Join us
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी उठताच, चेहरा धुण्यासाठी करा ३० सेकंदांचा उपाय! फेसवॉश - साबण नाही तर चमचाभर पीठानेही येईल सेलिब्रिटींसारखा ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2026 14:42 IST

morning face wash natural things for glowing skin : natural face wash for morning routine : best natural cleanser for glowing skin : सकाळी उठल्या - उठल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरातील १ नैसर्गिक पदार्थ फायदेशीर ठरु शकतो....

सकाळची वेळ… झोपेतून उठल्यावर चेहरा थकलेला, तेलकट आणि निस्तेज, रुक्ष दिसतो. आरशात पाहिल्यावर वाटतं, आज तरी त्वचा फ्रेश कशी दिसेल? रोज महागडे फेसवॉश, साबण वापरूनही त्वचेसाठी काहीतरी कमी पडत असल्याची जाणीव होते. सकाळी उठल्यावर आपला चेहरा स्वच्छ आणि फ्रेश दिसावा असे अनेकींना वाटत असते. त्वचा स्वच्छ आणि क्लिअर करण्यासाठी आपण दिवसातून किमान २ ते ३ वेळा चेहरा योग्य पद्धतीने स्वच्छ केला पाहिजे(natural ways to wash face in the morning).

सकाळी उठल्या उठल्या चेहऱ्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी आपण बहुतांश वेळा फेसवॉश किंवा साबणाचा वापर करतो. मात्र यामधील केमिकल्स त्वचेला कोरडी, निस्तेज आणि संवेदनशील करु शकतात. यासाठीच, सकाळी उठल्या - उठल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. जर आपल्याला नैसर्गिक, स्वस्त आणि त्वचेसाठी असरदार असा पर्याय हवा असेल तर बेसन पीठ हा एक उत्तम घरगुती उपाय ठरू शकतो. पूर्वीपासून सौंदर्य उपचारांमध्ये वापरलं जाणारं बेसन त्वचा खोलवर स्वच्छ करतं, तेलकटपणा कमी करतं आणि नैसर्गिक ग्लो (morning face wash natural things for glowing skin) देण्यास मदत करतं. सकाळी उठल्यावर, दिवसभर त्वचा टवटवीत आणि फ्रेश ( best natural cleanser for glowing skin) राहण्यासाठी बेसनाचा वापर नेमका कसा करायचा आणि त्याचे फायदे काय ते पाहूयात. 

सकाळी उठल्यावर त्वचा स्वच्छ व खोलवर स्वच्छ करण्यासाठी... 

त्वचेसाठी बेसन वापरण्याची पद्धत देखील तितकीच खास आहे. एका वाटीत १ ते २ चमचे बेसन घ्या. त्यामध्ये थोडे पाणी, गुलाबपाणी किंवा कच्चे दूध मिसळून पेस्ट तयार करा. यासोबतच आपण थोडे दही किंवा चिमूटभर हळद देखील घालू शकता. हा पॅक चेहऱ्यावर लावून हळूवारपणे मालिश करा. २ ते ३ मिनिटे हा बेसनाचा लेप चेहऱ्यावर तसाच राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. 

स्पेशल मॅजिक ट्रिक! केसांच्या समस्यांनुसार आवळ्याच्या रसात मिसळून ७ पदार्थ लावा, रुक्ष निस्तेज केस चमकू लागतील...

हा घरगुती उपाय करण्याचे फायदे... 

१. बेसन त्वचेतील घाण आणि अतिरिक्त तेल शोषून घेते, ज्यामुळे चेहरा डीप क्लीन होतो.

२. नियमित वापरामुळे उन्हामुळे काळी झालेली त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते.

३. बेसन त्वचेचा पोत सुधारून त्वचा मऊ आणि मुलायम बनवते.

त्वचेवर येईल काचेसारखा लखलखता ग्लो फक्त ५ रुपयांत! पार्लरचे हजारो रुपये वाचतील - त्वचा दिसेल ग्लोईंग...

झुरळांचा बंदोबस्त करण्यासाठी वाटीभर पाण्यांत मिसळा 'या' तेलाचे काही थेंब - झुरळं पळतील लांब, विषारी खडू विसरा...

४. यात असलेल्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे मुरुमे आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

५. पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या कमी होण्यास फायदेशीर. 

६. केमिकल फ्री असल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : 30-Second Besan Face Wash: Celebrity Glow Without Soap!

Web Summary : Skip harsh cleansers! Besan (gram flour) gently cleanses, removes oil, and brightens skin. Mix with water/rosewater, massage, rinse for fresh, glowing skin naturally. Reduces acne too!
टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजीघरगुती उपाय