उन्हाळ्यात उष्णता आणि घामामुळे केसांचे आरोग्य पार बिघडून जाते. केस धुतल्यानंतर ते मऊसूत,रेशमी, मुलायम दिसण्याऐवजी इतके कोरडे, रुक्ष आणि फ्रिझी होतात की त्यांना सांभाळणे कठीण होऊन बसते. विकतचे महागडे कंडिशनर्स किंवा सिरम लावूनही हा कोरडेपणा तात्पुरता दूर होतो, पण नैसर्गिक ओलावा मात्र हरवतो. इतकंच काय तर केसांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करूनही जेव्हा केसांचा रफनेस किंवा फ्रिजीपणा जात नाही तेव्हा मात्र हिरमोड होतो. कितीही महागडे शॅम्पू, सीरम किंवा हेअर मास्क वापरले तरी केसांमध्ये हवा तसा मऊपणा आणि सिल्की शाईन टिकून राहत नाही. अशावेळी आयुर्वेदातील काही औषधी वनस्पती केसांसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे फायदेशीर ठरतात. या नैसर्गिक वनस्पतींपासून तयार केलेले आयुर्वेदिक पाणी केसांना खोलवर पोषण देऊन त्यांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. यामुळे केस अधिक मऊसूत, रेशमी, चमकदार आणि हेल्दी दिसू लागतात. विशेष म्हणजे हे हर्बल पाणी तयार करण्यासाठी कोणत्याही महागड्या वस्तूंची गरज नसून घरात सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचाच वापर केला जातो(natural remedies for silky hair).
केसांसाठी दररोज या हर्बल पाण्याचा वापर केल्यास केसांचा फ्रिझीनेस कमी होऊन केस नैसर्गिकरित्या सिल्की आणि शायनी दिसू लागतात. केसांना गरज असते ती अस्सल पोषणाची! घराच्या बागेत किंवा किचनमध्ये (homemade hair growth water) सहज उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींपासून बनवलेले हे 'मॅजिकल वॉटर' केसांसाठी अमृतापेक्षा कमी नाही. हे पाणी केसांना मुळापासून मऊ करते आणि फ्रिझीपणा कायमचा घालवते. उन्हाळ्यात केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हे 'नॅचरल मॅजिकल वॉटर' घरच्याघरीच कसे तयार करायचे ते पाहा.
केसांसाठी नॅचरल मॅजिकल वॉटर कसे तयार करायचे ?
केसांसाठी नॅचरल मॅजिकल वॉटर तयार करण्यासाठी सर्वातआधी एका स्टीलच्या मोठ्या भांड्यात १ लिटर पाणी घ्या. त्यात १ मूठ कडीपत्ता, १ मोठा चमचा मेथी दाणे, १ मोठा चमचा कलौंजी, १ मोठा चमचा पिवळी मोहरी, सुक्या खोबऱ्याचे काही तुकडे, ३ ते ४ जास्वंदाची फुले आणि १ मोठा चमचा अळशीच्या बिया घालून शिजवून घ्या. हे पाणी साधारण १५ ते २० मिनिटे झाकून उकळू द्या.
साधेपणातही रॉयल रुबाब, पाहा १० कॉटन खण साड्या! परफेक्ट मॅच ब्लाऊजपिसही-लूक कमाल सुंदर...
वाफ घ्यावी की बर्फाचा शेक, त्वचेसाठी नेमकं काय बेस्ट? सोपा उपाय करताच त्वचा दिसेल स्वच्छ, चमकदार...
शाम्पू करण्यापूर्वी केसांवर स्प्रे करा हे मॅजिकल वॉटर...
सगळे औषधी घटक उकळवून हे पाणी थंड होऊ द्या आणि त्यानंतर गाळून एका बाटलीत भरून फ्रिजमध्ये स्टोअर करा. ज्या दिवशी आपल्याला शाम्पू करायचा असेल, त्या दिवशी हे पाणी केसांवर व्यवस्थित लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी केसांना हलके तेल लावून किंवा तेल न लावता शाम्पू करा. तुम्हाला हवे असल्यास शाम्पू केल्यानंतरही हे पाणी स्प्रे म्हणून वापरू शकता.
फ्रिझी आणि ड्राय केस होतील सिल्की आणि शायनी...
हे नॅचरल मॅजिकल वॉटर वापरल्याने काही दिवसांतच केस मऊ आणि सिल्की होतील. जर तुम्हाला खूप कोंडा (Dandruff) असेल तर या पाण्यात थोडे कोरफड जेल (Aloe vera gel) देखील मिसळू शकता. कोरफड जेलमुळे केसांचा आणि स्काल्पचा कोरडेपणा कमी होतो. आपण हे पाणी २ ते ३ महिन्यांपर्यंत फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. या पाण्यामुळे केस शायनी आणि रेशमी दिसू लागतील, कारण यात केसांना पोषण देणारे पोषक घटक आहेत.
हा उपाय केसांसाठी कसा फायदेशीर....
१. कडीपत्ता :- कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने असतात, जे केस गळती रोखण्यासाठी मदत करतात.
२. मेथी :- मेथी दाण्यांमध्ये 'निकोटिनिक ॲसिड' आणि प्रथिने असतात, जे केसांच्या मुळांना मजबूत करतात.
३. कलोंजी :- कलौंजीमध्ये दाहशामक आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. हे घटक स्काल्पचे आरोग्य सुधारतात, केसांचे अकाली पांढरे होणे रोखतात आणि केसांना दाट व काळेभोर बनवण्यास मदत करतात.
४. पिवळी मोहरी :- पिवळी मोहरी स्काल्पमध्ये रक्तभिसरण वाढवण्यास मदत करते. यामुळे केसांना मुळापासून पोषण मिळते आणि केस धुवून झाल्यानंतर जो कोरडेपणा येतो, तो कमी होऊन केसांना नैसर्गिक चकाकी मिळते.
५. सुकं खोबरं :- सुक्या खोबऱ्यात नैसर्गिक तेल आणि फॅटी ॲसिड्स असतात. जेव्हा हे पाण्यासोबत उकळले जाते, तेव्हा त्यातील अंश केसांना कंडिशनिंग करण्याचे काम करतात. यामुळे केसांचा रफनेस कमी होऊन ते मऊसूत होतात.
६. जास्वंदीची फुले :- जास्वंद हे नैसर्गिक कंडिशनर मानले जाते. यातील 'म्युसिलेज'केसांना रेशमी आणि सिल्की बनवतो. हे फुलांचे पाणी स्प्लिट एन्डची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
७. अळशीच्या बिया :- अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन-ई भरपूर असते. हे पाणी उकळल्यावर जे जेल तयार होते, ते केसांवर संरक्षणात्मक थर तयार करते, ज्यामुळे केस आरशासारखे चमकू लागतात.
Web Summary : Combat dry, frizzy summer hair with a homemade herbal rinse. This natural remedy, made with ingredients like curry leaves and fenugreek, nourishes hair, reduces dryness, and adds shine. Use before shampooing for soft, silky results.
Web Summary : गर्मी में रूखे बालों के लिए घर पर बनाएं हर्बल पानी। करी पत्ता और मेथी जैसे तत्वों से भरपूर यह उपाय बालों को पोषण देता है, रूखापन कम करता है और चमक लाता है। शैम्पू से पहले इस्तेमाल करें और पाएं मुलायम, रेशमी बाल।