अन्हेल्दी लाईफस्टाईल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषण यामुळे कमी वयातच लोकांचे केस पांढरे होत आहेत. कमी वयात केस पांढरे होण्याची अनेक कारणं असू शकतात (Natural Dye For Grey Hairs). पांढरे केस लपवण्यासाठी आजकाल डाय, स्प्रे यांसारख्या आर्टिफिशियल पदार्थांचा वापर केला जातो. ज्यामुळे केस वेगानं पांढरे होतात आणि कमकुवत दिसू लागतात. पांढरे केस लपवण्यासाठी तुम्ही घरच्याघरी डाय बनवू शकता. आवळ्यापासून तयार झालेल्या हेअर डायचा वापर केल्यास तुमचे केस मुळापासून काळे होतील. (Amla Hair Dye For Black Hairs Homemade Hair Dye)
केसांसाठी आवळ्याचे फायदे काय आहेत?
केसांसाठी आवळा बराच लाभदायक ठरतो. आवळा व्हिटामीन सी आणि टॅनिनने परीपूर्ण असतो. आवळ्याच्या मुळांना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवण्यासाठी तसंच वेळेआधी पांढरे होऊ नयेत यासाठी आवळा मदत करतो. आवळ्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते. केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. आवळा जेव्हा लोखंडाच्या भांड्यात ठेवला जातो तेव्हा त्यातील रस लोखंडातील खनिजांसोबत सक्रीय होतो आणि रंग गडद बनतो. ज्यामुळे केसांची संरचना मजबूत होते आणि केस नैसर्गिकरित्या काळे होतात. आवळा केसांना काळा आणि दाट बनवण्यास मदत करतो. ज्यामुळे केसांचा नैसर्गिकरंग दीर्घकाळ टिकून राहतो आणि केस मऊ मुलायम राहतात.
आवळ्याचा हेअर डाय कसा करायचा?
आवळ्याचे तुकडे आणि चहा पावडर सुकी भाजून घ्या. चहाचे पाणी आणि आवळे केसांच्या मुळांना व्यवस्थित चिकटते. रात्रभर तसंच ठेवल्यानंतर ही पेस्ट चांगल्या पद्धतीनं काम करते. हे मिश्रण इतकं घट्ट असावं की केसांमध्ये समान पद्धतीनं पसरायला हवं.
आवळ्याचा हेअर डाय कसा तयार करायचा?
आवळ्याचे तुकडे आणि आवळा पावडर एका लोखंडाच्या भांड्यात घालून भाजून घ्या. आवळा पावडर हलकी भाजून घ्या नंतर काळी होईपर्यंत व्यवस्थित भाजा पण पावडर जळू देऊ नका. भाजलेली पावडर थंड झाल्यानंतर गरजेनुसार चहा पावडर उकळवून घ्या आणि गाळून पाणी मिसळून जाड, घट्ट पेस्ट तयार करा. यावर एक भांडं झाकून ही पेस्ट कमीत कमी ८ ते १० तास रात्रभर पाण्यात भिजवलेली ठेवा. यातील आयर्न आणि आवळा पावडर केसांना नैसर्गिक रंग प्रधान करते.
