Join us
Daily Top 2Weekly Top 5

फेसपॅक लावताना ३ चुका करतात चेहरा कायमचा खराब, सुरकुत्याही वाढतात! म्हाताऱ्या दिसताय तुम्ही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2026 11:51 IST

wrong way to apply face pack: causes of early wrinkles: face pack mistakes: फेसपॅक लावताना त्वचेची कशी काळजी घ्यायला हवी पाहूया.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकालाच तरुण, तजेलदार आणि नितळ त्वचा हवी असते. त्यामुळे फेसपॅक, स्किन केअर रूटीन, घरगुती उपाय याकडे अनेकांचा कल वाढला आहे. प्रदूषण आणि तणावामुळे आपल्या त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होत असतो.(wrong way to apply face pack) स्वतःला फ्रेश आणि सुंदर ठेवण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपाय किंवा बाजारात मिळणारे फेसपॅक लावतो. चेहऱ्यावर ग्लो यावा आणि त्वचा तरुण दिसावी यासाठी अनेक घरगुती उपाय देखील करतो. पण ज्या फेसपॅकला आपण 'ब्युटी वरदान' समजतो, तोच फेसपॅक चुकीच्या पद्धतीने लावला तर आपल्या त्वचेचे कायमचे नुकसान करू शकतो.(causes of early wrinkles)अनेकांना वयाच्या तिशीतच चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा सैल पडणे किंवा चेहरा निस्तेज दिसणे अशा समस्या जाणवू लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे फेसपॅक लावताना होणाऱ्या ३ सामान्य पण गंभीर चुका. फेसपॅक लावताना त्वचेची कशी काळजी घ्यायला हवी पाहूया. 

६ महिन्यांत पांढरे केस होतील कायमचे काळे! ‘या’ हिरव्या पानांचा हेअर मास्क लावा, डाय कलरची गरजच संपेल

1. अनेकांना असं वाटतं की फेसपॅक जितका काळ चेहऱ्यावर राहिल तितका आपल्याला फायदा होईल. जेव्हा फेसपॅक पूर्ण सुकतो आणि कडक होतो तेव्हा तो त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेतो. यामुळे त्वचा कोरडी पडते आणि फाईन लाईन्स म्हणजेच चेहऱ्यावर बारीक सुरकुत्या दिसू लागतात. फेसपॅक लावल्यानंतर १० ते १५ मिनिटांत चेहरा स्वच्छ करावा. 

2. फेसपॅक लावल्यानंतर त्वचा घट्ट व्हायला सुरुवात होते. अशावेळी आपण बोललो किंवा हसलो तर आपल्या त्वचेवर त्याचा ताण पडतो. त्याठिकाणी रेषा उमटतात. यामुळे तिशीतच आपल्या चेहऱ्यावर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात आणि चेहरा विद्रूप दिसतो. फेसपॅक लावल्यानंतर १० ते १५ मिनिटे शांत पडून राहा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

3. अनेकांना आपण सुंदर दिसावे यासाठी आठवड्यातून ३ ते ४ वेळा फेसपॅक लावण्याची चूक करतात. वारंवार त्वचेला फेसपॅक लावल्याने स्किन रखरखीत होते. चेहरा अधिक संवेदनशील बनतो, पिंपल्स, डाग आणि अकाली म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात. त्वचेची नैसर्गिक ताकद कमी झाल्याने चेहरा विद्रूप दिसण्याची शक्यता वाढते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid these face pack mistakes or risk permanent skin damage.

Web Summary : Applying face packs incorrectly can cause wrinkles and skin damage. Over-drying, facial movements while wearing a pack, and excessive use strip skin of moisture, causing premature aging. Use face packs sparingly, relax during application, and rinse after 10-15 minutes for healthy skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी