पांढऱ्या केसांची समस्या (White Hairs) आजकाल अनेकांना उद्भवते. जास्त ताण घेणं, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, हेअर केअर चुकीच्या पद्धतीनं करणं यामुळे केसांचं नुकसान होतं. बऱ्याच लोकांना काळे, दाट केस हवे असतात. (How To Make Natural Amla Hair Dye) अशा स्थितीत केमिकलयुक्त हेअर डाय लावल्यामुळे केस अजूनच खराब होतात. स्काल्पमध्ये वेदना, जळजळ, कोरडेपणा, हेअर फॉल यांसारख्या समस्या उद्भवतात. जर तुम्हाला काळे दाट केस हवे असतील तर तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How To Make Natural Amla Hair Dye at Home Without Chemicals)
केमिकल हेअर डाय केसांना लगेच रंगवते पण यामुळे केसांमध्ये कोरडेपणा, स्काल्पमध्ये जळजळ, केसांचा कोरडेपणा आणि दीर्घकाळ हेअर फॉल यांसारख्या समस्या उद्भवतात. आयुर्वेदीक आणि घरगुती उपाय करून तुम्ही केसांच्या समस्या टाळू शकता.
आवळा भारतीय घरांमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे. आवळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी, एंटी ऑक्सिडेंट्स आणि टॅनिन्स असतात. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होते. केसांची मुळं मजबूत होतात आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंद होते. आवळा केसांसाठी मेलानिन तयार करण्यास मदत करतो. ज्यामुळे केस दीर्घकाळ काळे, दाट राहण्यास मदत होते.
लग्नसराईसाठी स्पेशल कलांजली पैठणी; १० सुंदर, युनिक रंग, प्रिमियम आरी वर्क ब्लाऊजही मिळेल
आवळ्याचा हेअर डाय कसा तयार करायचा?
सगळ्यात आधी एका स्वच्छ भांड्यात आवळा पावडर घ्या. त्यात थोडं कोमट पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ ते २० मिनिटं केसांना लावलेली राहू द्या. जेणेकरून आवळ्यातील टॅनिन्स व्यवस्थित एक्टिव्ह होतील.
नंतर यात मेहेंदी आणि इंडिगो पावडर मिसळा. जर तुम्हाला काळा रंग हवा असेल तर इंडिगोचे प्रमाण थोडे वाढवू शकता. रंग आणखी गडद करण्यासाठी त्यात कॉफी किंवा काळा चहा घाला. लिंबाचा रस नॅच्युरली केसांना काळे करतो आणि केस कोरडे होण्यापासून रोखतो. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून तुम्ही पातळ पेस्ट तयार करू शकता. ३० ते ४५ मिनिटं झाकून ठेवा.
केस विरळ तर झालेच, सहा महिन्यात वाढलेलेही नाहीत? २० रूपयांत करा हे घरगुती हेअर टॉनिक-पाहा कमाल
हेअर डाय केसांना कसा लावावा?
हा हेअर डाय केसांना लावण्याआधी केस माईल्ड शॅम्पूनं स्वच्छ धुवा नंतर कंडिशनर लावा. नंतर छोट्या छोट्या सेक्शनमध्ये केस विभागून घ्या. नंतर बोटांच्या मदतीनं केसांच्या मुळांपासून ही पेस्ट लावा. केसांना शॉवर कॅप किंवा जुन्या टॉवेलनं झाका. दीड ते २ तास तसंच ठेवा. तुम्ही ३ तास ही तसंच ठेवू शकता. त्यानंतर साध्या पाण्यानं केस स्वच्छ धुवा. शॅम्पू लावू नका. कमीत कमी २४ तासांनी शॅम्पू लावा जेणेकरून रंग व्यवस्थित सेट होईल.
चांगल्या परिणामांसाठी नेहमी ताजी पेस्ट तयार करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा. कोरड्या केसांना लिंबाऐवजी एलोवेरा जेल किंवा दही लावा. तुम्ही आवळ्याच्या तेलानं मालिश करू शकता. केसांना जळजळ होत नाही ना दुर्गंध येतो. या पद्धतीनं तुम्ही चमकदार, हेल्दी केस मिळवू शकता. हा उपाय करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.
Web Summary : Combat grey hair naturally with amla! This DIY dye uses amla, henna, and indigo to darken hair, strengthen roots, and promote healthy growth. Regular use can provide shiny, healthy hair.
Web Summary : आंवला, मेहंदी और इंडिगो से घर पर डाई बनाकर सफेद बालों को प्राकृतिक रूप से काला करें। यह बालों की जड़ों को मजबूत करता है और स्वस्थ विकास को बढ़ावा देता है। नियमित उपयोग से बाल चमकदार और स्वस्थ बनते हैं।