Lokmat Sakhi >Beauty > वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असलेले हट्टी डार्क सर्कल्स होतील गायब, आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय...

वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असलेले हट्टी डार्क सर्कल्स होतील गायब, आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय...

Mulethi Powder For Dark Circles : Get Rid Of Dark Circles Using 100% Natural Eye Pack : Use Mulethi like this to reduce dark circle from face : How to remove dark circles under eyes permanently naturally : डोळ्यांखाली असलेले डार्क सर्कल्स होतील चुटकीसरशी कमी, फक्त करुन पाहा हा खास औषधी नैसर्गिक उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 15:57 IST2024-12-27T15:56:58+5:302024-12-27T15:57:21+5:30

Mulethi Powder For Dark Circles : Get Rid Of Dark Circles Using 100% Natural Eye Pack : Use Mulethi like this to reduce dark circle from face : How to remove dark circles under eyes permanently naturally : डोळ्यांखाली असलेले डार्क सर्कल्स होतील चुटकीसरशी कमी, फक्त करुन पाहा हा खास औषधी नैसर्गिक उपाय...

Mulethi Powder For Dark Circles How to remove dark circles under eyes permanently naturally Use Mulethi like this to reduce dark circle from face Get Rid Of Dark Circles Using 100% Natural Eye Pack | वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असलेले हट्टी डार्क सर्कल्स होतील गायब, आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय...

वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असलेले हट्टी डार्क सर्कल्स होतील गायब, आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय...

त्वचेशी संबंधित अनेक समस्या आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा आणतात. या त्वचेच्या अनेक समस्यांपैकी एक सर्वात कॉमन समस्या म्हणजे डोळ्यांखाली काळी वर्तुळं. काळी वर्तुळे (Use Mulethi like this to reduce dark circle from face) केवळ डोळ्यांचे सौंदर्यच बिघडवत नाहीत तर संपूर्ण चेहऱ्याचा लूकही (Mulethi Powder For Dark Circles) खराब करतात. जर योग्य वेळीच या समस्येकडे लक्ष दिले नाही तर ही काळ्या वर्तुळांची समस्या सुटत नाही उलट ती आणखीनच तीव्र होते. ऐन तारुण्यात जर डोळ्यांखाली असे गडद डार्क सर्कल्स (How to remove dark circles under eyes permanently naturally) आले तर आपण कमी वयातच वयस्कर दिसू लागतो. डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येण्याची अनेक लहान - मोठी कारणे असू शकतात.

डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. मात्र तरीसुद्धा डोळ्यांखालील काळी वर्तुळ निघून जात नाही. फेशियल, क्लिनअप, बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. तरीसुद्धा डोळ्यांखालील काळेपणा निघून जात नाही. डोळ्यांखाली डार्क सर्कल आल्यानंतर चेहरा पूर्णपणे खराब होऊन जातो. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही क्रिम्सचा वापर करण्याऐवजी आपण काही घरगुती नैसर्गिक उपाय करुन पाहू शकतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळ आल्यानंतर चेहरा सतत आजारी असल्यासारखा वाटू लागतो. डोळे आणि चेहरा पूर्णपणे रुक्ष आणि निस्तेज होतो. यासाठीच डोळ्यांखाली डार्क सर्कल्स घालवण्यासाठी आपण आजीबाईच्या बटव्यातील एका खास आयुर्वेदिक औषधी (Mulethi For Reducing Dark Circle) वनस्पतीचा वापर करणार आहोत. यामुळे तुमच्या डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कितीही वर्षापूर्वीचे जुनाट असतील तरीही ते अगदी सहजपणे निघून जातील. डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी त्यांच्या vedamrit_ या इंस्टाग्राम अकाउंटवरुन डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी नेमका कोणता नॅचरल उपाय करु शकतो याबद्दल अधिक माहिती व्हिडीओमध्ये शेअर केली आहे. 

साहित्य :- 

१. ज्येष्ठमध पावडर - १ टेबलस्पून  
२. हळद - १/४ टेबलस्पून 
३. एरंडेल तेल - १/२ टेबलस्पून 
४. पाणी - गरजेनुसार

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये ज्येष्ठमध पावडर, हळद, एरंडेल तेल घेऊन सगळे जिन्नस एकत्रित चमच्याने मिक्स करून घ्यावेत. 
२. त्यानंतर आता या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून मध्यम कंन्सिस्टंन्सीची पेस्ट तयार करून घ्यावी. 
३. डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स घालवण्यासाठी घरगुती नैसर्गिक उपाय म्हणून करण्यासाठी अंडर आयमास्क तयार आहे. 

भरपूर मेकअप करूनही अभिनेत्री लपवू शकत नाहीत हे ४ स्किन प्रॉब्लेम्स, कारण त्वचेच्या या समस्या...


भेगा पडल्यानं टाचा दुखतात? शहनाज़ हुसैन सांगतात एक जादुई तेल, टाचा दुखणं थांबेल...

याचा वापर कसा करावा ? 

या तयार पेस्टचा वापर करताना ब्रश किंवा बोटांच्या मदतीने आपण हा तयार अंडर आयमास्क डोळ्यांखाली लावू शकतो. डोळ्यांच्या खाली आणि पापण्यांच्या वर तसेच डोळ्यांच्या अवतीभोवतीच्या त्वचेवर आपण हा अंडर आयमास्क लावू शकता. त्यानंतर १० ते १५ मिनिटे किंवा हा संपूर्ण आयमास्क सुकेपर्यंत तसाच लावून ठेवावा त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.     ​

 

डार्क सर्कल्ससाठी अंडर आयमास्क कसा फायदेशीर आहे ? 

१. हळद :- त्वचेवरील सुरकुत्या, डाग इत्यादी समस्या दूर करुन त्वचा नैसर्गिक स्वरुपात उजळवण्यास हळद उपयोगी ठरते. 

२. ज्येष्ठमध पावडर :- ज्येष्ठमधात प्रोटीन्स, अँटीपायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म फार मोठ्या प्रमाणात असतात जे डार्क सर्कल्सचा गडदपणा कमी करण्यास मदत करतात. 

हिवाळ्यात केसातला कोंडा वाढतो, कपड्यांवर पडतो? वापरा देवघरातील ही पांढरी वस्तू, कोंडा होईल गायब...

डार्क सर्कल्स घालवण्याशिवाय इतरही अनेक फायदे....  

 १. हा मास्क लावल्याने डोळ्यांभोवतीच्या अकाली सुरकुत्या कमी होतात.
२. डोळ्यांभोवती असणारे डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी मदत होते.
३. काही जणांच्या डोळ्यांभोवतीची त्वचा कायम सुजल्यासारखी दिसते. त्याला आपण बॅगी आईज म्हणतो. ही समस्या कमी करण्यासाठीही हा मास्क उपयोगी ठरतो.
४. हळद आणि एरंडेल तेलामुळे पिगमेंटेशन कमी होऊन स्किनटोन इव्हन होण्यास मदत होते.
५. ज्येष्ठमधामुळे त्वचेचा काळवंडलेपणा कमी होऊन त्वचा चमकदार होते.

Web Title: Mulethi Powder For Dark Circles How to remove dark circles under eyes permanently naturally Use Mulethi like this to reduce dark circle from face Get Rid Of Dark Circles Using 100% Natural Eye Pack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.