बऱ्याचदा असं होतं की रोजच्या कामाच्या धावपळीत आपलं त्वचेकडे फारसं लक्ष देणं होत नाही. त्यामुळे मग काही दिवसांतच त्वचा डल, ड्राय दिसू लागते. पिगमेंटेशन, टॅनिंग, डेड स्किनही वाढायला लागते. अशावेळी मग आपण पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून घेतो. त्यानंतर काही दिवस चेहरा चांगला दिसतो. पण नंतर मात्र पुन्हा त्वचा जशी होती तशीच दिसायला लागते. हे टाळायचं असेल तर घरच्याघरी एक अगदी साधा- सोपा उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा. तुमची त्वचा चमकदार, स्वच्छ तर होईलच शिवाय त्वचेवरच्या बारीकशा सुरकुत्या कमी होऊन ती अधिक तरुण दिसू लागेल (Natural Botox Treatment For Skin at Home). त्वचेचं अशा पद्धतीने घरच्याघरी नॅचरल बोटॉक्स करायचं असेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(how to make banana face pack for young and glowing skin?)
त्वचेसाठी केळीचा फेसमास्क
केळ जसं आरोग्यासाठी उत्तम आहे, तसंच ते आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये व्हिटॅमिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे केळ हे त्वचेसाठी एखाद्या नॅचरल बाेटॉक्सप्रमाणे काम करतं.
चहाप्रेमी आहात ना? मग चहाचे ४ नियम तुम्हाला माहिती हवेतच! आरोग्य जपत चहा प्यायचा तर....
हा उपाय करण्यासाठी एक पिकलेलं केळ घ्या. ते व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यामध्ये १ चमचा दही घाला. दह्यामध्ये लॅक्टीक ॲसिड आणि काही हेल्दी फॅट्स असतात जे त्वचेला मॉईश्चराईज करून पिगमेंटेशन, टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतात.
आता या मध्येच एक चमचा मध घाला. मध तुम्ही नाही घातला तरी चालेल. पण मधामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल घटक असतात. शिवाय मध त्वचेला नॅचरली हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे मध घालणं अधिक चांगलं.
केस वाढत नाहीत म्हणून कापतच नाही? तुम्ही चुकताय- बघा नियमितपणे हेअरकट करण्याचे ४ फायदे
आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा आणि हा लेप तुमच्या त्वचेला लावा. केळीचा हा फेसमास्क चेहऱ्याला लावल्यानंतर १० ते १५ मिनिटे तो त्वचेवर तसाच राहू द्या आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय करा. त्वचेमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल, अशी माहिती ब्यूटी एक्सपर्टने rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.