lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > मीरा राजपूत चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला रोज लावते दूध! कसं? हा तिचा ट्राइड-टेस्टेड फॉर्म्युला

मीरा राजपूत चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला रोज लावते दूध! कसं? हा तिचा ट्राइड-टेस्टेड फॉर्म्युला

दूध प्यायल्यानेच फक्त शरीराला फायदा होतो असे नाही तर दूध त्वचेसाठी अतिशय उत्तमरितीने काम करते. पाहूया चेहऱ्यासाठी दूधाचा उपयोग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 04:21 PM2021-11-20T16:21:49+5:302021-11-20T16:25:59+5:30

दूध प्यायल्यानेच फक्त शरीराला फायदा होतो असे नाही तर दूध त्वचेसाठी अतिशय उत्तमरितीने काम करते. पाहूया चेहऱ्यासाठी दूधाचा उपयोग...

Meera Rajput puts milk on her face daily for glowing skin! How so This is her tried-and-tested formula | मीरा राजपूत चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला रोज लावते दूध! कसं? हा तिचा ट्राइड-टेस्टेड फॉर्म्युला

मीरा राजपूत चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला रोज लावते दूध! कसं? हा तिचा ट्राइड-टेस्टेड फॉर्म्युला

Highlights दूध त्वचेला लावल्यास तुमची त्वचा मुलायम आणि नितळ होण्यास मदत होते.बाजारात मिळणारी महागडी उत्पादने लावण्यापेक्षा घरगुती उपाय केव्हाही चांगले

प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत नेहमी तिच्या सौंदर्यावरुन चर्चेत असते. तिची त्वचा इतकी नितळ आहे की तिला आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीमध्ये घेण्यासाठी मोठमोठ्या ब्रँडसमध्ये स्पर्धा लागलेली पाहायला मिळते. मीरा राजपूत चित्रपटात काम करत नसली तरी तिचे सौंदर्य एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असे आहे. मीराचे फॅन फोलोइंग इतके जास्त आहे की चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींनाही ती मागे टाकेल. ज्या सौंदर्याकडे पाहून शाहिद तिच्या प्रेमात पडला त्याचे सर्वात मोठे गमक आहे तिची मुलायम त्वचा. आता तिच्या इतक्या सुंदर आणि एकही डाग किंवा फोड नसणाऱ्या त्वचेचे सिक्रेट काय आहे असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर अतिशय तजेलदार आणि ग्लोइंग त्वचेसाठी मीरा नेमके काय करते जाणून घेऊया...

(Image : Google)
(Image : Google)

मीराच्या ग्लोइंग स्किनचे कारण आहे कच्चे दूध. दूध प्यायल्याने आरोग्य उत्तम राहते त्यामुळे आहारात दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा असे आपण नेहमी म्हणतो. पण इतकेच नाही तर हे दूध त्वचेला लावल्यास तुमची त्वचा मुलायम आणि नितळ होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही नकळत आहात त्याहून अधिक यंग दिसता. मीरा नेहमीच तिच्या हाऊस हँडलिंगसाठी आणि घरगुती टिप्ससाठी ओळखली जाते. यामुळे मुली आणि महिलांना ती आपल्यातलीच एक वाटते. बाजारात मिळणारी हजारो रुपयांची उत्पादने खरेदी करण्यापेक्षा मीरा सौंदर्यासाठी घरगुती उपाय करणे अधिक पसंत करते. मीरा नियमितपणे आपल्या चेहऱ्याला कच्चे दूध लावते. इतकेच नाही तर आपल्या मुलांचा चेहराही आपल्यासारखाच तजेलदार दिसावा यासाठी त्यांच्या चेहऱ्यालाही ती कच्चे दूध लावते. हे दूध लावण्याची पण एक पद्धत असते जी मीरा योग्य पद्धतीने फॉलो करते.

चेहऱ्याला दूध कसे लावावे 

१. एका वाटीत ३ ते ४ चमचे कच्चे दूध घ्या

२. कापसाच्या बोळ्याने हे दूध चेहऱ्याच्या सर्व भागावर लावा.

३. पहिला कोट वाळला की पुन्हा वाटीतील दूध कापसाने चेहऱ्याला लावा. 

४. वाटीतील दूध संपेपर्यंत असेच करत राहा. 

(Image : Google)
(Image : Google)

कच्च्या दुधाचे फायदे 

१. दूधात असणारे लॅक्टिक अॅसिड त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

२. दूधामुळे त्वचेत कोलेजनची निर्मिती होते. त्यामुळे त्वचा सैल पडण्यापासून वाचू शकते. अनेकांना अकाली सुरकुत्या येण्याची समस्या असते पण कच्च्या दूधामुळे ही समस्या काही प्रमाणात कमी होते. 

३. अतिनील सूर्यकिरणांमुळे त्वचेची आग होणे, जळजळ होणे या समस्या उद्भवू शकतात. पण दूध लावल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होते. 

४. दूधामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. या अँटीऑक्सिडंटसमुळे त्वचा मॉइश्चराइज होण्यास मदत होते. 

५. चेहरा टॅन झाला असेल किंवा खूप काळे डाग पडले असतील तर कच्च्या दूधात लिंबू पिळून ते मिश्रण चेहऱ्याला लावावे. त्यामुळे हे डाग आणि काळेपणा कमी होण्यास मदत होते. 

६. चेहऱ्यावरील तेलकटपणा, ब्लॅकहेडस, चिकटपणा कमी होण्यासाठी कच्चे दूध अतिशय फायदेशीर असते. कच्चे दूध काही वेळ चेहऱ्याला चोळल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात आणि दूधातील घटक त्वचेच्या आतपर्यंत काम करतात आणि त्वचा उजळण्यास मदत होते. 

७. या दुधामध्ये मुलतानी माती किंवा चंदन पावडर, मध, हळद यांसारखे पदार्थ एकत्र केल्यास त्वचा उजळण्यास मदत होते. 

८. त्वचा कोरडी असेल तर थंडीच्या दिवसांत चेहऱ्याला दूध लावणे अधिक फायदेशीप ठरते. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. 

९. सलग काही काळ अशाप्रकारे दूध लावल्यास चेहऱ्याचा रंगही उजळतो. 

१०. केवळ चेहऱ्यालाच नाही तर मान, गळा, छातीचा भाग, हात यांसारख्या शरीराच्या इतर भागातही तुम्ही कच्चे दूध लावू शकता. त्यामुळे त्याठिकाणची त्वचा उजळण्यासही मदत होते. 

Web Title: Meera Rajput puts milk on her face daily for glowing skin! How so This is her tried-and-tested formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.