आंब्याच्या सिझन आला की आपल्याला सगळ्यांनाच आनंद होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आंबा खायला सगळ्यांना आवडत. आंब्यातून आपल्या शरीराला अनेक पोषक घटक, जीवनसत्व आणि पोषणमूल्ये मिळतात. यामुळे आंबे खाल्ल्याने आपल्याला त्याचे अनेक फायदे मिळतात. आंब्याच्या फळाप्रमाणेच आंब्याची पाने (Mango Leaves Can Bring Life Back To Falling Hair Just Know How To Use Them) देखील तितकीच औषधी आणि (Improves Hair Health With Mango Leaves) आरोग्यासाठी गुणकारी असतात. आंब्याच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात, हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसते. विशेषतः केसांचे सौंदर्य आणि आरोग्य सांभाळण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपयोग एक उत्तम आणि नैसर्गिक उपाय ठरतो(Mango Leaves Are Great for Hair, Learn Benefits and Ways To Use).
आंब्याच्या पानांमध्ये, अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी घटक असतात, जे डोक्याची त्वचा निरोगी ठेवतात, केसगळती रोखतात आणि केसांची वाढ सुधारतात. आजकाल केसगळती, स्काल्पचा कोरडेपणा आणि डोक्याच्या त्वचेचे विकार यांसारख्या समस्या खूपच कॉमन झाल्या आहेत. बाजारात मिळणारे रसायनयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्स तात्पुरता परिणाम देतात, पण काही वेळाने याचे दीर्घकालीन दुष्परिणामही दिसतात. अशावेळी केसांसाठी आंब्याच्या पानांचा वापर एक सर्वोत्तम उपाय ठरतो. आंब्याच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक घटक आणि पोषणतत्त्वं केसांना मुळांपासून बळकटी देतात, केसगळती कमी करतात आणि केसांची नैसर्गिक चमक परत आणतात. आंब्याच्या पानांचा हेअर मास्कपासून तेलापर्यंत आपण सगळं घरच्याघरीच तयार करता येते, आणि केमिकल्स फ्री असल्याने आपण अगदी बिनधास्तपणे केसांना लावू शकतो.
आंब्याच्या पानांचा केसांसाठी वापर कसा करावा ?
१. आंब्याच्या पानांचा हेअर मास्क :- आंब्याच्या पानांचा हेअर मास्क तयार करण्यासाठी, १० ते १५ आंब्याची ताजी पाने, १ कपभर पाणी, १ टेबलस्पून खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. सर्वातआधी, आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आंब्याची पाने व थोडे पाणी घालून एकत्रित वाटून त्याची थोडी जाडसर पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट एका बाऊलमध्ये घेऊन त्यात १ टेबलस्पून खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल मिक्स करून घ्यावेत. आंब्याच्या पानांचा हेअर मास्क तयार आहे. हा हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावून ३० ते ४५ मिनिटे तसाच ठेवून द्यावा, त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत. आठवड्यातून किमान १ ते २ वेळा हा हेअर मास्क केसांवर लावून मसाज करावा.
पपईची पानं म्हणजे त्वचेसाठी वरदान, पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क चेहऱ्यावर आणतो नवी चमक...
२. आंब्याच्या पानांचे पाणी :- आंब्याच्या पानांचे पाणी स्कॅल्पची स्वच्छता आणि केसांची योग्य पद्धतीने निगा राखण्यासाठी फायदेशीर ठरते. केसांसाठी आंब्याच्या पानांचे पाणी तयार करण्यासाठी आंब्याची १५ ते २० ताजी पाने आणि २ ते ३ कप पाणी इतके साहित्य लागणार आहे. आंब्याच्या पानांचे पाणी तयार करण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात आंब्याची पाने घालून ते पाणी व्यवस्थित उकळवून घ्यावे. पाणी उकळवून घेतल्यानंतर त्या पानांचा रंग बदलत नाही, आणि पाणी आटून कमी होत नाही तोपर्यंत हे पाणी गरम करून घ्यावे. मग पाणी गाळून घ्यावे. केस शाम्पूने धुतल्यानंतर या आंब्याच्या पानांचे पाणी थेट केसांवर ओतावे. त्यानंतर केस पाण्याने धुवून नयेत. केसांना मजबूत आणि चमकदार करण्यासाठी आंब्याचे पाणी फायदेशीर ठरते.
लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...
३. आंब्याच्या पानांचे तेल :- आंब्याच्या पानांचे तेल तयार करण्यासाठी आंब्याची १० ते १५ ताजी पाने आणि कपभर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. सगळ्यात आधी एका भांड्यात खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. गरम तेलात आंब्याची पाने घालूंन तेल उकळवून घ्यावे. आंब्याच्या पानांचा रंग बदलून जोपर्यंत संपूर्णपणे काळा होत नाही तोपर्यंत तेल उकळवून घ्यावे. मग हे तेल थोडे थंड होऊ द्यावे. थंड तेल गाळून एका बाटलीत भरून घ्यावे. आठवड्यातून किमान २ वेळा तरी या तेलाने केसांवर मसाज केल्यास केसांना पोषण मिळण्यास मदत होते.
अजूनही त्वचेसाठी केमिकल्सयुक्त ब्लिच वापरताय?घरच्याघरी करा नॅचरल ब्लिच-त्वचा दिसेल तजेलदार!