Join us

चमचाभर शिळा भात चेहऱ्यालाही लावा- चेहरा चमकवणारा फेसपॅक तयार! पाहा उरलेल्या भाताची कमाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2025 14:45 IST

Natural face mask from leftover rice : Leftover rice face mask benefits : How to use leftover rice for glowing skin : रात्रीच्या उरलेल्या भाताचा आपल्या त्वचेसाठी एक उत्तम आणि स्वस्तात मस्त फेसमास्क होऊ शकतो.

रात्रीच्या जेवणात बऱ्याच घरांमध्ये हमखास भात खाल्ला जातो. परंतु काहीवेळा हा भात संपतोच असे नाही तर, थोडा शिल्लक राहतोच. अशावेळी आपण शिल्लक राहिलेला भात दुसऱ्या दिवशी फोडणी देऊन फोडणीचा भात किंवा इतर वेगवेगळे पदार्थ करुन खातो. परंतु नेहमीच या भाताचे पदार्थ करुन खाण्यापेक्षा हा शिल्लक (Natural face mask from leftover rice) राहिलेला भात आपण त्वचेला नितळ, उजळ आणि मऊ करण्यासाठी एक नैसर्गिक (Leftover rice face mask benefits) उपाय म्हणून वापरु शकतो. भातामध्ये असणारे व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि स्टार्च त्वचेला हायड्रेट करतात, टॅनिंग कमी करतात आणि (How to use leftover rice for glowing skin) चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतात.

रात्री उरलेला शिळा भात दुसऱ्या दिवशी खाणे आरोग्यासाठी हानिकारक असले तरी ते त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण घरगुती उपायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेसपॅक तयार करुन त्वचेला लावत असतो. यातच आपण हा शिल्लक राहिलेल्या भाताचा देखील फेसपॅक तयार करु शकतो. रात्रीच्या उरलेल्या भाताचा आपल्या त्वचेसाठी एक उत्तम आणि स्वस्तात मस्त फेसमास्क होऊ शकतो. उरलेल्या भाताचा घरच्याघरीच फेसमास्क कसा करायचा ते पाहा.. 

डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर शिरीन फातिमा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शिल्लक राहिलेल्या भाताचा फेसपॅक कसा तयार करायचा याची अधिक माहिती शेअर केली आहे. शिल्लक राहिलेल्या भाताचा फेसपॅक तयार करण्यासाठी ३ टेबलस्पून शिळा भात, प्रत्येकी १ टेबलस्पून कोरडी भाजून घेतलेली हळद, कॉफी पावडर, २ ते ३ थेंब लिंबाचा रस, मिल्क पावडर, गरजेनुसार गुलाब पाणी किंवा थोडे दूध इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

मिठाच्या पाण्यानं चेहरा धुवा-बघा तुमच्या चेहऱ्यावरचं वाढणारं तेज! चवीपुरतं मीठ बदलून टाकेल रुप...

फेसपॅक कसा तयार करायचा ?    

फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वातआधी शिल्लक राहिलेला भात एका बाऊलमध्ये घेऊन तो मॅश करुन घ्यावा. मॅश केलेल्या भातात कोरडी भाजून घेतलेली हळद, कॉफी पावडर, मिल्क पावडर घालावी. त्यानंतर, लिंबाचा रस घालावा आता हे सगळे घटक चमच्याने कालवून एकजीव करुन घ्यावेत. जर ही तयार पेस्ट अधिक घट्ट झाली असेल तर त्यात थोडे गुलाबपाणी किंवा दूध घालून पेस्ट थोडी पातळ करुन घ्यावी. हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटे तसाच ठेवून द्यावा त्यानंतर, पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 

आणा बेकिंग सोडा, विसरा केसातला कोंडा! बेकिंग सोड्यासह ३ पदार्थ मिसळून केसांना लावा, कोंडा गायब...

हा फेसपॅक लावण्याचे फायदे... 

१. शिळा भात :- त्वचेला थंडावा देतो, टॅनिंग कमी करतो आणि त्वचेचा नितळपणा वाढवतो.

२. हळद :- अँटीबॅक्टेरियल असून पिंपल्स, डाग आणि सूज यावर गुणकारी असते.

३. कॉफी पावडर :- त्वचेला डीटॉक्स करते, ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि नैसर्गिक ग्लो आणते.

४. मिल्क पावडर :- त्वचा उजळवते, कोरडेपणा दूर करते आणि त्वचेला मृदूपणा देते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी