हल्ली आपल्या त्वचेला नेहमीच धूर, धूळ, प्रदुषण, ऊन यांचा सामना करावा लागतो. शिवाय बऱ्याच जणांचं आहाराकडेही पुरेसं लक्ष नसतं. याशिवाय कामाची धावपळ, ताणतणाव हे सगळं तर प्रत्येकाच्याच मागे आहे. कामानिमित्त अनेक जणांना तासनतास स्क्रिन पाहावी लागतेच. या सगळ्या गोष्टींचा नकळत आपल्या त्वचेवरही परिणाम होतोच. त्यामुळेच हल्ली कमी वयातच अनेकजणींच्या चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या दिसायला सुरुवात झाली आहे. डोळ्यांच्या आजुबाजुची त्वचा आणि कपाळ या भागात सगळ्यात आधी सुरकुत्या यायला सुरुवात होते (how to get rid of fine lines?). अशी सुरुवात व्हायला लागली की वेळीच सावध होण्याची आणि त्यावर तात्काळ उपाय करण्याची गरज आहे. त्यासाठीच आता हा एक स्वस्तात मस्त सोपा उपाय पाहा.(Home Made Botox Treatment For Reducing Wrinkles)
त्वचेवर बारीकशा सुरकुत्या दिसू लागताच काय काळजी घ्यावी?
आपल्याला माहितीच आहे की सेलिब्रिटी वाढत्या वयाच्या खाणाखुणा लपविण्यासाठी बोटॉक्स ट्रिटमेंट घ्यायला सुरुवात करतात. ही ट्रिटमेंट घेतल्यानंतर चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होऊन त्वचा टाईट होते आणि त्यामुळे मग सेलिब्रिटी आहेत त्यापेक्षा कमी वयाचे दिसू लागतात.
बनारसी साडी, सिंदूर अन गळ्यात माणिक मोत्यांचा हार! कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय आली अन्...
आता असंच थोडंंसं आपल्याला घरच्याघरी करून पाहायचं आहे. त्यासाठी आपल्याला काेणतेही महागडे उपाय करण्याची गरज नाही. तर आपल्या घरात नेहमी आढळून येणारे २ पदार्थ वापरून त्वचेचं तारुण्य कसं टिकवून ठेवता येतं ते आपण आता पाहूया..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला खोबरेल तेल आणि लवंग हे दोन पदार्थ लागणार आहेत.
त्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये १५ ते २० लवंग थोड्याशा ठेचून बारीक करून टाका. आता हे तेल गॅसवर गरम करायला ठेवा.
तेल १० ते १५ मिनिटे गरम झाल्यानंतर उकळायला लागेल. तेलाला उकळी आल्यानंतर लवंगचा अर्क तेलात उतरल्यासारखा दिसेल आणि तेलाचा रंग बदलेल. असं झाल्यावर गॅस बंद करा. हे तेल थंड झाल्यानंतर बाटलीमध्ये भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापुर्वी या तेलाने चेहऱ्याला मसाज करा. काही दिवसांतच त्वचेवरच्या सुरकुत्या गायब होतील आणि त्वचेचा टाईटनेसही वाढेल.