आजकाल सुंदर दिसण्यासाठी आपण काय नाही करत? महागडे क्रीम, सीरम, फेस ऑइल, ट्रीटमेंट्स... महिन्याला हजारो रुपये स्किनकेअरवर खर्च करतो.(natural botox remedy) पण तरीही त्वचा कोरडी, निस्तेज, डाग किंवा खड्डे पडलेले दिसतात. सध्या तरुण दिसण्यासाठी अनेक जण महागड्या बोटॉक्स ट्रीटमेंट्स, केमिकल क्रीम्स आणि पार्लर फेशियल्सकडे वळतात.(homemade anti aging remedy) पण या उपचारांचा खर्च जास्त असतोच, शिवाय त्वचेला दुष्परिणाम होण्याची भीतीही असते.(reduce wrinkles naturally)
सतत केमिकल्स वापरल्यामुळे त्वचा कोरडी पडणे, पुरळ येणे, हायपरपिग्मेंटेशन वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आता अनेकजण घरगुती, नैसर्गिक उपायांकडे वळताना दिसत आहेत. खरं सांगायचं तर आपली आई- आजी त्वचा सुंदर, तजेलदार ठेवण्यासाठी असे अनेक उपाय करत होते. ज्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत नव्हते. योग्य पद्धतीने काही घरगुती घटक वापरले, तर त्वचेवर बोटॉक्ससारखा नैसर्गिक टाइटनिंग इफेक्ट मिळू शकतो. हा उपाय अत्यंत स्वस्त असून साधारण १० रुपयांत सहज तयार होतो.
घरगुती बोटॉक्स फेस मास्क तयार करण्यासाठी आपल्याला पाणी, १ चमचा मैदा, १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा देशी तूप किंवा नारळ तेल लागेल. एका पॅनमध्ये पाणी गरम करा आणि त्यात १ चमचा मैदा घाला. क्रिमी टेक्सचर येईपर्यंत शिजवा. त्यात १ चमचा कॉफी पावडर घाला आणि चांगले मिसळा. क्रिमी कंसन्सिटी तयार करण्यासाठी मिश्रणात १ चमचा तूप किंवा खोबरेल तेल घाला. आपला बोटॉक्स मास्क तयार आहे.
हे क्रीम थंड झाल्यावर चेहऱ्यावर लावा आणि ३० मिनिटे राहू द्या. साध्या पाण्याने चेहरा धुवा. हे नियमितपणे केल्याने चेहरा उजळण्यास मदत होईल. तसेच चेहरा चमकदार होईल. सुरकुत्या आणि हायपरपिग्मेंटेशनपासून मुक्त होण्यासाठी देखील हा मास्क खूप फायदेशीर आहे.
