Join us

दिसाल इतक्या सुंदर की बघत राहिल प्रत्येकजण! ‘या’ घरगुती सीरमचे फक्त २ थेंब करतात जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 21:05 IST

Natural Homemade Serums for Glowing Skin : 4 Natural Anti-Ageing Serums to Replace Chemical Ones : Homemade Face Serums for Glowing Skin : Try These Homemade Serums for Naturally Glowing Skin : Mulethi Benefits for Skin Care : आजीबाईच्या बटव्यातील औषधी पदार्थांचे, त्वचेसाठी फायदेशीर असे घरगुती सीरम...

त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सीरम लावण्याचा ट्रेंड आला आहे. आपल्यापैकी बहुतेकजणी त्वचेसाठी सीरमचा वापर हमखास करतातच. सीरम त्वचेच्या खोल थरात (Natural Homemade Serums for Glowing Skin) सहज शोषून घेतलं जातं यामुळे त्वचेला आतून पोषण मिळून(Mulethi Benefits for Skin Care) त्वचा सुंदर दिसते. नियमित सीरम (4 Natural Anti-Ageing Serums to Replace Chemical Ones) वापरल्याने त्वचा दीर्घकाळ तरुण, मऊमुलायम आणि हेल्दी राहू शकते. त्वचेसाठी सीरम वापरायच म्हटलं की आपण बाजारांतून महागडे सीरम विकत आणतो. परंतु असे विकतचे सीरम (Homemade Face Serums for Glowing Skin) वापरण्यापेक्षा आपण घरच्याघरीच नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने सीरम तयार करु शकतो(Try These Homemade Serums for Naturally Glowing Skin).

नैसर्गिक घटकांनी तयार केलेले घरगुती नाईट सीरम त्वचेसाठी सर्वोत्तम आहे, कारण यात कोणतेही हानिकारक रसायन नसते. अशा सीरममध्ये घरीच उपलब्ध असलेले तुरटी, ज्येष्ठमध, ग्लिसरीन, खोबरेल तेल यांसारखे घटक वापरून त्वचेला पोषण, मॉइश्चर आणि नैसर्गिक संरक्षण मिळतं. हे सीरम रात्री झोपताना लावल्याने त्वचा दिर्घकाळ हायड्रेट राहते, काळे डाग कमी होतात, पोर्स टाईट होतात आणि त्वचेचा रंग उजळ होतो. केमिकलयुक्त सीरमपेक्षा हे घरगुती व नैसर्गिक नाईट सीरम नैसर्गिक, सुरक्षित आणि त्वचेसाठी उपयुक्त ठरु शकते. घरगुती पदार्थांच्या मदतीने नैसर्गिक सीरम कसे तयार करायचे ते पाहूयात.

साहित्य :- 

१. तुरटी - १ खडा २. ज्येष्ठमध - १ छोटा तुकडा ३. ग्लिसरीन - १ टेबलस्पून ४. खोबरेल तेल - १ टेबलस्पून 

नाईट सीरम तयार करण्यासाठी काय करावे ? 

नाईट सीरम तयार करण्यासाठी सर्वातआधी तुरटीचा खडा फोडून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावी. आता एक स्वच्छ काचेची बरणी घेऊन त्यात सर्वातआधी खोबरेल तेल ओतावे. आता या तेलात तुरटीची पावडर घालून ती चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावी. त्यानंतर या मिश्रणात थोडे ग्लिसरीन घालून पुन्हा सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. सगळ्यात शेवटी या तयार मिश्रणात एक ज्येष्ठमधाच्या काडीचा छोटा तुकडा घालावा. आता या बरणीचे झाकण व्यवस्थित घट्ट लावून घ्यावे. ही बरणी आपण सुमारे ३ दिवस हलक्या सूर्यप्रकाशात किंवा नॉर्मल रुम टेम्परेचरला देखील खोलीत ठेवू शकता. ३ दिवसानंतर जेव्हा यातील घटक पदार्थांचा अर्क एकमेकांत उतरुन सगळे एकजीव होईल तेव्हा हे घरगुती सीरम वापरण्यासाठी तयार असेल. 

१ चमचा खोबरेल तेल-१ चिमूट तुरटी, चेहरा इतका चमकेल की मैत्रिणी विचारतील फेशियलचं नाव...

पित्तदोष वाढून त्वचेवर पिंपल्स येतात? दोन्ही समस्यांवर १ असरदार उपाय - पित्त होईल कमी पिंपल्स गायब...

याचा वापर नेमका त्वचेसाठी कसा करावा ? 

आपले नाईट सीरम वापरासाठी तयार झाल्यावर आपण ते त्वचेला लावू शकतो. हे सीरम त्वचेला लावताना एका विशिष्ट पद्धतीने लावले जाते. या बरणीत आपण ज्येष्ठमधाच्या काडीचा जो छोटा तुकडा टाकला होता, तो तुकडा सीरममध्ये भिजवून तसाच त्वचेवर सर्वत्र फिरवून सीरम लावावे. त्यानंतर किमान तासभर हे सीरम त्वचेवर तसेच लावून ठेवावे, आपण हे सीरम रात्रभर देखील त्वचेवर तसेच लावून ठेवू शकता. 

भूमी पेडणेकरचा 'संडे स्पेशल फेसमास्क', पाहा तिच्या सुंदर त्वचेचे गुपित - वापरते 'हा' खास पदार्थ...

हे घरगुती सीरम वापरण्याचे फायदे... 

१. तुरटी :- त्वचेचे पोर्स टाईट करून पिंपल्स आणि त्वचेला होणारे इतर संसर्ग कमी करण्यास फायदेशीर. 

२. ज्येष्ठमध :- त्वचेची चमक वाढवते आणि पिंपल्सचे काळे डाग, पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते.

३. ग्लिसरीन :- ग्लिसरीन आतून त्वचेला खोलवर हायड्रेट करते आणि मऊ ठेवते.

४. खोबरेल तेल :- खोबरेल तेल त्वचेला पोषण देते आणि कोरडेपणा दूर करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय