Lokmat Sakhi >Beauty > केस गळणं वाढलंय? आंब्याची कोय 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सुळसुळीत होतील केस 

केस गळणं वाढलंय? आंब्याची कोय 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सुळसुळीत होतील केस 

Mango Seeds For Hair Growth : आंब्याची कोय सुकवून व्यवस्थित सुकवून वाटून घ्या. आठवड्यातून एकदा केसांना लावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:52 AM2024-05-20T11:52:04+5:302024-05-20T16:00:02+5:30

Mango Seeds For Hair Growth : आंब्याची कोय सुकवून व्यवस्थित सुकवून वाटून घ्या. आठवड्यातून एकदा केसांना लावा.

Mango Seeds For Hair Growth : How To Use Mango Seeds For Hairs Growth | केस गळणं वाढलंय? आंब्याची कोय 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सुळसुळीत होतील केस 

केस गळणं वाढलंय? आंब्याची कोय 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सुळसुळीत होतील केस 

आंबे खाल्ल्याने लोक अनेकदा कोय फेकून देतात.  (Hair Growth Tips) महिलांसाठी आंब्याची कोय रामबाण उपाय ठरू शकते. केसांना लांब, काळे बनवण्यासाठी तसंच महिलांना पिरिएड्सच्या समस्यांपासून आराम मिळतो. केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी, केसांना दाट-लांब होण्यासाठी आंब्याच्या कोयीचा वापर करू शकता. (Mango Seeds For Hair Growth)

आंब्याची कोय सुकवून व्यवस्थित सुकवून वाटून घ्या. आठवड्यातून एकदा केसांना लावा. त्यात १ चमचा आवळा पावडर मिसळून लावू शकता . काही  दिवसांतच केस गळणं थांबेल आणि केस लांबसडक, दाट होण्यास मदत होईल. (How To Use Mango Seeds For Hairs Growth)

आंब्याच्या कोईत कोणते गुणधर्म असतात? (Properties Of Mango Seeds) 

आंब्याच्या कोईत अनेक गुण असतात. आंब्याच्या कोईत  व्हिटामीन सी, व्हिटामीन ई, प्रोटीन, जिंक, पोटॅशियम, कॅल्शियम  मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. याचा वापर करून तुम्ही स्किन  प्रोब्लेम्सपासून सुटका मिळवू शकता. ऊन्हाळ्यात स्किनची सुरक्षा पूर्ण होते.

आंब्याची कोय एंटीबॅक्टेरिअल तत्वांनी युक्त असते. ऊन्हाळ्यात फंगल इंन्फेक्शनपासून बचाव होण्यास मदत होते.  केसांमध्ये कोंडा होणं, स्काल्प इन्फेक्शनपासून आराम मिळू शकतो. याशिवाय केस हेल्दी राहण्यास मदत होते.

आंब्याची कोय केसांना कशी लावावी (How To Apply Mango Seeds On Hairs) 

आंब्याच्या कोयीतील मगज वाळवून त्याची पावडर बनवा त्यानंतर ही पावडर आवळा पावडरसोबत मिक्स करून याचे मिश्रण तयार करा. सम प्रमाणात  दोन्ही पावडर घेऊन याची पेस्ट बनवून केसांना लावा. केसांच्या मुळांना जवळपास १० ते १५ मिनिटं लावा नंतर केस धुवा. केस कोरडे  झाल्यानंतर केसांच्या मुळांना खोबरेल तेल लावा. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि मुळापासून केस मजबूत होतात. याच्या वापराने केस लांबसडक आणि दाट होण्यास मदत होईल. 

आंब्याची पानंसुद्धा फायदेशीर ठरतात

आंब्याच्या पानांमध्ये व्हिटामीन एस, बी, सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम व्यवतिरिक्त उच्च प्रमाणात फ्लेवोनॉईट्स आणि फिनोल नावाचे एंटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होते. याशिवाय यातील एंटी बॅक्टेरिअल गुणांमध्ये कोलोजन असते. ज्यामुळे केस शाईन होण्यासही मदत होते. 

Web Title: Mango Seeds For Hair Growth : How To Use Mango Seeds For Hairs Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.