डिसेंबर महिना जवळ आला की घरोघरी काही ना काही कार्यक्रम असतातच. साडी, पारंपरिक ड्रेस , दागिने, मेकअप, हेअरस्टाईल सारे करायची इच्छा असते. मात्र माझ्यावर ते सुट होत नाही म्हणून मी करत नाही असे तुमचेही म्हणणे आहे का? या साडीत मी जाडच दिसते , त्या ड्रेसमध्ये चेहरा अगदी निस्तेज वाटतो अशा तक्रारी सगळ्याच करतात. (No makeup or expensive clothes, but you'll still look so beautiful just check out 4 tips) कार्यक्रमासाठी तयार होताना काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. साध्या पॅटर्नच्या कपड्यात आणि अगदी नावपुरता मेकअप करुनही अप्सरेसारख्या सुंदर दिसाल. काही फारच बेसिक गोष्टी असतात त्या केल्या की साडी - ड्रेस काहीही असो सुंदरच दिसाल.
जर तुमचे वजन जास्त आहे आणि साडी नेसल्यावर दंड जाडजुड दिसतो म्हणून साडी नेसणेच टाळता तर तसेच न करता साडीचा आणि ब्लाऊजचा पॅटर्न बदला. गळा बंद ब्लाऊन वापरता व्ही कट सारखे जरा डिप नेक कट वापरा. हाताचे स्लिव्हज लांब ठेवा म्हणजे दंड कसा दिसेल याची चिंता वाटणार नाही. तसेच हाताला बाजूबंद बांधा आणि पदर हातावर सुट्टा सोडा. पिनअप केलेल्या पदरामुळे हात जास्त जाड वाटतो. त्यामुळे परद मोकळा ठेवा.
हेअरस्टाइल करताना आंबाडा, बन , इत्यादी करण्यापेक्षा केस मोकळे सोडा. किंवा क्लिप लावा. इतरही काही हेअरस्टाइल असतात त्या करा. वर बंधलेल्या केसांमुळे चेहरा आहे त्याहून जास्त गोलाकार दिसतो. मान आणि डबल चिन जास्त दिसते. केस मोकळे असतील तर चेहरा सुंदर आणि बारीक दिसतो. तसेच बांधायचेच असतील तर मानेलगत येतील अशी हेअरस्टाइल करा. अगदीच डोक्यावर नको.
कपड्यांचा रंग निवडताना स्किनटोननुसार निवडा. जसे मेकअपसाठी स्किनटोनचा विचार करता अगदी तसेच कपड्यांसाठीही करा. काही रंग असे असतात ज्यामध्ये सावळा रंग निस्तेज दिसतो, तर काहीमध्ये गोरापान चेहराही निस्तेज भासतो. त्यामुळे रंगही महत्त्वाचा असतो. मापात दिसायचे असेल तर जांभळा, निळा, लाल, कोकमी असे रंग वापरा. काळा रंग तर सुंदरच दिसेल. तसेच त्यातून सुटलेले पोटही लपवता येते.
शेवटी आवड, उत्साह आणि आत्मविश्वास जास्त महत्त्वाचा असतो. जर तुम्ही स्वतःला सुंदर समजत नसाल तर कितीही मेकअप केला आणि कोणतेही कपडे घातले तरी त्याचा फायदा नाही. त्यामुळे आनंदी राहणे जास्त महत्वाचे आहे. चेहऱ्यावर छान हसू असेल तर दागिनेही फिकेच पडतील.
Web Summary : Look effortlessly beautiful with these tips! Choose flattering clothes, smart hairstyles, and skin-tone-appropriate colors. Confidence and a smile are key to radiant beauty.
Web Summary : इन टिप्स से आसानी से सुंदर दिखें! आकर्षक कपड़े, स्मार्ट हेयरस्टाइल और स्किन-टोन के अनुसार रंग चुनें। आत्मविश्वास और मुस्कान ही सच्ची सुंदरता की कुंजी हैं।