग, डेडस्किन खूप वाढलं असेल तर जायफळाचा एक सोपा उपाय करून पाहा..(how to get rid of tanned skin?)

ठळक मुद्देजायफळाचा फेसमास्क जर तुम्ही नियमितपणे चेहऱ्याला लावला तर तुमची त्वचा नेहमीच फ्रेश, चमकदार दिसेल.

रोजच्या कामांच्या धावपळीमध्ये त्वचेकडे पुरेसं लक्ष देणं होत नाही. शिवाय घराबाहेर उन्हामध्ये जाणंही होतंच. उन्हाचा, धुळीचा आपल्या त्वचेवर परिणाम होत जातो. आणि आता तर हिवाळ्याचे दिवस आहेत. हिवाळ्यातल्या थंड, कोरड्या हवेचा खूप वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्वचा या दिवसांत खूप जास्त टॅन होते. कोरडी पडते. डेडस्किनचे प्रमाणही वाढते. यामुळे मग चेहरा काळवंडल्यासारखा दिसतो (how to get rid of tanned skin?). अशावेळी त्वचेचा ग्लो पुन्हा कसा मिळवायचा याची काळजी वाटत असेल तर स्वयंपाक घरातल्या जायफळाचा एक सोपा उपाय करून पाहा..(use of jaifal or nutmeg for fresh, glowing skin)

 

टॅनिंग, डेडस्किन कमी करण्यासाठी जायफळ कसं वापरायचं?

जायफळामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेवरचं टॅनिंग कमी करण्यासाठी खूप मदत करतात. जायफळाचा फेसमास्क जर तुम्ही नियमितपणे चेहऱ्याला लावला तर तुमची त्वचा नेहमीच फ्रेश, चमकदार दिसेल.

कोण म्हणतं मेहेंदी लावून केस कोरडे होतात? 'या' पद्धतीने मेहेंदी लावा- केस होतील सिल्की, चमकदार

यासाठी जायफळ किसून त्याची पावडर करून घ्या. आता त्यामध्ये अर्धा चमचा कॉफी घाला. कॉफीमध्ये असणारे नायट्रससारखे घटक प्रदुषणामुळे किंवा सुर्यप्रकाशामुळे त्वचेवर होणारं टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतात. 

 

यानंतर या मिश्रणात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा ॲलोव्हेरा जेल घाला. हळदीमधले ॲण्टीबॅक्टेरियल घटक त्वचेसाठी उपयुक्त ठरतात तर ॲलोव्हेरा जेल त्वचेला हायड्रेटेड ठेवतात. यानंतर सगळ्यात शेवटी त्यामध्ये थोडं दही घाला. दह्यामध्ये असणारे लॅक्टीक ॲसिड त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत करतात आणि त्वचेला अधिक मुलायम करतात. 

मध्यरात्रीपर्यंत जागेच असता- झोपच येत नाही? ५ पदार्थ खा- अंथरुणावर पडताच शांत झोप लागेल

आता सगळे पदार्थ हलवून व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला, मानेला लावा आणि १५ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून चेहरा, मान धुवून टाका. तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Nutmeg remedy for tan removal and glowing skin in minutes.

Web Summary : Tired of tanned skin and dead skin cells? Use nutmeg! A simple face mask with nutmeg powder, coffee, turmeric, aloe vera gel, and yogurt can help reduce tanning and dead skin, leaving your skin fresh and glowing. Apply for 15 minutes weekly.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी