Lokmat Sakhi >Beauty > चेहरा बथ्थड-निस्तेज दिसतो? अभिनेत्री मृणाल ठाकुरनं सांगितलेला ‘हा’ उपाय करा, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो

चेहरा बथ्थड-निस्तेज दिसतो? अभिनेत्री मृणाल ठाकुरनं सांगितलेला ‘हा’ उपाय करा, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो

Mrunal Thakur beauty tip: Radiant skin home remedy: Natural glow for face: मृणाल ठाकूरने तिच्या सुंदर त्वचेचे रहस्य सांगितले, करते हा खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 14:48 IST2025-08-14T14:45:43+5:302025-08-14T14:48:19+5:30

Mrunal Thakur beauty tip: Radiant skin home remedy: Natural glow for face: मृणाल ठाकूरने तिच्या सुंदर त्वचेचे रहस्य सांगितले, करते हा खास उपाय

Mrunal Thakur’s skincare tip for glowing skin chia seeds water Celebrity-inspired beauty tips Dull skin solution | चेहरा बथ्थड-निस्तेज दिसतो? अभिनेत्री मृणाल ठाकुरनं सांगितलेला ‘हा’ उपाय करा, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो

चेहरा बथ्थड-निस्तेज दिसतो? अभिनेत्री मृणाल ठाकुरनं सांगितलेला ‘हा’ उपाय करा, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो

सेलिब्रिटी इतक्या सुंदर कशा दिसतात असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो.(skin care tips) इतकंच नाही तर त्यांच्या दिवसभरातील सवयी देखील आपल्याला अप टू डेट माहित असतात.(Dull skin solution) त्यांच्यासारखी त्वचा, केस किंवा बॉडी असावी असं कायम आपल्याला वाटतं असतं.(Mrunal Thakur beauty tip) मग आपण त्वचेसाठी विविध महागातले प्रॉडक्ट वापरतो.(Instant face glow remedy) अनेक अभिनेत्री त्वचेवर मेकअप करतात किंवा त्वचा ग्लो करण्यासाठी सतत काहींना काही महागड्या ट्रिटमेंट घेत असतात.(Radiant skin home remedy) अशा जाहिराती आपण बघतो, त्या खरचं असतील असं नाही. आठवड्याभरात आपली त्वचा सुंदर ग्लो करेल असे दावे देखील खोटे असतात.(Celebrity skincare secrets) अनेक सेलिब्रिटी अमुक-तमुक कंपनीच्या प्रॉडक्टबद्दल आपल्याला सांगत असतात. पण मृणाल ठाकूरने आपल्या ग्लोइंग त्वचेच रहस्य आपल्या चाहत्यांना सांगितलं. (Chia seeds drink)

केस फार गळतात? टक्कल पडण्यापूर्वी खा 'हा' काळा लाडू, महिन्याभरात केसांची भराभर वाढ- होतील दाट

आपल्या अभिनयासोबतच मृणालने तिच्या सौंदर्यामुळे सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. ती सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो कायम शेअर करते. कधी मेकअपमधला तर कधी बिना मेकअपचा. मृणाल ठाकूरची त्वचा इतकी मऊ, तजेलदार आणि चमकदार कशी असा प्रश्न चाहत्यांना कायमच पडतो. कामानिमित्त दिवसभर मेकअप, शूट यामुळे त्वचेची वाट लागते. पण मृणाल त्वचेची काळजी कशी घेत असावी, नेमकं ती काय करते? जाणून घेऊया. 

मृणालने एका मुलाखतीत सांगितलं होत की, ती चिया सीड्सचे पाणी पिते. रात्रभर १ ग्लास पाण्यात १ चमचा चिया सीड्स भिजत ठेवते. सकाळी या पाण्यात थोडे पाणी घालून हे पाणी पिते. चिया सीड्सचे पाणी त्वचेच्या सौंदर्यासाठी अधिक चांगले मानले जाते. कारण त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात जे आपल्याला शरीराला हायड्रेट करण्याचे काम करतात. तसेच त्वचेच्या पेशी देखील दुरुस्त करण्यास मदत करतात. यामुळे आपली त्वचा निरोगी, चमकदार आणि तरुण दिसते.

 

चिया सीड्सचे पाणी प्यायाल्याने पचनक्रिया सुरळीत होते. या बियांमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील टाळता येते. ज्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. चिया सीड्सचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायाल्याने व्यक्तीची ऊर्जा वाढते. हे पेय प्यायल्याने आपला थकवा देखील कमी होतो आणि त्वचा सुधारण्यास मदत होते. 

Web Title: Mrunal Thakur’s skincare tip for glowing skin chia seeds water Celebrity-inspired beauty tips Dull skin solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.