Black Hair Home Remedy : कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अलिकडे बरीच वाढली आहे. महिला असो वा पुरूष सगळ्यांनाच ही समस्या जाणवते. मग सुरू होतो बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या हेअर कलर आणि हेअर डायचा वापर. पण यातील केमिकल्समुळे केसांचा नॅचरल कलर आणि टेक्स्चर पूर्णपणे बिघडून जातं. अशात जर केस नॅचरल पद्धतीने काळे करायचे असतील तर एक सोपा उपाय करू शकता. यासाठी फक्त आपल्याला बदामाच्या तेलात (Almond Oil) आपल्या काही गोष्टी मिक्स कराव्या लागतील. त्याच आपण पाहणार आहोत.
साहित्य
५ ते ६ बदाम
२ ते ३ चमचे बदामाचे तेल
२ ते ३ चमचे मोहरीचे तेल
१ ते २ चमचे अॅलोव्हेरा जेल
कसं बनवाल?
५–६ बदाम तव्यावर हलके भाजा. भाजल्यानंतर थंड करून त्यांची पेस्ट किंवा पावडर तयार करा. एका भांड्यात बदामाचे तेल व मोहरीचे तेल घाला. त्यात १–२ चमचे अॅलोव्हेरा जेल घालून नीट मिक्स करा. भाजलेलं बदामाचं तेल किंवा व अॅलोव्हेरा मिश्रणात घाला. ५ मिनिटं हलक्या आचेवर गरम करा. हे तेल थंड होऊ द्या.
केसांवर कसं लावाल?
पांढरे केस काळे करण्यासाठी तयार झालेलं हे मिश्रण केसांवर सगळीकडे नीट लावा. हे तेल केसांवर १ ते २ तास लावून ठेवा. नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.
या खास तेलाचे फायदे
बदामाच्या तेलात या गोष्टी घालून वापरल्यास केसांना नैसर्गिक काळा रंग मिळतो. केसांना पोषण मिळतं आणि केसांचा कोरडेपणाही दूर होण्यास मदत मिळते. केस चमकदार, मजबूत आणि मुलायम होतात. या तेलाचा वापर आठवड्यातून १ ते २ वेळा करू शकता.