हिवाळ्यातल्या कोरड्या आणि थंड हवेमुळे केसांच्या अनेक तक्रारी डोकं वर काढायला लागतात. त्यापैकी सगळ्यात प्रमुख तक्रार म्हणजे या दिवसांत डोक्यात होणारा कोंडा. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असल्याने स्काल्पवरही त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे डोक्यातला कोंडा खूप वाढतो. कोंडा वाढला की केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. याशिवाय या दिवसांत जशी त्वचा कोरडी होते, तसेच केसही खूपच कोरडे, रुक्ष, निस्तेज दिसू लागतात. म्हणूनच केसांच्या या सगळ्या तक्रारी अगदी कमीतकमी खर्चात आणि झटपट कमी करायच्या असतील तर पुढे सांगितल्याप्रमाणे केसांना दुधाचा मास्क लावून पाहा (How to Make Milk Hair Mask?). अगदी जादू झाल्याप्रमाणे तुमचे केस चमकदारआणि सिल्की दिसू लागतील.(milk hair mask for smooth, shiny and silky hair)
केसांसाठी दुधाचा हेअरमास्क कसा तयार करावा?
१. दूध आणि मध
जर केस खूप चिकट झाले असतील, केसांचा सिल्कीपणा कमी झाला असेल तर दूध आणि मध हा हेअरमास्क ट्राय करून पाहा. हा हेअरमास्क तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा कप दूध घ्या आणि त्यामध्ये २ टेबलस्पून मध घाला.
पालक पनीर डोसा खाऊन पाहिला? घ्या कुणाल कपूर स्पेशल सुपर हेल्दी रेसिपी, नाश्त्याला करून पाहाच...
हे मिश्रण केसांच्या मुळापासून ते टाेकापर्यंत सगळ्या केसांना लावा. त्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासाने केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. केस छान हायड्रेटेड राहतील. या मास्कमध्ये थोडा कोरफडीचा गर किंवा ॲलोव्हेरा जेलही घाला. केस खूप मऊ होतील.
२. दूध आणि केळी
केसांचा कोरडेपणा खूप वाढला असेल आणि केस अगदी निस्तेज, डल दिसायला लागले असतील तर दूध आणि केळी हा हेअरमास्क तुम्ही ट्राय करून पाहू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात १ कप दूध घ्या
आणि त्यामध्ये १ पिकलेले केळ मॅश करून टाका. दूध आणि केळी एकजीव करून हा मास्क केसांना लावा. अर्ध्या तासाने शाम्पू वापरून केस धुवून टाका. केसांमध्ये खूप छान बदल दिसून येईल. केस सिल्की आणि चमकदार होतील.
Web Summary : Combat dry winter hair with milk masks! Mix milk with honey or banana for hydration and shine. Apply weekly for best results.
Web Summary : सर्दियों में रूखे बालों से छुटकारा पाएं दूध के मास्क से! शहद या केले के साथ दूध मिलाकर लगाएं, बाल हाइड्रेटेड और चमकदार बनेंगे। सर्वोत्तम परिणाम के लिए हर हफ़्ते उपयोग करें।