Join us

मानेचा काळपटपणा होईल अर्ध्या टोमॅटोने दूर, पाहा इन्स्टंट उपाय; डाग होतील गायब-मान चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2024 11:38 IST

Natural Home Remedies To Get Rid Of Dark Neck : काळवंडलेल्या मानेवर एक झटपट उपाय, अर्ध्या टोमॅटोचा वापर नेमका कसा करायचा? पाहा..

हिवाळ्यात त्वचेची (Skin Care) विशेष काळजी घ्यावी लागते. कारण स्किन ड्राय होते. शिवाय काळपटही पडू लागते. आपण सर्वजण त्वचेच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देतो. परंतु मान आणि कोपरांच्या स्वच्छतेकडे म्हणावे तसे लक्ष देणे होत नाही. ज्यामुळे आपले कोपरे आणि मान काळी दिसते. मानेचा काळपटपणा काढण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. पण हे उपाय उपयुक्त ठरतीलच असे नाही. विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केल्याने मानेचा काळपटपणा लवकर निघत नाही. ज्यामुळे बऱ्याचदा चारचौघात लाजिरवाणे वाटते.

मानेचा काळपटपणा काही केल्या निघत नसेल तर, आपण टोमॅटोचा वापर करू शकता (Dark Neck). टोमॅटोचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून, त्वचेवरील काळपट डाग काढण्यासाठीही होऊ शकते. मानेचा काळपट डाग काढण्यासाठी टोमॅटोचा वापर कसा करावा? पाहा(Natural Home Remedies To Get Rid Of Dark Neck by use of Tomato).

मानेचा काळपटपणा काढण्यासाठी टोमॅटोचा वापर कसा करावा?

साहित्य

टोमॅटो

साखर

कॉफी

बीटरूट

केस गळून झाडूसारखे झालेत? खोबरेल तेलात मिसळा ३ पैकी १ तेल, दाट केसांसाठी टॉनिक

खोबरेल तेल

दही

धकधक गर्ल माधुरी दीक्षितसारखं चेहऱ्यावर येईल तेज, रोज फक्त १ गोष्ट चेहऱ्याला लावा

मान स्वच्छ सुंदर दिसावी असे प्रत्येकाला वाटते. आपण मानेचा काळपट डाग काढण्यासाठी टोमॅटोचा वापर करू शकता. यासाठी अर्धा टोमॅटो घ्या. त्यावर थोडी साखर, थोडी कॉफी, बीटरूट पावडर, खोबरेल तेल आणि दही घालून चमच्याने मिक्स करा, आणि मानेवर ठेवून घासा. ५ ते ७ मिनिटांसाठी टोमॅटोने मान घासून मळ काढा. नंतर पाण्याने स्वच्छ करा. आपण याचा वापर आठवड्यातून ३ वेळा करू शकता. या उपायामुळे काही दिवसात मान स्वच्छ होईल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स