Join us
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या केसांवर नैसर्गिक तोडगा! घरीच करा नॅचरल हेअर कलर- सोपा उपाय- केसांना मिळेल सुंदर बर्गंडी रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 15:56 IST

Chemical free hair dye for White hair coverage: Henna and beetroot hair pack for shiny burgundy hair: घरी नॅचरल हेअर कलर कसा बनवायचा पाहूया.

केस पांढरे होणे ही आजच्या धावपळीच्या जीवनात एक सामान्य समस्या बनली आहे. प्रदूषण, चुकीचा आहार आणि मानसिक ताण यामुळे तरुण वयातच केस पिकू लागतात.(Hair care tips) बाजारात मिळणारे महागडे हेअर कलर्स किंवा 'डाय' तात्पुरता निकाल देतात खरा, पण त्यातील अमोनिया आणि इतर रसायने केसांचा नैसर्गिक पोत खराब करतात. यामुळे केस कोरडे होणे, गळणे आणि मुळांपासून कमकुवत होणे अशा समस्या उद्भवतात.(Chemical free hair dye for White hair coverage) घरच्या घरी तयार केलेला हा नैसर्गिक हेअर कलर केसांना काळेच करत नाही, तर त्यांना एक सुंदर रंगही देतो. महागड्या हेअर डायरपेक्षा घरच्या घरी तयार केलेला मेहेंदीचा हा रंग केसांची वाढ देखील करतो.(Henna and beetroot hair pack for shiny burgundy hair) तसेच या हेअर कलरमुळे केसांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. हा नॅचरल हेअर कलर कसा बनवायचा पाहूया. 

काय पुरावा, आजारी आहेस? हाताला सलाईन लावलेल्या बायकोला घेऊन नवरा पोहचला ऑफिसात, नोकरीसाठी जीव धोक्यात..

केसांना काळे करण्यासाठी आपल्याला केसांच्या लांबीनुसार योग्य प्रमाणात नैसर्गिक मेहंदी पावडर घ्यावी लागेल. त्यानंतर लोखंडी कढईत मेहंदी पावडर घाला. या पावडरमध्ये थोडा बीटरुटचा रस आणि कॉफी पावडर मिसळा. नंतर थोडे पाणी घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. ज्यामुळे त्यात गुठळ्या राहणार नाहीत. हे मिश्रण तयार झाल्यावर त्यावर झाकण ठेवून रात्रभर लोखंडी कढईतच राहू द्या. रात्रभर ठेवल्यामुळे लोखंडाचे अंश मेहंदीत उतरतात आणि रंग अधिक गडद होतो.

सकाळी हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्या. केसांचे छोटे छोटे भाग करून मुळांपासून ते टोकांपर्यंत (Root to ends) हा नैसर्गिक कलर नीट लावा. कलर लावून झाल्यावर केस शावर कॅपने कव्हर करा, ज्यामुळे ओलावा टिकून राहील आणि रंग नीट बसेल. हा पॅक केसांवर किमान १ तास तसाच ठेवा.

१ तास पूर्ण झाल्यानंतर केस कोमट किंवा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. केस धुताना लगेच शाम्पूचा केसांना लावू नका. यामुळे रंग निघून जाऊ शकतो. दुसऱ्या दिवशी केसांना शाम्पू करणं जास्त फायदेशीर आहे. या उपायामुळे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळेभोर होण्यास मदत होते आणि त्यांना सुंदर गडद रंग मिळतो. बीटरूट आणि कॉफीमुळे केसांचा पोत सुधारतो आणि केसांना एक वेगळीच चमक येते.नियमित वापरामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस दाट दिसू लागतात.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Natural hair color at home: Burgundy shade using beetroot and henna.

Web Summary : Combat grey hair naturally with a homemade dye. Henna, beetroot, and coffee create a burgundy shade, strengthening hair without harsh chemicals. Regular use promotes healthy, dark, and shiny hair.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी