उन्हाळ्यात आपल्याला बाजारात काकडी पाहायला मिळते. या ऋतूमध्ये डिहायड्रेशनच्या समस्या होतात म्हणून आपल्याला काकडी खाण्याचा सल्ला दिला.(night skincare tips at home) काकडी जितकी आरोग्यासाठी चांगली आहे तितकीच आपल्या चेहऱ्यासाठी. उन्हाळा म्ह़टलं की त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (homemade cucumber night cream)
उन्हाळ्यात आपल्याला त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते.(cucumber cream for dark circles) वाढत्या उष्णतेचा आपल्या चेहऱ्यावर परिणाम होतो.(how to make cucumber cream at home) यामुळे घामोळ्या येणे, पुरळ येणे, त्वचा लालसर होणे, त्वचेवर काळे डाग पडणे, त्वचा टॅन होणे यांसारख्या अनेक त्रास आपल्याला सहन करावा लागतो. (natural remedies for pigmentation)
उन्हाळ्यात ओठ का फुटतात? साल निघतं, रक्त येतं अशा कोरड्या ओठांसाठी पाहा घरगुती उपाय
काकडीमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आहेत जे शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण काकडीचा आहारात समावेश करु शकतो. काकडी फक्त खाल्लीच जात नाही तर तिची क्रीम देखील बनवता येते. ही क्रीम रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावल्यास डार्क सर्कल- पिग्मेंटेशनची समस्या दूर होईल. क्रीम कसे बनवायचे पाहूया.
साहित्य
काकडी - १
कोरफड जेल - २ चमचे
व्हिटॅमिन ई ऑइल - २ कॅप्सूल
नारळाचे तेल - १ चमचा
बदामाचे तेल - १ चमचा
गुलाब पाणी - २ चमचे
शिया बटर - २ चमचे
कसे बनवाल?
सगळ्यात आधी काकडी किसून घ्या. गाळून त्याचा रस काढा. आता काचेच्या बाऊलमध्ये शिया बटर घेऊन वितळवून घ्या. काकडीच्या रसाचे समप्रमाणात दोन भाग करा. त्यामध्ये कोरफड जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, नारळाचे तेल, गुलाब जल आणि वितळवलेले शिया बटर घालून चांगले मिक्स करा. फेटत राहा हळूहळू त्याचा रंग बदलेल. तयार होईल काकडीचे नाईट क्रीम
काकडीच्या क्रीमचे फायदे
1. काकडीचे पाणी आपल्या त्वचेला खोलवर हायड्रेट करते. ज्यामुळे रात्रभर चेहरा मॉइश्चरायझर राहतो.
2. काकडीमुळे त्वचेवरील सूज कमी होऊन त्वचेला खाज येत असेल तर त्यावर चांगली ठरते. या क्रीमचा वापर केल्याने त्वचेचा लालसरपणा आणि खाज कमी होते.
3. काकडीमध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे डोळ्यांभोवती सूज कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे आपली त्वचा निरोगी राहिल.