Join us

रोज विंचरताना केसांचे पुंजके हातात येतात? तेलात ३ पदार्थ मिसळून लावा-नवे केस वाढतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 14:09 IST

Methi and Coconut Oil For Hair Growth : केस तुटणं थांबवण्यासाठी मेथी आणि  तेलाचा वापर कसा करायचा ते पाहूया. (Home Remedies for hair Growth) 

पावासळ्यात केस गळण्याची समस्या उद्भवणं खूपच कॉमन आहे. केस विंचरताना बरेच केस घरभर परसतात. मोहोरीचं तेल किंवा नारळाचं तेल वापरून तुम्ही या समस्येला कायमचं दूर ठेवू शकता.(Hair Care Tips) या तेलात अनेक एंटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात जे हेअर फॉलिकल्सना पुरेपूर फायदा देतात. यामुळे केस मऊ, मुलायम होण्यासह काळेही होतात. केस तुटणं थांबवण्यासाठी मेथी आणि  तेलाचा वापर कसा करायचा ते पाहूया. (Home Remedies for hair Growth) 

साहित्य

मोहोरीचं किंवा नारळाचं तेल- १ कप  

कलौंजी - १ चमचा

मेथीच्या बीया- १ चमचा

कडुलिंबाची पानं - १० ते १२

१) सगळ्यात आधी एक कढई घ्या आणि त्यात मोहोरीचं तेल घाला. आता एक मचा कलौंजी (काळ्या बीया), एक चमचा मेथी   कडुलिंबाची पानं  यात घाला. गॅस सुरू करून मंच आचेवर शिजवा.

२) हे शिजवल्यानंतर त्यातील अनेक पोषक तत्व केसांना मिळतील. ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. हे तेल शिजवताना चमच्याने ढवळत राहा. ५ मिनिटातं हे पूर्णपणे तयार होईल नंतर गॅस बंद करा. कोमट झाल्यानंतर गाळणीने गाळून एका काचेच्या बरणीत हे तेल भरा.

३) हा उपाय करण्याआधी केस स्वच्छ धुतलेले असतील याची खात्री करा. केसांना कापसाच्या मदतीनं तेल लावा नंतर हलक्या हातानी १० मिनिटांपर्यंत मसाज करा आणि केसांच्या लांबीला हे तेल लावा. आता एक गरम टॉवेल पाण्यात बुडवून पिळून घ्या आणि डोक्याला लावा.

४) स्टिममुळे तेलातील पोषक तत्व मुळांमध्ये प्रवेश करतील. अर्ध्या तासानं तर माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. एका आठवड्यानंतर केसांना हे तेल पुन्हा लावा. २ ते ३ वेळा हा प्रयोग केल्यास तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.

मेथी आणि नारळाच्या तेलाच्या मिश्रणाने केसांना पोषण मिळते. यामुळे केस काळे आणि लांबसडक होतात. पावसाळ्यात जर केसांमधील कोंडा जास्त वाढला असेल तर हे तेल केसांना लावल्यास केसांची वाढ चांगली होईल. केस पांढरे होत असतील तर मेथी आणि नारळाचं तेल लावून केसाचा नैसर्गिक रंग तुम्ही टिकवून ठेवू शकता. केस पिकण्याची समस्या यामुळे कमी होईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स