Join us

पावसाळ्यात होणारी केसगळती थांबवणारं जादुई तेल! एरंडेल तेलात मिसळा २ पदार्थ - केस व स्काल्प राहील निरोगी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2025 14:21 IST

Monsoon Hair Care Tips : Healthy Hair Monsoon : What to mix in castor oil to stop hair fall during monsoon season : Stop hair fall monsoon : Ayurvedic hair remedies :पावसाळ्यात केस भिजून ते अधिक गळतात, त्यांचा पोत खराब होतो, कमकुवत - निस्तेज दिसू लागतात यासाठी घरगुती उपाय...

केसांच्या समस्या आजकाल बहुतेक सगळ्यांनाचं सतावतात. बरेचजण केसांच्या वेगवेगळ्या समस्यांनी कायमच खूप हैराण झालेले असतात. केसांच्या अनेक समस्यांपैकी केसगळती (Monsoon Hair Care Tips) ही फारच कॉमन समस्या आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणींचे केस हे बारमही गळतच असतात, परंतु पावसाळ्यात जरा अधिकच जास्त गळतात. पावसाळा (Healthy Hair Monsoon) सुरू झाला की वातावरणातील आर्द्रता वाढते आणि याचा परिणाम आपल्या केसांवर होतो. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा आणि बदलांमुळे केस कमकुवत होतात, निस्तेज (Stop hair fall monsoon) दिसतात आणि तुटण्याचे प्रमाण वाढते. यामुळे केसांची काळजी घेणं म्हणजे थोडे कठीण कामच वाटते(What to mix in castor oil to stop hair fall during monsoon season).

पावसाळ्यात अनेकदा केस भिजून ओलेचिंब, चिकट होतात आणि यामुळे केस तितकेच खराब देखील होतात. पावसाळ्यात केसगळतीचा त्रास थांबवण्यासाठी एरंडेल तेल फायदेशीर ठरते. केसांच्या आरोग्यासाठी एरंडेल तेल (Castor oil) हे एक वरदानच मानले जाते, जे केसांना पोषण देऊन मजबूत बनवते. एरंडेल तेलात फक्त दोन गोष्टी मिसळल्यास त्याचे गुणधर्म अनेक पटींनी वाढतात आणि पावसाळ्यातील केस गळतीवर हा असरदार उपाय ठरतो. पावसाळ्यात केस भिजून ते अधिक गळतात, त्यांचा पोत खराब होतो, कमकुवत - निस्तेज दिसू लागतात असे होऊ नये म्हणून खास घरगुती उपाय काय करायचा ते पाहा... 

पावसाळ्यातील केसगळती थांबवण्यासाठी एरंडेल तेलात काय मिसळावे ? 

पावसाळ्यात वातावरणातील वाढत्या आर्द्रतेचा थेट परिणाम केसांवर होऊन केसगळती सुरु होते. ही केसगळती थांबवण्यासाठी एरंडेल तेलासोबतच, कांद्याचा रस आणि मेथी दाणे, कडीपत्त्याची पाने फायदेशीर ठरतात. यासाठी, सर्वात आधी कांदा बारीक चिरून तो मिक्सरला लावून मग ती पेस्ट कापडात गुंडाळून गाळून घ्यावी, हा कांद्याचा रस एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. त्यानंतर मेथी दाणे २ तास पाण्यांत भिजवून मग त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.

डिंपल कपाडियाचे केस साठीतही दिसतात अत्यंत सुंदर, पाहा तिनं सांगितलेले घरगुती सोपे उपाय...

आता एरंडेल तेलात मेथी दाण्यांची पेस्ट, कांद्याचा रस मिक्स करून घ्यावा. त्यानंतर, हे तेल एका भांड्यात ओतून हलकेच गरम करुन घ्यावे. गरम तेलात कडीपत्त्याची पाने घालावीत. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर गाळणीच्या मदतीने तेल गाळून घ्यावे. हे तेल एका एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवावे. या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी स्काल्प व केसांना मसाज करून घ्यावा. सकाळी सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. 

डोळ्यात पाणी आणणारा कांदा केस मात्र करतो सुंदर! जावेद हबीब सांगतात, कांद्याचा रस ‘असा’ लावा...

केसांसाठी हे तेल वापरण्याचे फायदे... 

१.  एरंडेल तेल:- एरंडेल तेल केसांना खोलवर पोषण देते, केसांची मूळ मजबूत करते आणि त्यांची वाढ होण्यास फायदेशीर ठरते. 

२. कांद्याचा रस :- कांद्याचा रस केसांच्या वाढीस चालना देतो, केसांची गळती कमी करतो आणि स्काल्पचे आरोग्य सुधारतो.

३. मेथी दाणे :- मेथी दाणे केसांची मुळे मजबूत करतात, कोंडा कमी करतात आणि केसांना नैसर्गिक चमक देतात.

४. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्त्याची पाने केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवतात आणि त्यांची वाढ निरोगी ठेवतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीपाऊसहोम रेमेडीघरगुती उपाय