सुंदर, डागविरहित आणि तजेलदार त्वचा कोणाला नको असते? रोजचे प्रदूषण, कडक ऊन आणि धावपळीमुळे आपल्या चेहऱ्यावर धूळ, माती आणि डेड स्किन साचते. यामुळे चेहरा निस्तेज आणि काळा दिसू लागतो.(Skin care Tips) अनेकदा आपण या समस्यांवर उपाय म्हणून महागड्या पार्लर ट्रीटमेंट किंवा केमिकल असलेल्या क्रीम्सचा आधार घेतो. परंतु, या गोष्टी तात्पुरता फरक दाखवतात आणि कधीकधी त्वचेला हानीही पोहचवतात. अशा वेळी आपल्या स्वयंपाकघरातील साध्या गोष्टी सौंदर्यासाठी 'जादू' करु शकतात. (Best homemade scrub for oily skin)स्वयंपाकघरात असणारी मसूर डाळ ही फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील वरदान आहे. मसूर डाळीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जे त्वचेला खोलवर पोषण देतात.(face pack for skin brightening) आपण त्वचेवर मसूर डाळीचा स्क्रब लावल्यास त्वचेवरील टॅनिंग, काळे डाग आणि मृत पेशी निघण्यास मदत होते. जर आपल्याला कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय अवघ्या १५ मिनिटांत पार्लरसारखा 'इन्स्टंट ग्लो' हवा असेल, तर मसूर डाळीचा स्क्रब कसा बनवायचा आणि तो वापरण्याची योग्य पद्धत काय पाहूया.
1. सगळ्यात आधी अर्धी वाटी मसूर डाळ घेऊन ती स्वच्छ धुवा आणि वाळवून त्याची जाडसर पूड करुन घ्या. ही पूड एका डब्यात भरून ठेवा. स्क्रबसाठी डाळ पिठासारखी बारीक नसावी, ती थोडी रवाळ असावी. ही डाळ हवी तेव्हा आपल्याला वापरता येईल.
2. आपली त्वचा खूप ऑईली असेल तर १ चमचा मसूर डाळीच्या पुडमध्ये २ चमचे दही मिसळा. दही त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. डाळ ओपन पोअर्स स्वच्छ करते. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि १० मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.
3. कोरड्या त्वचेसाठी १ चमचा मसूर डाळीच्या पावडरमध्ये थोडे कच्चे दूध आणि अर्धा चमचा मध मिसळा. दूध आणि मध त्वचेला मॉइश्चराईज करतात, ज्यामुळे स्क्रब केल्यानंतर त्वचा कोरडी होत नाही. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते.
4. उन्हामुळे चेहरा काळा पडला असेल, तर मसूर डाळीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घाला. लिंबू नॅचरल ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते, तर हळदीमुळे त्वचेचा संसर्ग दूर होतो. हा स्क्रब १५ मिनिटे लावून ठेवल्यास टॅनिंग कमी होते.
5. स्क्रब वापरण्यापूर्वी चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवा. ज्यामुळे ओपन पोअर्स उघडतील. तयार केलेला स्क्रब चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. बोटांच्या मदतीने हलक्या हाताने मसाज करा. १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. नंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा.
Web Summary : Masoor dal scrub removes dead skin, tan, and dark spots. Different recipes cater to oily, dry, and tanned skin, promising a parlor-like glow in minutes. Regular use gives brighter skin.
Web Summary : मसूर दाल का स्क्रब डेड स्किन, टैन और काले धब्बे हटाता है। तैलीय, शुष्क और टैन त्वचा के लिए अलग-अलग रेसिपी मिनटों में पार्लर जैसा निखार देने का वादा करती हैं। नियमित उपयोग से त्वचा में चमक आती है।