How to dye hair with coffee: केस पांढरे होण्याची समस्या आजकाल भरपूर लोकांना सतावत आहे. कमी वयातच पांढऱ्या केसांमुळे तरूण म्हातारे दिसू लागतात. नंतर केस काळे करण्यासाठी वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. यातील केमिकल्समुळे केसांना फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होतं. अशात तुम्ही घरगुती उपाय करून केस डाय करू शकता. या उपायांनी केसांचं नुकसानही होत नाही. असाच उपाय म्हणजे कॉफी. कॉफीच्या मदतीनं तुम्ही केस डाय करू शकता. चला तर जाणून घेऊ कॉफीच्या मदतीनं तुम्ही केस काळे कसे करू शकता.
कॉफीचा केसांसाठी फायदा
टीओआयमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कॉफीमध्ये नॅचरल रूपानं टॅनिन्स नावाचं पिगमेंट्स असतं, जे केसांना मुळापासून काळं करतं. जर तुमचे केस ब्राउन किंवा डार्क ब्राउन असतील तर जास्त काळे दिसू शकतात. कॉफीनं केसांचा नॅचरल कलर अधिक वाढतो सोबतच केस चमकदार होतात. कॅफीनमुळे केसांची वाढही होते. सोबतच डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं.
कसा कराल कॉफीचा वापर?
केसांना लावण्यासाठी एक कप स्ट्रॉन्ग ब्रियू ऑर्गॅनिक कॉफी घ्या. 2 मोठे चमचे कॉफी पावडरही घेऊ शकता. यानं केसांना अधिक डार्क रंग येतो. 1 कप लीव-इन कंडीशनर किंवा हेअर मास्क, एक वाटी आणि एक चमचा घ्या. सोबतच हातात घालण्यासाठी ग्लव्स घ्या, जेणेकरून हातांना रंग लागू नये.
केसांना कशी लावाल कॉफी?
कॉफीला ब्रियू (Brew) करा. एक कप कडक ऑर्गॅनिक कॉफी तयार करा. ही कॉफी थंड होऊ द्या. एका वाटीमध्ये ही कॉफी, कॉफी पावडर, हेअर मास्क किंवा लीव-इन कंडीशनर टाकून मिक्स करा. कॉफी केसांना लावण्याआधी केस स्वच्छ करा आणि ओले ठेवा. आता केसांवर हे मिश्रण चांगल्या प्रकारे लावा.
आता केसांवर शॉवर कॅप लावून दोन ते तीन तासांसाठी तसंच ठेवा. जेणेकरून करून केसांना गर्द रंग येईल. दोन ते तीन तासांनंतर केस कोमट पाण्यानं धुवून घ्या. केस धुवत असताना शाम्पू लावू नका, असं केलं तर कॉफीचा रंग निघून जाईल. नंतर केस सुकू द्या. हा कॉफी हेअर डाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता.