Alum for black hair : चाळिशी, पन्नाशी ओलांडल्यावर केस पांढरे होणं हे समजू शकतं. पण कमी वयातच जर केस पांढरे होत असतील ही एक चिंचेत बाब असते. आजकाल प्रदूषण, चुकीचं खाणं-पिणं, चुकीची लाइफस्टाईल आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर यामुळे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागले आहेत. मग काय ज्यांचे केस पांढरे होतात, ते लोक केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांच्या शोधात असतात. आपणही त्यांच्यापैकी एक असाल तर आम्ही आपल्याला एक खास आणि प्रभावी उपाय सांगू शकतो. हा उपाय म्हणजे तुरटी. तुरटीमध्ये काही गोष्टी मिक्स करून लावल्या तर केस नॅचरली काळे होण्यास मदत मिळू शकते. चला तर पाहुया काय आहे उपाय...
केसांसाठी फायदेशीर तुरटी
त्वचेसाठी तुरटी तर अनेकदा वापरली असेल आता केसांसाठी सुद्धा वापरून बघा. कारण यानं आपली पांढऱ्या केसांची समस्या दूर होऊ शकते. कारण तुरटीमध्ये अॅंटी-ऑक्सीडेंट्स, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. जे डोक्याची त्वचा साफ ठेवतात आणि कोंडाही साफ करतात. चला तर पाहुया पांढरे केस काळे करण्यासाठी तुरटी कसा वापर कराल.
तुरटीचं पाणी
आपले कमी वयातच पांढरे होणारे केस पुन्हा काळे करण्यासाठी तुरटीचं पाणी फायदेशीर ठरू शकतं. हे तयार करण्यासाठी २ ते ३ चमचे तुरटीचं पावडर घ्या, २ चमचे आवळा पावडर, १० ते १५ कढीपत्ते आणि १ चमचा लिंबाचा रस घ्या.
कसं तयार कराल?
सगळ्यात आधी एका भांड्यात २ ग्लास पाणी गरम करा. आता त्यात आवळा पावडर आणि कढीपत्ते उकळवा.
.. त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि तुरटी पावडर टाका. या गोष्टी चांगल्या मिक्स करा. पाण्याचा रंग डार्क होईपर्यंत या उकळवा.
.. नंतर थंड झालेलं पाणी गाळून घ्या.
कसा कराल वापर?
हे मिश्रण केसांच्या मूळांना लावा आणि साधारण २० ते ३० मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवा. या तुरटीच्या पाण्याचा उपाय आपण महिन्यातून ३ ते ४ वेळा करू शकता.
काय काळजी घ्याल?
जर आपल्याला डोक्याची त्वचा किंवा केसांसंबंधी इतर काही समस्या असेल तर तुरटीचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. हे लक्षात ठेवा की, तुरटीमुळे डोक्याच्या त्वचेमध्ये ड्रायनेस वाढू शकते. त्यामुळे तुरटीच्या पाण्याचा वापर करण्याआधी केसांना तेल नक्की लावा. तसेच तुरटीचं पाणी डोळ्यात जाऊ देऊ नका.