Lokmat Sakhi >Beauty > डोळ्यांखाल चुकूनही लावू नका ५ ब्यूटी प्रॉडक्ट्स, डोळ्यांचं आयुष्यभरासाठी होईल नुकसान...

डोळ्यांखाल चुकूनही लावू नका ५ ब्यूटी प्रॉडक्ट्स, डोळ्यांचं आयुष्यभरासाठी होईल नुकसान...

Never Use These 5 Things On The Under Eye Area By Mistake It Will Cause Harm Instead Of Benefit : 5 Beauty Products never apply in the under-eye area, according to a dermatologist : डोळ्यांखालील त्वचेवर कोणत्या प्रकारचे ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरु नयेत ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 09:08 IST2025-05-01T08:20:13+5:302025-05-01T09:08:03+5:30

Never Use These 5 Things On The Under Eye Area By Mistake It Will Cause Harm Instead Of Benefit : 5 Beauty Products never apply in the under-eye area, according to a dermatologist : डोळ्यांखालील त्वचेवर कोणत्या प्रकारचे ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरु नयेत ते पाहा...

Never Use These 5 Things On The Under Eye Area By Mistake It Will Cause Harm Instead Of Benefit | डोळ्यांखाल चुकूनही लावू नका ५ ब्यूटी प्रॉडक्ट्स, डोळ्यांचं आयुष्यभरासाठी होईल नुकसान...

डोळ्यांखाल चुकूनही लावू नका ५ ब्यूटी प्रॉडक्ट्स, डोळ्यांचं आयुष्यभरासाठी होईल नुकसान...

सर्व अवयवांमध्ये 'डोळा' हा सर्वात नाजूक अवयव असतो. चेहऱ्याच्या सौंदर्यात डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु त्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी फक्त डोळ्यांचा मेकअप किंवा (Never Use These 5 Things On The Under Eye Area By Mistake It Will Cause Harm Instead Of Benefit) मस्कारा पुरेसा नसतो, तर डोळ्यांखालील त्वचेची देखील विशेष काळजी घेणे आवश्यक असते. डोळ्यांखालील त्वचा ही आपल्या त्वचेपेक्षा अनेक पटींनी पातळ, नाजूक आणि संवेदनशील असते(5 Beauty Products never apply in the under-eye area, according to a dermatologist).

चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स लावतो, परंतु असे ब्यूटी प्रॉडक्ट्स चुकूनही डोळ्यांखाली लावू नये. चेहऱ्याच्या त्वचेसाठी वापरले जाणारे  ब्यूटी प्रॉडक्ट्स जर चुकूनही डोळ्यांखालील त्वचेवर लावले तर त्या नाजूक भागावरील त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठीच, चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेताना डोळ्यांखालील त्वचेवर कोणत्या प्रकारचे ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरु नयेत ते पाहूयात. 

डोळ्यांखालील त्वचेवर कोणते ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरु नये... 

१. रेग्युलर फेस क्रीम्स किंवा लोशन :- चेहऱ्याच्या त्वचेला संपूर्णपणे लावता येणारी क्रीम किंवा लोशन आपण डोळ्यांखाली लावू शकतो, असे अनेकजणांना वाटते. परंतु हे चुकीचे आहे. कधीही चेहऱ्याला लावायची क्रीम किंवा लोशन चुकूनही डोळ्यांखालील त्वचेला लावू नये. फेस क्रिममध्ये अनेकदा असे घटक असतात जे डोळ्यांखालील पातळ त्वचेसाठी खूप हार्श ठरु शकतात. यामुळे डोळ्यांखालील त्वचेची जळजळ, सूज किंवा रॅशेज येणे असे त्रास होऊ शकतात. डोळ्यांखालील त्वचेसाठी कायम आय क्रीम किंवा जेल वापरणे सर्वोत्तम राहील. 

सोनाक्षी सिन्हाच्या सुंदर केसांचे सिक्रेट! वापरते 'या' आयुर्वेदिक पदार्थांनी तयार केलेला घरगुती हेअर स्प्रे...

२. फेसस्क्रब किंवा एक्सफोलिएटर :- चेहऱ्याची त्वचा चमकदार दिसण्यासाठी त्वचेला स्क्रबिंग करणे आवश्यक असते. परंतु डोळ्यांखाली त्वचेला चुकूनही स्क्रबिंग किंवा एक्सफोलिएट करू नये. डोळ्यांखालील त्वचेचा भाग हा खूप नाजूक असल्याने तिथे स्क्रबिंग केल्यास नाजूक त्वचेवर सूक्ष्म जखमा होऊ शकतात, ज्यामुळे जळजळ, कोरडेपणा आणि अकाली सुरकुत्या येऊ शकतात. डेड स्किन काढून टाकण्यासाठी, डोळ्यांच्या खालील भागासाठी तयार कारण्यात आलेले सौम्य, जेल बेस्ड एक्सफोलिएटर्स वापरा किंवा हलक्या हातांनी मसाज करा.

वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असणारे डार्क सर्कल्स होतील गायब, फक्त २ स्टेप्स - स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ असरदार...

३. सुगंधित ब्यूटी प्रॉडक्ट्स :- बऱ्याचवेळा आपण असे मॉइश्चरायझर्स किंवा मेकअप प्रॉडक्ट्स वापरतो ज्यात भरपूर परफ्यूम किंवा आर्टिफिशियल सुगंध असतो. या सुगंधी उत्पादनांमुळे डोळ्यांखालील त्वचेवर ऍलर्जी, खाज सुटणे किंवा पुरळ उठू शकते. यासाठी कायम परफ्यूमविरहित ब्यूटी प्रॉडक्ट्सची निवड करावी. विशेषतः जर त्वचा संवेदनशील असेल तर असे सुगंधित ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरणे टाळा. 

दह्यात चमचाभर 'हे' पीठ कालवून खा! त्वचा दिसेल तरुण - चेहऱ्यावरुन ओळखताच येणार नाही तुमचं वय...

४. वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट्स :- वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट्स आपल्या त्वचेवर तासंतास जसेच्या तसे राहतात खरे, परंतु असा वॉटरप्रूफ मेकअप काढणे फारसे सोपे नसते. वॉटरप्रूफ मेकअप त्वचेवरुन काढण्यासाठी खूप हार्श आणि केमिकल्सयुक्त मेकअप रिमूव्हरचा वापर करावा लागतो. यामुळे त्वचेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट्स त्वचेवरुन काढून टाकण्यासाठी खूप वेळा स्किन मेकअप रिमूव्हरने स्वच्छ करावी लागते. यामुळे डोळ्यांखालील नाजूक त्वचेचे नुकसान होऊ शकते. यासाठी शक्यतो डोळ्यांखाली अशाप्रकारचे वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट्स लावणे टाळावे. 

५. घरगुती स्किनकेअर उपाय :- हळद, लिंबू, बेकिंग सोडा आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी वापरणे जरी फायदेशीर असले तरीही, डोळ्यांखालील त्वचेसाठी वापरणे योग्य नाही. हळद, लिंबू, बेकिंग सोडा यासारखे पदार्थ वापरून तयार केलेले फेसपॅक डोळ्यांखालील त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतात. जर तुम्हाला घरगुती फेसपॅक त्वचेसाठी वापरायचे असतील तर फक्त एलोवेरा जेल, काकडीचा रस किंवा ग्रीन टी सारख्या सौम्य घटकांचा वापर करावा.

Web Title: Never Use These 5 Things On The Under Eye Area By Mistake It Will Cause Harm Instead Of Benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.