ऋतू कोणताही असला तरी त्वचेच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, डार्क सर्कल, पिंपल्स सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(ayurvedic skin care at home) तेलकट चेहरा असणाऱ्या लोकांसाठी ही समस्या अधिक वाढते. ज्यामुळे चेहरा नेहमी चिकट राहतो. यामुळे अनेकदा चेहऱ्यासाठी रासायनिक उत्पादनांचा वापर करतो.(remove pigmentation naturally) रासायनिक उत्पादनांमुळे चेहरा चांगला होण्याऐवजी तो अधिक खराब होतो.(soft and bright skin tips) पिंपल्स, मुरुमे येतात, त्वचा अधिक डल होऊ लागते.(face pack for fresh and spotless skin) पण आपल्या घरात असणारी एक गोष्ट नियमितपणे चेहऱ्यावर लावल्यास स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच त्वचेच्या अनेक समस्या कमी होईल. (face glow tip with natural ingredient)
टू व्हीलर चालवताना केसांची दुर्दशा, केस कोरडे होतात-गुंता वाढतो? पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी
बर्फ चेहऱ्यावर लावल्याने त्वचा अधिक तजेलदार होते. बर्फ केवळ दुखापतच नाही तर चेहऱ्यावरची सूज ही कमी करतो. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आणि तो सुंदर बनवण्यासाठी देखील बर्फ चांगला आहे. चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. परंतु, याचा फारसा काही उपयोग होत नाही. जर आपण दिवसातून दोन वेळा बर्फ चेहऱ्यावर चोळला तर डाग, सुरकुत्या, काळी वर्तुळे आणि तेलकट समस्यांपासून आराम मिळेल.
बर्फाच्या पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यासाठी बर्फाचा तुकडा घेऊन चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने घासा. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा आणि सुती कापडाने पुसा. असं दिवसातून दोन वेळा केल्याने त्वचेशी संबंधित समस्या हळूहळू कमी होतील.
बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने आपल्याला फ्रेश वाटते. आपल्याला बाहेर कुठे जायचे असेल तर एक तास आधी बर्फाच्या थंड पाण्याने चेहरा धुवा. ज्यामुळे त्वचा चमकदार होते. बर्फामुळे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे डाग, काळी वर्तुळे, मुरुमे आणि तेलकट त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो. जे त्वचेचे छिद्र घट्ट करुन त्वचा मऊ करते. ज्यामुळे चेहऱ्यावर चमक राहते.