सध्याच्या धावपळीच्या जगात त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ काढणं अनेकांना अवघड वाटतं. प्रदूषण, तणाव, झोपेचा अभाव आणि चुकीचा आहार याचा थेट परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो.(ayurvedic skincare tips) पिंपल्स, डार्क सर्कल्स, कोरडेपणा किंवा निस्तेजपणा ही समस्या वाढत जाते. महागड्या पार्लर ट्रीटमेंट किंवा क्रीम्स तात्पुरता फरक दाखवतात, पण त्यांचे दुष्परिणामही तितकेच असतात.(natural skin glow remedies)वाढत्या वयाला आळा घालण्यासाठी आपण त्वचेवर भरमसाठ मेकअप करतो. पिंपल्स किंवा डाग लपवण्यासाठी मेकअप करण्याऐवजी काही घरगुती उपाय केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो.(home remedies for pimples) सुंदर त्वचेसाठी महागडे फांऊडेशन किंवा कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरण्याची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या काही आयुर्वेदिक घटकांच्या मदतीने त्वचा नैसर्गिकरित्या सुधारता येते. स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या काही साध्या पण गुणकारी गोष्टींमध्ये त्वचेला दुधासारखे नितळ बनवण्याची ताकद आहे. पिंपल्स, डार्क सर्कल्स आणि टॅनिंग घालवून चेहरा नैसर्गिकरित्या उजळण्यासाठी ५ आयुर्वेदिक उपाय एखाद्या जादूसारखे काम करतात.
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला खास सिरम लावल्यास त्वचा उजळण्यास मदत करेल. ज्येष्ठमध २ ते ३, अनंतमूळ ३, शतावरी २ ते ३, अश्वगंधा ३ , मंजिष्ठा ३ ते ४, नागरमोथा २, व्हिटॅमिन ई २ कॅप्सूल, कोरफडीचा गर १ चमचा, गुलाबजल ४ ते ५ थेंब इत्यादी साहित्य आपल्याला लागेल.
हे सिरम बनवण्यासाठी आपल्याला सर्व साहित्य दीड कप पाण्यात भिजवावे लागेल. दुसऱ्या दिवशी हे पाणी उकळून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल, कोरफडीचा गर आणि गुलाबपाणी घाला. हे सर्व घटक एकत्र झाल्यानंतर नाईट क्रीम तयार होईल. रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ धुवा. यानंतर हे क्रीम त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होईल. त्वचेला डिटॉक्सिफाय करण्यास आणि त्वचा चमकण्यास मदत होईल. या सिरममुळे वृद्धत्वाची लक्षणे लपवण्यास देखील मदत होते.
Web Summary : Achieve radiant skin naturally using Ayurvedic ingredients easily found in your kitchen. This simple night serum, made with herbs and aloe vera, helps reduce blemishes, dark circles, and signs of aging, revealing a brighter complexion.
Web Summary : अपने रसोई में आसानी से मिलने वाली आयुर्वेदिक सामग्री का उपयोग करके प्राकृतिक रूप से चमकदार त्वचा पाएं। जड़ी-बूटियों और एलोवेरा से बना यह सरल नाइट सीरम, दाग-धब्बों, डार्क सर्कल और उम्र बढ़ने के लक्षणों को कम करने में मदद करता है, जिससे रंगत निखरती है।