Join us

बेकिंग सोडा आणि लिंबानं दात घासण्याचा अभिनेत्री निया शर्मानं सांगितलेला उपाय सुरक्षित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:15 IST

अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) देखील दातांवरील पिवळेपणानं वैतागली होती. अशात तिनं एक खास घरगुती उपाय करून दात मोत्यांसारखे चमकदार केले.

Yellow Teeth Home Remedies : पिवळे दात, तोंडाला दुर्गंधी यामुळे आत्मविश्वास कमी होतो. अनेकांना आपले दात आवडत नाही, स्माइल मार खाते असं वाटतं. पण दात पिवळे होतं आणि तोंडाला वास येणं नैसर्गिक आहे. आपल्याच खाण्या-पिण्याच्या चुका, अपचन यासह अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतात. त्यामुळे दातांचं आराेग्य हा गंभीर विषय आहे. दातांची योग्य काळजी न घेणं, कमी पाणी पिणं, तेलकट-आंबट खाणं यामुळे दात पिवळे दिसू लागतात. आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हायरल उपाय दिसतात ते सगळे सुरक्षित असतात का? नुकताच अभिनेत्री निया शर्मानं सांगितलेला उपाय असाच व्हायरल झाला आहे पण तो सुरक्षित आहे का?

 अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) देखील दातांवरील पिवळेपणानं वैतागली होती. अशात तिनं एक खास घरगुती उपाय करून दात मोत्यांसारखे चमकदार केले. तोच उपाय आज आपण पाहणार आहोत. 

दातांचा पिवळेपणा घालवण्याचा सोपा उपाय

निया शर्मानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं सांगितलं की, दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तिनं एका वाटीमध्ये बेकिंग सोडा घेतला, त्यात थोडा लिंबाचा रस टाकला, वरून थोडं मीठ घातलं आणि खोबऱ्याचं तेलही टाकलं. या मिश्रणानं तिनं दात घासले.

हा उपाय करून नियाला लगेच फरक दिसून आला आणि तिनं आपल्या फॅन्ससाठी देखील हा उपाय शेअर केला. आपण सुद्धा हा उपाय ट्राय करू शकता. दातांचा पिवळेपणा तर दूर होईलच, सोबतच मिठानं दात मजबूतही होतील. पण हा उपाय करत असताना एक काळजी घ्या. ती म्हणजे बेकिंग सोड्याचा खूप जास्त वापण करणं नुकसानकारक ठरू शकतं. हा उपाय रोज करू नका. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता. कारण बेकिंग सोड्यानं दातांवरील थराचं नुकसान होतं.

वरील उपाय तर बेस्ट आहेच. पण आणखीही एक असा उपाय आहे जो दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर असतो. तो म्हणजे खोबऱ्याचं तेलानं ऑइल पुलिंग करणं. यासाठी फक्त 2 चमचे खोबऱ्याचं तेल तोंडात टाका आणि सगळीकडे फिरवा. 5 मिनिटं असंच करा. नंतर तेल थूंका. यानं दातांवरील पिवळेपणा दूर होईल. सोबतच दात आणि हिरड्याही मजबूत होतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सनिया शर्मास्वच्छता टिप्स