Join us
Daily Top 2Weekly Top 5

मीरा कपूरने सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर टोचल्या सुया! डाॅक्टरही म्हणतात, सौंदर्य वाढविण्याचा ‘चांगला’ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2026 17:51 IST

Mira Kapoor Shares Her Needle Therapy Experience: मीरा कपूरने चेहऱ्यावर सुया टोचवलेला तिचा एक फोटो सोशल मीडियावर नुकताच शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे..

ठळक मुद्देमीराचा तो सुया टोचविलेला चेहरा पाहून खरंतर आपल्यालाच कसंतरी होतं. पण तिने जी पोस्ट शेअर केली आहे त्यात ती म्हणते की.....

मीरा कपूर म्हणजे अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी. पण तरीही एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीला असावं तेवढं ग्लॅमर तिला आहे. सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. त्यामुळे ती शेअर करत असलेल्या ब्यूटी हॅक्स, फिटनेस टिप्स नेहमीच व्हायरल होत असतात. आताही मीराने तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये असं दिसून येतं आहे की तिने तिच्या चेहऱ्याला कित्येक सुया टोचून घेतल्या आहेत. अगदी ८ ते १० सुया तरी तिच्या चेहऱ्यावर दिसत आहेत आणि असं असूनही तिने “Acupuncture needles are the only needles I do.” असं कॅप्शन त्याला दिलं आहे. हा नेमका काय प्रकार आहे आणि हे सगळं ती कशासाठी करते आहे ते पाहूया..(Mira Kapoor shares her needle therapy experience of depuffing and body detox)

 

मीरा कपूरने चेहऱ्यावर सुया का टोचवून घेतल्या?

मीराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार तिने नुकतीच पेनलेस नीडल थेरपी घेतली आहे. हा एक ॲक्युपंक्चर थेरपीचाच प्रकार आहे. यामध्ये अगदी बारीक सुया तुमच्या चेहऱ्यावरच्या आणि शरीरावरच्या काही भागात टोचविल्या जातात.

पदार्थ करपल्याने स्टीलची कढई जळकट झाली? १ भन्नाट उपाय- न घासता कढई होईल स्वच्छ

यामुळे शरीरातलं रक्ताभिसरण सुधारतं, विशिष्ट वयानंतर डोळ्याखाली किंवा चेहऱ्याच्या काही भागात येणारी सूज कमी होते आणि त्वचा अधिक तरुण, सुंदर होण्यास मदत होते. या क्रियेमुळे शरीरातील नॅचरल हिलिंग प्रोसेस पुन्हा एकदा अधिक जोमात सुरू होते, अशी त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. श्वेता नाखवा यांनी दिलेली माहिती इंडियन एक्सप्रेसने शेअर केली आहे.

 

मीराचा तो सुया टोचविलेला चेहरा पाहून खरंतर आपल्यालाच कसंतरी होतं. पण तिने जी पोस्ट शेअर केली आहे त्यात ती म्हणते की अशा काही सुया मी माझ्या चेहऱ्याप्रमाणेच पोटावर, हातावर आणि पायावरही टोचून घेतल्या आहेत. यामुळे मला खरंच काहीही वेदना झालेल्या नाहीत.

व्यायामाचा कंटाळा येतो? स्वयंपाक घरातलं काम 'या' पद्धतीने करा, जीमला न जाताच उतरेल वजन

कारण हा उपाय अजिबातच त्रासदायक नाही. नीडल थेरपी घेतल्यानंतर काही जणांना त्या जागी हलकेच काहीतरी टोचल्यासारखे होते, काही जणांना मुंग्या आल्यासारखं होतं, तर काही जणांना त्या भागात थोडं गरम झाल्यासारखं होतं. प्रत्येकाची सेन्सेशन क्षमता वेगळी असली तरी यापेक्षा जास्त त्रास या उपायातून होत नाही, असंही डॉ. नाखवा सांगतात. आता तारुण्य टिकविण्याचा हा नवा उपाय नवा ब्यूटी ट्रेण्ड घेऊन येणारा ठरेल अशी चर्चा या निमित्ताने सौंदर्य जगतात होत आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Kapoor's Acupuncture: A new beauty secret revealed for youthful skin.

Web Summary : Mira Kapoor shared her painless needle therapy experience, a type of acupuncture, for depuffing and body detox. This therapy improves blood circulation, reduces swelling, and rejuvenates the skin, sparking a new beauty trend.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमीरा राजपूत