उन्हाळा असो किंवा कामाचा ताण, शरीराला घाम येणं ही नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या घामाचा जेव्हा उग्र वास येऊ लागतो तेव्हा चारचौघात आपली फजिती होते की काय असा प्रश्न पडतो. काखेतील काळपटपणा हा महिलांसाठी एक मोठा चिंतेचा विषय असतो.(Kakhetil kalpatpana kami karnyache upay) कारण त्वचा काळपट दिसते आणि सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे इच्छा असूनही अनेक महिला किंवा तरुणी स्लीव्हलेज् घालणं टाळतात. काखेतील काळे डाग दूर करण्यासाठी अनेक बाजारात अनेक प्रॉडक्ट्स मिळत असीतल, पण त्यात नुकसानकारक केमिकल्स असतात. ज्यामुळे त्वचेला फायदा मिळण्याऐवजी नुकसान होतं.
ही दुर्गंधी घालवण्यासाठी आपण बाजारात मिळणारे महागडे डिओडोरंट (Deodorants) किंवा अँटी-पर्सपिरंट्स (Anti-perspirants) वापरतो. पण हे स्प्रे तात्पुरता सुगंध देत असले तरी त्यामध्ये 'ॲल्युमिनियम', 'पॅराबेन्स' आणि कृत्रिम सुगंधी द्रव्ये यांसारखी घातक रसायने असतात.(How to remove underarm odor naturally ) यातील रसायने आपल्या त्वचेची छिद्रे बंद करतात, ज्यामुळे त्वचेला श्वास घेता येत नाही. त्यामुळे काखेतील त्वचा काळी पडणे, खाज सुटणे किंवा गाठी तयार होणे अशा समस्या उद्भवू शकतात. पण फक्त १० रुपयांत आपण घरच्या घरी 'नॅचरल रोल-ऑन' तयार करू शकतो. हा रोल- ऑन बनवण्याची सोपी पद्धत पाहूया.
रोल-ऑन बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तुरटीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. घामाला स्वत:चा असा कोणताही वास नसतो. पण जेव्हा त्वचेवरील बॅक्टेरिया घामाच्या संपर्कात येतात तेव्हा दुर्गंधी निर्माण होते. तुरटी हे बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करते. कोरफड हे आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे आणि मऊ करण्याचे काम करते. हे त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी आणि काखेतील त्वचा उजळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने ठेवते. तर पेपरमिंट ऑइल हे तेल त्वचेला थंडावा देते आणि नैसर्गिकरित्या फ्रेश वाटते.
रोल-ऑन बनवण्याची कृती
सगळ्यात आधी एका भांड्यात ३ ते ४ चमचे गुलाब पाणी घ्या. नंतर त्यात तुरटीचा छोटा तुकडा घाला. ती विरघळल्यानंतर त्यात २ चमचे ताज्या कोरफडीचा गर घाला आणि मिश्रण चांगले एकजीव करा. नंतर यात २ ते ३ थेंब पेपरमिंट ऑइल घाला. हे मिश्रण एका रिकाम्या स्प्रेच्या बाटलीत भरा. हे नियमितपणे काखेत लावल्यास आपल्याला हवा तसा रिजल्ट मिळेल. तसेच त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही.
